लक्झरी टायटॅनिक जहाजाचा हिमनगाराला धडकून अपघात झाला (फोटो - टीम नवराष्ट्र)
जगाला हादरवून सोडणारी टायटॅनिक बुडण्याची दुर्घटना ही आजही अंगावर काटा आणते. ‘कधीही न बुडणारे जहाज’ म्हणून गौरवले गेलेले आरएमएस टायटॅनिक हे मानवी कौशल्याचे प्रतीक मानले जात होते. भव्यता, ऐश्वर्य आणि आधुनिक सुविधांनी सजलेले हे जहाज स्वप्नांच्या प्रवासाला निघाले होते.
मात्र 14 एप्रिल 1912 च्या त्या काळोख्या रात्री, उत्तर अटलांटिक महासागरात हिमनगाशी झालेली धडक क्षणात सर्व काही बदलून गेली. आनंदाने भरलेला प्रवास भय आणि आक्रोशात परिवर्तित झाला. अपुऱ्या लाइफबोट्समुळे अनेकांना मृत्यूच्या कुशीत जावे लागले, तर काहीजण शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या प्रियजनांचा हात सोडायला तयार नव्हते. या दुर्घटनेने केवळ हजारो जीव घेतले नाहीत, तर अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त केले. आरएमएस टायटॅनिक आजही समुद्राच्या तळाशी शांत पडलेले असले, तरी त्या रात्रीच्या किंकाळ्या आणि अश्रू इतिहासाच्या पानांत कायम घुमत आहेत. (Dinvishesh)
15 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
15 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष
15 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष






