Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हाताशी पुस्तक, मुखी बुद्धवंदना आणि पुढे जे घडलं…! डॉ. आंबेडकरांच्या निधनापूर्वीचे 24 तास कसे होते?

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६९ वे महापरिनिर्वाण दिन. याच दिनानिमित्त आज आपण डॉ. आंबेडकरांच्या निधनापूर्वीच्या त्या २४ तासांबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 06, 2025 | 03:07 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन
  • डॉक्टर आंबेडकरांच्या निधनापूर्वीचे 24 तास कसे होते?
  • जाणून घ्या आजच्या नवराष्ट्र विशेष लेखातून
Mahaparinirvan Diwas 2025: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन नेहमीच वादळी राहिले आहे. ज्या विद्यार्थ्याला शाळेच्या बाहेर बसवून शिकावे लागले, त्याच मुलाने भारताचे संविधान लिहिले. त्यामुळे हा संघर्ष सामान्य नव्हे! ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या त्यांच्या शिकवणीने न जाणो कित्येक पिढ्या घडल्या, ज्या आज ताठ मानेने समाजात जगत आहेत.  मात्र, 6 डिसेंबर 1956 ची सकाळ प्रत्येक भारतीयासाठी नेहमीसारखी नव्हती. कारण याच दिवशी डॉ. आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले आणि त्यांचे लाखो अनुयायी अनाथ झाले. पण, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की डॉ. आंबेडकरांच्या निधनापूर्वीचे ते अखेरचे 24 तास कसे होते? चला याबद्दल जाणून घेऊयात.

5 डिसेंबर 1956 ची सकाळ…

5 डिसेंबर 1956 ची सकाळ डॉ. आंबेडकरांसाठी नेहमीसारखीच होती. त्या दिवशी ते थोडे उशिराने उठले. 16 वर्षांपासून त्यांच्या सोबत असणारे नानक चंद रत्तू यांनी बाबासाहेबांकडून कार्यालयात जाण्यासाठी परवानगी घेतली. रत्तू गेल्यानंतर, दिल्ली येथील निवासस्थानी डॉ. आंबेडकर, त्यांची पत्नी सविताबाई आणि डॉ. मालवणकर होते.

महापरिनिर्वाणाची बातमी कळली अन् थेट घरदार विकलं! गोष्ट आंबेडकरांच्या ‘निर्वाण यात्रा’ चित्रित करणाऱ्या अवलिया कलाकाराची

डॉ. मालवणकर मुंबईहून दिल्ली येथे आंबेडकरांच्या हेल्थ चेकअपचा आढावा घेण्यासाठी आले होते. दुपारच्या सुमारास, डॉ. मालवणकर आणि सविताबाई काही सामान खरेदी करण्यासाठी बाजारात गेले. संध्याकाळी 6 वाजता रत्तू डॉ. आंबेडकरांना भेटले. मात्र, अजूनही सविताबाई घरी आल्या नव्हत्या. त्यामुळे आंबेडकरांना असे वाटत होते की आपली काळजी योग्य पद्धतीने घेतली जात नाही आहे. त्यांच्या मनातील हा दुवा रत्तू यांना देखील जाणवला. पुढे आंबडेकरांनी रत्तू यांना टायपिंगची काही कामे दिली.

अखेर सविताबाई घरी आल्या

पुढे थोड्या उशिरानेच, सविताबाई घरी पोहोचल्या तेव्हा आंबेडकर त्यांच्यावर भडकले आणि काही कठोर वाक्य त्यांना सुनावले. यावेळी काहीही बोलणे म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखे आहे असा विचार करून सविताबाई यांनी निमुटपणे सगळं ऐकून घेतलं.

जैन समाजाचे प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीला

रात्री 8 च्या सुमारास जैन समाजाचे प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीसाठी पोहोचले. डॉ. आंबेडकर यांची तब्येत चांगली नाही हे त्यांना स्वतःला ठाऊक होते. म्हणूनच ते जैन समाजातील प्रतिनिधींची भेट पुढे ढकलावी असा विचार करीत होते. मात्र, जैन नेते त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्याने त्यांनी भेट घेण्याचे ठरवले. जैन प्रतिनिध आणि आंबेडकरांमध्ये जैन आणि बौद्ध धर्मावर चर्चा झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्याचे ऐतिहासिक टप्पे, मुलांसाठी प्रेरणादायी इतिहास

बुद्ध अँड हिज धम्मा पुस्तकाच्या परिचयावर काम

जैन प्रतिनिधींच्या भेटीनंतर आंबेडकरांनी रत्तू यांना डोक्यावर तेल लावण्यास सांगितले. आता त्यांची तब्येत थोडी चांगली वाटत होती. त्यांनी बुद्ध वंदना म्हणजेच बुद्धम् शरणम् गच्छामि गाण्यास सुरुवात केली. जेव्हा कधीही ते आनंदी असत तेव्हा ते बुद्ध वंदना गात. त्यांनी रत्तू यांना काही पुस्तक आणायला सांगितली. त्यात बुद्ध अँड हिज धम्मा नावाच्या पुस्तकाचा देखील समावेश होता. यावेळी डॉ. आंबेडकरांनी बुद्ध अँड हिज धम्मा पुस्तकाच्या परिचयावर काम केले.

आणि महामानव त्यांच्या अनुयायांना सोडून गेले!

जेवण झाल्यानंतर आंबेडकर चल कबीर तेरा भवसागर हे कबिराचे दोहे गात होते. बुद्ध अँड हिज धम्मा या पुस्तकाच्या भूमिकेवर त्यांनी काम केले आणि त्याच पुस्तकावर हात ठेवून ते शांतपणे झोपी गेले.

6 डिसेंबर 1956 ची सकाळ उजाडली. नेहमीप्रमाणे सविताबाई सकाळी सहा वाजता डॉ. आंबेडकरांना उठवण्यासाठी आल्या. आंबेडकर पलंगावर शांतपणे झोपले होते. त्यांचे पाय उशीवर होते. त्यांनी दोन तीनदा त्यांना हाक दिली मात्र काहीच प्रतिसाद आला नाही. महामानव झोपेतच या भारत देशाला ‘जागे’ करून निघून गेले होते!

Web Title: Mahaparinirvan din 2025 how was the last day of dr babasaheb ambedkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 02:41 PM

Topics:  

  • Ambedkar Mahaparinirvan Din
  • Dr. Babasaheb Ambedkar
  • Mahaparinirvan Din

संबंधित बातम्या

महापरिनिर्वाणाची बातमी कळली अन् थेट घरदार विकलं! गोष्ट आंबेडकरांच्या ‘निर्वाण यात्रा’ चित्रित करणाऱ्या अवलिया कलाकाराची
1

महापरिनिर्वाणाची बातमी कळली अन् थेट घरदार विकलं! गोष्ट आंबेडकरांच्या ‘निर्वाण यात्रा’ चित्रित करणाऱ्या अवलिया कलाकाराची

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्याचे ऐतिहासिक टप्पे, मुलांसाठी प्रेरणादायी इतिहास
2

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्याचे ऐतिहासिक टप्पे, मुलांसाठी प्रेरणादायी इतिहास

Mahaparinirvan Din: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महाराष्ट्रातील आणि देशातील महत्त्वाचे कार्य
3

Mahaparinirvan Din: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महाराष्ट्रातील आणि देशातील महत्त्वाचे कार्य

Babasaheb Ambedkar: बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार, जीवनाला मिळेल योग्य दिशा; नक्की वाचा 
4

Babasaheb Ambedkar: बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार, जीवनाला मिळेल योग्य दिशा; नक्की वाचा 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.