बीड : बीड बीडमधील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून मुंडे बहीण भावात चांगलीच जुंपली आहे. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याला बदनाम करू नका? अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे वर केली. दरम्यान यालाच प्रत्युत्तर देत खासदार प्रीतम मुंडे यांनी तुमच्याच नाकर्तेपणामुळे जिल्ह्याची बदनामी झाली असल्याचं, त्यांच्या पत्रकात म्हटलं आहे. आता याच मुद्द्यावरून मुंडे बहिण भावात शाब्दिक युद्ध रंगले आहे. भाऊ धनंजय मुंडे यांनी बहीण प्रीतम मुंडे यांना प्रत्युत्तर देत, नाकर्ते आणि कर्तेपणाची चर्चा खुल्या व्यासपीठावर होऊ द्या असं आव्हान केलंय.
[read_also content=”युक्रेन हल्ल्याचा १९ वा दिवस ; पोलंड सीमेजवळ युक्रेनच्या सैन्यतळावर रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, १८० जणांचा मृत्यू झाल्याचा दावा https://www.navarashtra.com/latest-news/russia-ukraine-war/19th-day-of-ukraine-invasion-russias-missile-strike-on-ukrainian-military-base-near-poland-border-claims-180-lives-nrps-254535.html”]