Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाचवी माळ : भक्तांची लग्न जुळवून आणणारी पुण्यातील श्री पिवळी जोगेश्वरी

पुण्यामध्ये देवीची विविध मंदिर आहे. त्यापैकी एक मंदिर लग्न जुळवण्यासाठी ओळखले जाते. भक्तांनी भक्तीभावाने देवीकडे आराधन केल्यानंतर देवी भक्तांची इच्छा पूर्ण करते. अशा श्रद्धा असलेल्या शुक्रवार पेठेतील पिवळी जोगेश्वरी मंदिराची माहिती देणारा लेख.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 07, 2024 | 01:54 PM
Piwali jogeshwari pune devi information in marathi

Piwali jogeshwari pune devi information in marathi

Follow Us
Close
Follow Us:

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पुण्यातील देवींच्या विविध मंदिरांचा इतिहास आणि तिचा महिमा आपण जाणून घेत आहोत. पुण्यामध्ये जगाची ईश्वरी असलेल्या जोगेश्वरी देवीची तीन मंदिर आहे. त्यापैकीचे एका देवीकडे लग्न जुळवण्यासाठी साकडं घातलं जातं. या देवीची आराधना केल्यानंतर लवकर बाशिंग बांधलं जातं, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे फक्त पुण्यातूनच नाही तर महाराष्ट्राच्या विविध भागातून या मंदिरांमध्ये इच्छुक वधू वर येत असतात. ती देवी म्हणजे श्री पिवळी जोगेश्वरी. शुक्रवार पेठेमध्ये असणारी ही देवी भक्तांचे आराध्य दैवत आणि शहरातील महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक आहे.

पुण्यात ग्रामदैवी असलेली तांबडी जोगेश्वरी, काळी जोगेश्वरी आणि पिवळी जोगेश्वरी अशी जोगेश्वरीची तीन मंदिर आहेत. शुक्रवार पेठेमध्ये पंचमुखी मारुती चौकामध्ये पिवळी जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे. साधारणतः 250 ते 300 वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. ब्रिटीश काळामध्ये सुद्धा कागदपत्रांमध्ये पिवळी जोगेश्वरी देवीच्या मंदिराचा उल्लेख आढळतो. स्वतः लोकमान्य टिळक हे या मंदिरामध्ये येऊन गेले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये क्रांतीकारकांची खलबत या मंदिरामध्ये सुरु असत. इतके जुने असे हे मंदिर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आहे.

पिवळी जोगेश्वरी देवी ही लग्न जुळवण्यासाठी भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. देवीच्या मूर्तीचे स्पटिक हे पिवळ्या रंगामध्ये असल्यामुळे देवीला पिवळी जोगेश्वरी असे नाव पडले असावे. पिवळ्या जोगेश्वरी देवीला पिवळ्या वस्तू वाहण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर ज्यांचे लग्न जुळत नसेल त्यांनी पिवळ्या तांदळाच्या पाच मुठी देवीसमोर वाहण्याची प्रथा आहे. यामुळे लग्न जुळून येते, अशी श्रद्धा आहे. यामुळे अगदी लांबून भाविक पिवळ्या जोगेश्वरी मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात.

मंदिराची रचना सभागृह आणि गर्भगृह अशी आहे. सभागृहामध्ये देवीच्या विविध प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर देवीच्या समोर देवीचे वाहन असलेल्या सिंहाची मूर्ती आणि कासव सुद्धा आहे. गाभाऱ्यामध्ये देवीची नेत्रदीपक अशी दर्शन मूर्ती आहे. ही मूर्ती पिवळ्या छटेची असून सव्वा दोन फूट उंचीची आहे. देवीची मूर्ती ही अष्टभूजा असून प्रत्येक हातामध्ये विविध आयुध आहे. पिवळ्या जोगेश्वरी देवीची ही मूर्ती महिषासूरमर्दिनी स्वरुपातील आहे. देवीची मूळ तांदळा स्वरुपामध्ये मूर्ती असून ती दर्शन मूर्तीच्या एका बाजूला आहे. तसेच देवीच्या दुसऱ्या बाजूला उजव्या सोडेंच्या विनायकाची मूर्ती आहे.

पिवळ्या जोगेश्वरी देवीचे मंदिर हे पूर्वीभिमुख असून ईमारतींमध्ये देवीचे मंदिर आहे. श्री पिवळी जोगेश्वरी देवीचे मंदिर हे खाजगी आहे. सुधा श्रीकांत महाजन यांच्या खाजगी मालकीचे हे मंदिर आहे. सध्या मंदिराचे व्यवस्थापन कुलकर्णी कुटुंबाकडे आहे. गाभाऱ्याला प्रदक्षिणा मार्ग असून देवीच्या मागे महादेवाची पिंड आहे. शारदीय नवरात्रोत्सावात देवीची विविध रुपांमध्ये पुजा केली जाते. झोपाळ्यामध्ये तर वाहनांवर आरुढ झालेली श्री पिवळी जोगेश्वरी साक्षात आदिमायेचे रुप दिसते.

Web Title: Piwali jogeshwari pune devi information in marathi navratri special 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 01:54 PM

Topics:  

  • Pune

संबंधित बातम्या

Pune Crime: जबरदस्तीच्या प्रयत्नाला महिलेचा विरोध; संतापात गळा दाबून खून, दिवेघाट पायथ्याशी महिलेचा अर्धनग्न मृतदेह आढळला
1

Pune Crime: जबरदस्तीच्या प्रयत्नाला महिलेचा विरोध; संतापात गळा दाबून खून, दिवेघाट पायथ्याशी महिलेचा अर्धनग्न मृतदेह आढळला

“परमेश्वर करो आता रेबीज वगैरे नको…”; मराठी अभिनेत्याला भटक्या कुत्र्याचा चावा, पोस्ट शेअर करत म्हणाले…
2

“परमेश्वर करो आता रेबीज वगैरे नको…”; मराठी अभिनेत्याला भटक्या कुत्र्याचा चावा, पोस्ट शेअर करत म्हणाले…

व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण नीरा पोलिसांच्या सर्जिकल नाकाबंदीत सुखरूप सुटका
3

व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण नीरा पोलिसांच्या सर्जिकल नाकाबंदीत सुखरूप सुटका

‘ज्वलनशील व तत्सम धोकादायक पदार्थांच्या…’, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक कोंडींवर मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
4

‘ज्वलनशील व तत्सम धोकादायक पदार्थांच्या…’, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक कोंडींवर मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.