Republic Day 2025 How did the military parade become the pride of Republic Day How many soldiers marched on first republic day
आज स्वतंत्र भारत संविधानाच्या अंमलबजावणीला ७५ वर्षे पूर्ण होत असून भारत आपला ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. भारताचा प्रजासत्ताक दिवस हा देशाच्या स्वाभिमानाचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारताने आपले संविधान लागू केले आणि भारताला एक प्रजासत्ताक देश म्हणून घोषित केले. हा दिवस संपूर्ण देशभरात उत्साहाने साजरा केला जातो. यानिम्मित विविध ठिकाणी विविध कार्यक्रामांचे आयोजन केले जात. यानिमित्त दरवर्षी दिल्लीतील कर्तव्यपथावर भव्य परेडचे आयोजनही करण्यात येते. ही परेड भारताच्या लष्करी ताकदीचा, तांत्रिक प्रगतीचा आणि सांस्कृतिक विविधतेचे प्रदर्शन करते. विशेषतः लष्कराची परेड प्रजासत्ता दिवसाची शान मानली जाते.
पण तुम्हाला माहित आहे का या आर्मी परेडची सुरुवात कशी झाली आणि यामध्ये किती सैनिकांचा सहभाग होता. आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.
कशी झाली परडेची सुरुवात?
प्रजासत्ताक दिनाच्या पहिल्या परेडचे आयोजन १९५० साली करण्यात आले होते. त्यावेळी पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासमोर ३,००० सैनिकांनी मार्च केला होता. यानिमित्ती ३१ तोफांची सलामी देण्यात आली आणि हवाई दलाने आपल्या विमानांसोबत कलाकौशल्य दाखवले. त्यानंतर १९५१ मध्ये ही परेड राजपथावर आयोजित करण्यात आली. मग हळूहळू केंद्र सरकारने विविध राज्यांना यामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आणि राज्यांच्या चित्ररथांचा समावेश परेडचा अविभाज्य भाग बनला.
Republic Day 2025: कोण होते प्रजासत्ताक दिनाचे पहिले प्रमुख अतिथी? कधीपासून सुरू झाली ही परंपरा?
चित्ररथांनी रंगत आणली
विविध राज्यांच्या चित्ररथांनी परेड अधिक रंगतदार आणि आकर्षक बनली. या चित्ररथांमधून भारताची विविध राज्यांची संस्कृती, परंपरा, आणि प्रगती यांचे दर्शन घडते. केंद्र सरकारच्या विविध विभागांचे देखील प्रदर्शन यामध्ये करण्यात येते. परेडमध्ये सहभागी झालेले तिन्ही सेनादलांचे पथक, अर्धसैनिक दल, एनसीसी कॅडेट्स, आणि भारतीय लष्कराच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, हे या विशेष परेडचे मुख्य क्रेंद्रबिंदू मानले जातात.
परेडमधे प्रगतीचे दर्शन
जसे जसे आपल्या भारत विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करत गेला, तशा प्रकारचे दृश्य चित्ररथांमध्ये परेडमध्ये दिसू लागले. आज भारतीय लष्कराचे टी-90 भीष्म टँक, ब्रह्मोस क्षेपणास्त्र, नाग क्षेपणास्त्र प्रणाली, चेतक वाहन यांसारखी स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे परेडमध्ये सहभागी होतात. भारतीय वायुसेनेच्या विमानांची हवाई कौशल्ये प्रेक्षकांना रोमांचित करतात. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दरवर्षी एका विदेशी राष्ट्रप्रमुखाला मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केरण्यात येते. 1950 साली इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुकर्णो हे पहिले मुख्य अतिथी होते. यावर्षी देखील इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबिआंतो यांना मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
परेडची भव्यता
यंदा 2025 मध्ये आत्मनिर्भर भारताची झलक दाखवणारी परेड अत्यंत भव्य असणार आहे. यामध्ये 77,000 प्रेक्षकांच्या उपस्थितीत, 18 मार्चिंग पथके, 31 चित्ररथ, आणिन5,000 कलाकार देशाच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रदर्शन करणार आहेत. प्रजासत्ताक दिनाची ही परेड आज भारताची एकता, शक्ती, आणि सांस्कृतिक वैभवाचे जिवंत प्रतीक असून प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे.
Republic Day 2025 Date: 26 जानेवारीलाच का साजरा होतो प्रजासत्ताक दिन? संविधानाचा इतिहास आणि महत्त्व