Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Republic Day parade 2026: नागाचे चिन्ह अन् ‘भैरव अदम्य’; भैरव बटालियनच्या चेहऱ्यावरील रंगामागील गुपित उघड

गेल्या वर्षी, भारतीय सैन्याने तीन नवीन बटालियन तयार केल्या, त्यापैकी एक भैरव बटालियन होती. प्रत्येक बटालियनमध्ये अंदाजे २५० सैनिक असतात. सध्या १५ बटालियन तयार करण्यात आल्या आहेत, तर आणखी २५ बटालियन तयार करण्याची योजना आह

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 26, 2026 | 02:26 PM
Republic Day 2026, Bhairav ​​Battalion, Bhairav ​​Battalion Republic Day parade,

Republic Day 2026, Bhairav ​​Battalion, Bhairav ​​Battalion Republic Day parade,

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भैरव बटालियन पहिल्यांदाच सहभागी
  • शीख लाईट इन्फंट्रीच्या जाज्वल्य वारशातून आकाराला आलेली ही बटालियन
  • ‘भैरव’ बटालियनचा ‘कॅमफ्लाज’ अवतार; शत्रूला चकवण्यासाठी सैनिकांनी रंगवलेले चेहरे
Bhairav ​​Battalion Republic Day parade 2026: प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भैरव बटालियन पहिल्यांदाच सहभागी झाली असून संपूर्ण देशाने या बटालियनचे सामर्थ्य पाहिले. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात भैरव बटालियनची स्थापना करण्यात आली. भैरव बटालियन भारतीय सैन्याची एक एलिट कमांडो फोर्स आहे. भैरव बटालियनचे कमांडो ज्या क्षणी मैदानात उतरले, तो क्षण पाहण्यासारखा होता. मेजर अंजुम गोरखा यांच्या नेतृत्वाखाली, भैरव बटालियन ही एक विशेष पायदळ तुकडी आहे जी पारंपारिक पायदळ आणि विशेष दलांमधील पूल म्हणून काम करते.

Chandrapur News: चंद्रपूर महापौरपदाचा पेच कायम! उबाठा-वंचित गट नोंदणीने वाढली काँग्रेसची डोकेदुखी,

गेल्या वर्षी, भारतीय सैन्याने तीन नवीन बटालियन तयार केल्या, त्यापैकी एक भैरव बटालियन होती. प्रत्येक बटालियनमध्ये अंदाजे २५० सैनिक असतात. सध्या १५ बटालियन तयार करण्यात आल्या आहेत, तर आणखी २५ बटालियन तयार करण्याची योजना आहे. शीख लाईट इन्फंट्रीच्या जाज्वल्य वारशातून आकाराला आलेली ही बटालियन आज प्रगत तंत्रज्ञान, अजोड धैर्य आणि शिस्तीचे प्रतीक बनली आहे. लढाऊ उत्कृष्टतेमध्ये अग्रस्थानी असलेल्या या बटालियनला “भैरव” हे नाव देण्यात आले आहे.

भगवान शिवाच्या शक्तिशाली आणि संरक्षणात्मक रूपापासून प्रेरित होऊन हे नाव ठेवण्यात आले असून, ते बटालियनच्या अदम्य इच्छाशक्तीचे दर्शन घडवते. आधुनिक युद्धातील प्रगत तंत्रज्ञानाची जोड आणि परंपरेतून आलेली लढाऊ वृत्ती यामुळे या तुकडीने लष्करामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

‘भैरव’ बटालियन शत्रूसाठी कर्दनकाळ; नागाचे चिन्ह आणि ‘अदम्य’ ध्येयवाक्याने शत्रूचा थरकाप

भारतीय लष्कराची ‘भैरव’ बटालियन आपल्या नावाप्रमाणेच शत्रूसाठी कर्दनकाळ मानली जाते. या बटालियनच्या चिन्हावर (Insignia) एका आक्रमक नागाचे चित्रण असून त्यासोबत “भैरव, अदम्य” असा शिलालेख कोरण्यात आला आहे.बटालियनच्या टीम कमांडरने या चिन्हाचा अर्थ स्पष्ट करताना सांगितले की, नागाचे चित्रण हे शत्रूसाठी सूचक इशारा आहे. ज्याप्रमाणे नागाचा दंश जीवघेणा असतो, त्याचप्रमाणे या बटालियनने शत्रूवर प्रहार केल्यास त्यांचा मृत्यू निश्चित आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि शीख लाईट इन्फंट्रीचा वारसा लाभलेली ही तुकडी शत्रूच्या गोटात धडकी भरवणारी ‘अदम्य’ शक्ती म्हणून ओळखली जात आहे.

PM Modi Republic Day greetings : भारताच्या अभिमानाचे आणि वैभवाचे प्रतीक…! PM मोदींनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

‘भैरव’ बटालियनचा ‘कॅमफ्लाज’ अवतार; शत्रूला चकवण्यासाठी सैनिकांनी रंगवलेले चेहरे

भैरव बटालियनचे सैनिक जेव्हा युद्धभूमीवर उतरतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील लाल आणि गडद हिरव्या रंगाचे पट्टे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. शत्रूला चकवण्यासाठी आणि स्वतःला अदृश्य ठेवण्यासाठी वापरले जाणारे हे विशेष ‘कॅमफ्लाज’ तंत्र या बटालियनच्या लढाऊ कौशल्याचा महत्त्वाचा भाग आहे.

हे रंग प्रामुख्याने काळ्या आणि गडद हिरव्या रंगाचे विविध प्रकार असून, त्यांचा वापर रात्रीच्या वेळी किंवा डोंगर-दऱ्या आणि घनदाट जंगलात शत्रूच्या नजरेतून वाचण्यासाठी केला जातो. जगभरातील विशेष दले आणि कमांडो याच पद्धतीचा वापर करतात, जेणेकरून ऑपरेशन दरम्यान शत्रूला सैनिकांची हालचाल सहज टिपता येऊ नये आणि त्यांच्यावर अचानक (Surprise Attack) हल्ला करता यावा. शत्रूसाठी ‘संकट’ ठरणाऱ्या भैरव बटालियनचे हे रूप त्यांच्या घातक रणनीतीचा पुरावा मानले जात आहे.

हायटेक सेन्सर्सना चकवण्यासाठी ‘भैरव’ बटालियनची विशेष रणनीती; चेहऱ्यावरील रंगामागील गुपित उघड

नवी दिल्ली: भैरव बटालियनचे कमांडो ऑपरेशनवर जाताना आपल्या चेहऱ्यावर काळ्या आणि लाल रंगाचे पट्टे का लावतात, यामागचे अत्यंत महत्त्वाचे तांत्रिक कारण समोर आले आहे. संरक्षण तज्ज्ञ ब्रिगेडियर अरुण सहगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा केवळ वेषांतराचा भाग नसून एक आधुनिक धोरणात्मक निर्णय आहे.

सध्याच्या युद्धतंत्रात एआय-आधारित (AI-based) प्रगत सेन्सर्सचा वापर वाढला आहे. हे सेन्सर्स एखादी व्यक्ती मास्क लावून किंवा चेहरा झाकून असली तरीही तिची ओळख पटवू शकतात. मात्र, चेहऱ्यावर काळ्या किंवा लाल तेलाच्या रंगाचा जाड थर लावल्यामुळे या अत्याधुनिक सेन्सर्सना चेहरे ओळखण्यात अडथळे येतात. शत्रूच्या तांत्रिक पाळतीतून वाचण्यासाठी आणि गुप्त मोहिमा यशस्वी करण्यासाठी भैरव बटालियन या विशेष ‘कॅमफ्लाज’ तंत्राचा वापर करत आहे.

 

Web Title: Republic day parade 2026 what exactly is the new bhairav battalion that participated in the republic day parade

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • indian army
  • Republic Day 2026
  • Republic day parade

संबंधित बातम्या

Republic Day 2026 : ‘महाराष्ट्राच्या चित्ररथातून दिसली ‘आत्मनिर्भर’ संस्कृती! गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दिल्ली दुमदुमली
1

Republic Day 2026 : ‘महाराष्ट्राच्या चित्ररथातून दिसली ‘आत्मनिर्भर’ संस्कृती! गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दिल्ली दुमदुमली

PM Modi Republic Day greetings : भारताच्या अभिमानाचे आणि वैभवाचे प्रतीक…! PM मोदींनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
2

PM Modi Republic Day greetings : भारताच्या अभिमानाचे आणि वैभवाचे प्रतीक…! PM मोदींनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

India-EU FTA: भारत-ईयू व्यापार करारादरम्यान 27 देशांसाठी मोठी बातमी; उद्या होणार जगातील सर्वात मोठ्या करारावर स्वाक्षरी
3

India-EU FTA: भारत-ईयू व्यापार करारादरम्यान 27 देशांसाठी मोठी बातमी; उद्या होणार जगातील सर्वात मोठ्या करारावर स्वाक्षरी

Republic Day 2026: कर्तव्य पथावरून जगाला संदेश; युरोपियन प्रमुखांच्या उपस्थितीत भारताचा जागतिक दबदबा, ट्रम्पना थेट इशारा
4

Republic Day 2026: कर्तव्य पथावरून जगाला संदेश; युरोपियन प्रमुखांच्या उपस्थितीत भारताचा जागतिक दबदबा, ट्रम्पना थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.