Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Science News: विज्ञानात 100 वर्षानंतर क्रांती! ब्लॅकहोलच्या टक्करीनंतर ऐकू आला ‘रिंगडाउन’ सिग्नल; समजून घ्या यामागील तथ्य

Science News: कृष्णविवरांच्या टक्करीचा पहिलाच 'स्वच्छ आवाज आणि स्पष्ट आवाज रेकॉर्ड करण्यात आला. यामुळे अनेक वैश्विक रहस्यांचा उलगडा झाल्याचे दिसून आले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 24, 2025 | 03:46 PM
Scientists have heard the clearest ringdown signal since the collision of black holes for the first time

Scientists have heard the clearest ringdown signal since the collision of black holes for the first time

Follow Us
Close
Follow Us:
  • शास्त्रज्ञांना प्रथमच कृष्णविवरांच्या टक्करनंतरचा सर्वात स्पष्ट “रिंगडाउन” सिग्नल ऐकू आला.
  • स्टीफन हॉकिंग यांचा कृष्णविवर कधीही आकुंचन पावत नाही हा सिद्धांत आता जवळपास निर्विवाद.
  • अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी १०० वर्षांपूर्वी भाकीत केलेल्या गुरुत्वीय कंपन आणि अंतिम घंटा सिद्ध.

Science News : विश्वातील सर्वात रहस्यमय आणि शक्तिशाली वस्तू असलेल्या कृष्णविवरांनी पुन्हा एकदा विज्ञानक्षेत्रात ऐतिहासिक खळबळ उडवली आहे. LIGO-Virgo-KAGRA वैज्ञानिक टीमने नोंदवलेल्या ताज्या निरीक्षणात प्रथमच कृष्णविवरांच्या(Black hole) टक्करनंतर निर्माण होणारा अंतिम कंपनाचा आवाज “रिंगडाउन” अत्यंत स्पष्टपणे नोंदवला गेला आहे. हा शोध केवळ एक निरीक्षण नसून, १०० वर्षे जुने वैज्ञानिक रहस्य उकलण्याची किल्ली आहे. यामुळे दोन महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिंग यांच्या सिद्धांतांची एकाच वेळी पुष्टी झाली आहे.

आइन्स्टाईनचे भाकीत सिद्ध!

अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी गुरुत्वीय लहरींचा सिद्धांत मांडताना असा अंदाज व्यक्त केला होता की, जेव्हा दोन कृष्णविवरे एकमेकांवर आदळतात तेव्हा त्यातून निर्माण होणारा कंपन एक “शेवटचा प्रतिध्वनी” म्हणजेच रिंगडाउन असेल. तो आवाज पहिल्यांदाच इतका स्वच्छ आणि जास्त अचूकतेने नोंदवला गेला आहे. हा आवाज म्हणजे कृष्णविवर अंतिमतः स्वतःला स्थिर करताना कंपत असलेले विश्वाचे कंप आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Leak Scandal : ‘मृत्यूचा दलाल…’; CIAच्या माजी प्रमुखांनी पाकिस्तानच्या अनुशाश्त्रज्ञावर केले धडकी भरवणारे आरोप

 हॉकिंगचा सिद्धांत जवळपास निर्विवाद

स्टीफन हॉकिंग यांनी १९७१ मध्ये असा दावा केला होता की कृष्णविवर कधीही आकाराने घटत नाही, ते केवळ वाढतात.

नवीन अभ्यासांमध्ये उघड झाले आहे की:

  • टक्करपूर्वीची दोन कृष्णविवरे वेगळी होती.
  • टक्‍करानंतर तयार झालेले कृष्णविवर आकाराने नेहमीच मोठे असते.
  • ऊर्जा कमी जरी झाली तरी पृष्ठभाग क्षेत्रफळ वाढते.

या निष्कर्षामुळे हॉकिंगचा “Area Theorem” पुन्हा सिद्ध झाला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Shanghai Airport : ‘अरुणाचल चीनचा भाग’ वाद पुन्हा उफाळला; शांघाई एअरपोर्टवर भारतीय महिलेला तब्बल 18 तास ठेवले ताब्यात

या सिग्नलचे महत्त्व काय?

GW250114 नावाच्या सिग्नलच्या मदतीने वैज्ञानिकांना कृष्णविवरांचे:

  • घनता
  • आकार
  • फिरण्याचा वेग
  • गुरुत्वीय ऊर्जा

अत्यंत अचूकतेने मोजता आली.

हे रेकॉर्डिंग आतापर्यंतचे सर्वात स्पष्ट कृष्णविवर टक्कर संकेत ठरले आहे.

कोणते कृष्णविवर तयार झाले?

अभ्यासानुसार, टकरानंतर जे कृष्णविवर तयार झाले ते एक “केर ब्लॅक होल” आहे म्हणजेच स्वतःच्या अक्षाभोवती अतिवेगाने फिरणारे कृष्णविवर, जसे १९६० मध्ये गणितज्ञ रॉय केर यांनी भाकीत केले होते.

 हा शोध भविष्य बदलू शकतो!

या अभ्यासामुळे आता स्पष्ट झाले आहे की कृष्णविवरांचे कंपन म्हणजे विश्वाची भाषा आहे. आगामी दशकात LIGO तंत्रज्ञान आणखी सुधारेल आणि कृष्णविवरांचे अनेक अज्ञात रहस्ये उलगडतील अशी आशा वैज्ञानिक व्यक्त करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कृष्णविवरांच्या टक्करचा आवाज कसा नोंदतो?

    Ans: तो गुरुत्वीय लहरींमधून मोजला जातो.

  • Que: हा शोध महत्त्वाचा का आहे?

    Ans: कारण प्रथमच आइन्स्टाईन आणि हॉकिंग दोघांचे सिद्धांत सिद्ध झाले.

  • Que: नवीन तयार झालेले कृष्णविवर कसे होते?

    Ans: ते वेगाने फिरणारे केर ब्लॅक होल होते.

Web Title: Scientists have heard the clearest ringdown signal since the collision of black holes for the first time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • NASA
  • NASA Space Agency
  • Space
  • Space News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.