राजर्षी छत्रपती शाहू महाराज
महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. या सर्व लोकांची नावे अजूनही इतिहासात जतन करून ठेवण्यात आली आहेत. देशामध्ये सामाजिक क्रांती करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांची आज जयंती आहे. ते कोल्हापूरचे चोथे शाहू महाराज म्हणून ओळखले जातात. भोसले घराण्याचे पहिले छत्रपती आणि कोल्हापूर संस्थानाचे राजे अशी त्यांची सगळीकडे ओळख आहे. शाहू महाराजांनी त्यांच्या काळात मागासवर्गीय लोकांसाठी भरपूर काम केलं. शाहू महाराजांना लोकशाहीवादी आणि समाज सुधारक म्हणून ओळखले जाते. त्यांनी जात,पंथ इत्यादी कोणत्याच गोष्टीची पर्वा न करता प्राथमिक शिक्षण देण्यास प्रथम प्राधान्य दिले होते. समाजातील प्रत्येक लोकांना योग्य ते शिक्षण मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
२६ जून १८७४ मध्ये शाहू महाराजांचा जन्म झाला. तसेच त्यांचा जन्म कागल येथील घाटगे घराण्यांमध्ये झाला. शाहू महाराजांच्या वडिलांचे नाव जयसिंग राव आणि आईचे नाव राधाबाई होते. त्यानंतर कोल्हापूर संथानचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले आणि त्यांचे नाव ‘शाहू’ असे ठेवले.
शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी देण्यात आली. १८९४ पासून ते राज्याभिषेक सोहळ्यापर्यंत १९२२ पर्यंत त्यांनी राज्यभरातील अनेक मागास वर्गीय लोकांसाठी काम केले. त्यानंतर त्यांना राज्याभिषेक सोहळ्यावेळी ‘राजर्षी’ ही पदवी देण्यात आली. महाराष्ट्र राज्याला तीन समाजसुधारकांचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा वारसा लाभला आहे.
पूर्वीच्या काळी ब्रिटिश राजवटीमध्ये सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेकांची मदत केली. समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. शाहू महाराजांनी सनातनी वर्गाच्या विरोधाला ज जुमानता मागास वर्गीय लोकांसाठी अनेक कामे केली. मागास वर्गीय लोकांच्या विकासासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. कोल्हापूरमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे करून स्त्रियांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. १९१९ मध्ये अस्पृशांची वेगळी शाळा बंद केली. तसेच त्यांनी समाजातील जातीभेद दूर करून आंतरजातीय विवाह सोहळ्याला मान्यता दिली.