Sunrays fall on Gavi Gangadhareshwara temple shivalinga in sanctum sanctorum An astronomical and architectural miracle
बेंगळूरु: बेंगळूरू शहरातील ऐतिहासिक गवी गंगाधरेश्वर मंदिरात लाखो भाविकांनी एक चित्तथरारक खगोलीय घटना पाहण्यासाठी गर्दी केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवलिंगावर सूर्यकिरण पडण्याची दुर्मिळ घटना आज मकर संक्रातीच्या दिवशी पहायला मिळाली. गवी गंगाधेश्वरचे हे मंदिर प्राचीन वास्तुशास्त्र आणि खगोलशास्त्राचे अनोखे उदाहरण आहे. आजच्या दिवशी दिसणारा हा अद्भुत असा चमत्कार ज्यामध्ये सूर्यकिरण नदींच्या शिंगामधून जाऊन मंदिरातील शिवलिंगवर प्रकाश टाकतात. या विलक्षण घटनेमुळे भाविक आणि शास्त्रज्ञ मंदिरात मोठ्या संख्येने गर्दी करतात.
उन्हाळ्याचा प्रारंभ
गवी गंगाधरेश्वरच्या या मंदिरातील हा विलोभनीय अनुभव त्याच्या प्राचीन स्थापत्यकलेचे दर्शन घडवून देते. या मंदिराचे बांधकाम असे करण्यात आले आहे की, मकर संक्रातीच्या दिवशी सूर्यप्रकाश नंदीच्या शिंगामधून शिवलिंगावर पडतील.मंदिराचे पुजारी सोमसुंदर यदीक्षित यांनी या घटनेच्या महत्त्वार प्रकाश टाकला आहे. त्यांनी मकर संक्रांतीचा संबंध सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाशी असल्याचे सांगितले. उत्तरायणाचा आरंभ म्हणजेच सूर्याचे उत्तरेकडे सरकणे, जो उन्हाळ्याचा प्रारंभ मानला जातो.
आजचा दिवस आहे पानिपतच्या लढाईचा साक्षीदार; जाणून घ्या 14 जानेवारीचा इतिहास
200 वर्षापासून घडतो हा चमत्कार
आजच्या दिवशी लोकांना हे अद्भुत दृश्य पाहता यावे यासाठी LED स्क्रीन देखील उपलब्ध करुन देण्यात येतात. हे मंदिर केंपेगौडांनी बांधलेले असून, या मंदिरात खगोलशास्त्रीय आणि स्थापत्यकलेतील प्राचीन ज्ञानाचा एक वेगळाच अनुभव तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. पाषाणाचे नंदीचे शिंग असे तयार करण्यात आले आहे की, सूर्यकिरणे थेट शिवलिंगावर पडतील.
संशोधक पी. जयंथ व्यसनकेरे, के. सुधीश आणि बी.एस. शैलजा यांनी मंदिराचा सखोल अभ्यास केला असून त्यांच्या म्हणण्यानुसार, दक्षिण-पश्चिम भागातून येणारे सूर्यकिरण एका कमानी, दोन खिडक्या आणि नंदीच्या शिंगांतून जाऊन शिवलिंगाला प्रकाशित करतात. गेल्या 200 वर्षांमध्ये मंदिराच्या बांधकामात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. तसेच मंदिराच्या अंगणातील दोन मोठ्या चकत्या उन्हाळी संक्रांतीशी जोडलेल्या आहेत.
आध्यात्मिकता आणि विज्ञान याचा अनोखा संगम
1792 मधील एका जुन्या चित्रामध्ये दाखवले गेले आहे की सुरुवातीला हा सूर्यप्रकाश हिवाळी संक्रांतीशी संबंधित होता. नंतरच्या काळात बांधकामांमध्ये बदल करून तो 14 जानेवारी आणि ३० नोव्हेंबर या तारखांशी जुळविण्यात आला आहे. मंदिराचे खगोलशास्त्रीय महत्त्व विलोभनीय असले तरी इतर वैशिष्ट्येदेखील महत्त्वाची आहेत. दक्षिण भारतातील एकमेव अग्नीचे शिल्प, शक्ती गणपतीची 12 हातांची प्रतिमा, आणि दमरू, त्रिशूल व पंख्यांचे प्रतीक असलेल्या चार एकाश्म खांबांनी मंदिराचे महत्त्व वाढवले आहे. गवी गंगाधरेश्वर मंदिर हे आध्यात्मिकता आणि विज्ञान यांचा अप्रतिम संगम असल्याचे प्रतीक आहे.
राजकीय नेत्यांच्या श्रद्धेमध्ये नाही संशयाला जागा; माणूस त्याच्या कर्माने बनतो देव