Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPSC criminal record rules: FIR झाल्यानंतरही सरकारी नोकरी मिळणार नाही? स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी महत्वाची माहिती

किरकोळ कलमांखाली चालू असलेल्या खटल्यांमध्ये किंवा न्यायालयाने उमेदवाराला निर्दोष ठरवल्यास सरकारी नोकरी मिळण्याची संधी कायम असते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 07, 2025 | 04:34 PM
UPSC criminal record rules

UPSC criminal record rules

Follow Us
Close
Follow Us:
  • अलीकडच्या काळात सरकारी नोकऱ्यांची क्रेझ प्रचंड वाढत चालली आहे
  • एफआयआर दाखल झाल्यानंतरही सरकारी नोकरी मिळू शकते का
  • गंभीर गुन्ह्यांमध्ये नोकरीची संधी कमी
UPSC criminal record rules:  अलीकडच्या काळात सरकारी नोकऱ्यांची क्रेझ प्रचंड वाढत चालली आहे. लाखो तरुण एसएससी, यूपीएससी, बँका, पोलिस, शिक्षक, रेल्वे इत्यादींमध्ये भरतीसाठी तयारी करत आहेत. देशात सरकारी नोकऱ्यांसाठी स्पर्धा तीव्र आहे. निवड अनेक टप्प्यांनंतर केली जाते. पण स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरूणांच्या विरोधात जर एफआयआर किंवा कोर्ट केस झाल्यानंतरही त्यांना सरकारी नोकरी मिळू शकते का? असा प्रश्न तरुणांना भेडसावत असतो. यासंदर्भात माहिती असणेही आवश्यक आहे.

चित्रपटांमध्ये यूपीएससी स्पाइस

अलीकडे अनेक चित्रपट केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षांवर चित्रित केले जात आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या धनुष आणि कृती सेनन यांच्या “तेरे इश्क में” मध्ये यूपीएससीचा संदर्भ पाहायला मिळाला. चित्रपटात, शंकर यूपीएससीची तयारी करतो आणि त्याच्या तिसऱ्या वर्षात प्रिलिम्स उत्तीर्ण होतो. परंतु नंतर मुक्तीच्या लग्नासाठी सजवलेल्या घरालाच आग लावतो. मुक्ती नंतर शंकरला असे न करण्याचा सल्ला देते, कारण असे केल्याने त्याचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न भंग होऊ शकते, असे सांगते. म्हणजेच जर स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरूणांविरोधीत गुन्हा दाखल झाला अथवा त्याच्याविरोधात कोर्ट केस झाली तर त्याला सरकारी नोकरी मिळू शकणार नाही. पण नियम प्रत्यक्षात काय म्हणतात ते माहिती असणेही गरजेचे असते.

Goa Club Fire Accident: गोव्यातील नाईट क्लबच्या दुर्घटनेचा थरारक Video आला समोर, महिला डान्स करत

एफआयआर दाखल झाल्यानंतरही सरकारी नोकरी मिळू शकते का,

उमेदवाराविरोधात एफआयआर ( FIR)  दाखल झाल्यामुळे त्याला सरकारी नोकरीपासून रोखता येत नाही, असा स्पष्ट संदेश केंद्र सरकार आणि न्यायालयांनी दिला आहे. एफआयआर दाखल होणे म्हणजे दोष सिद्ध होणे नव्हे, त्यामुळे केवळ एफआयआरच्या आधारावर उमेदवाराला अपात्र ठरवू नये, असे धोरण मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद आहे.

नियम काय सांगतात?

कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या (डीओपीटी) २०१६ आणि २०२० च्या नियमांनुसार, इंडियन पीनल कोडच्या किरकोळ कलमांखाली एफआयआर दाखल असल्यास उमेदवाराला अपात्र ठरवता येत नाही. रस्ते अपघात, शेजाऱ्यांशी वाद, किरकोळ भांडण यांसारख्या प्रकरणांत पोलिस पडताळणीदरम्यान केवळ प्रकरणाची स्थिती विचारली जाते आणि स्पष्टीकरण नोंदवले जाते. अशा प्रकरणांमध्ये कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता नसते.

गंभीर गुन्ह्यांमध्ये नोकरीची संधी कमी

खून (आयपीसी ३०२), बलात्कार (३७६), दरोडा (३९५/३९७), पॉक्सो, एनडीपीएस, दहशतवाद, भ्रष्टाचार किंवा लाचखोरी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये एफआयआर दाखल असेल तर सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता पूर्णपणे संपुष्टात येते. सर्वोच्च न्यायालयानेही गंभीर आरोपांच्या प्रकरणांमध्ये उमेदवारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार विभागांना दिला आहे.

माहिती लपवली तर नोकरी गमावण्याचा धोका

भरती प्रक्रियेदरम्यान एफआयआर किंवा न्यायालयीन खटल्याची माहिती लपवणाऱ्या उमेदवाराला नोकरी लागल्यानंतरही काढून टाकले जाऊ शकते. माहिती लपवणारा उमेदवार “विश्वासार्हता” गमावतो आणि सरकारी सेवेसाठी अयोग्य ठरतो, असे न्यायालयाने अनेकदा स्पष्ट केलं आहे.

Satara News : कर्जबुडवणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई होणार; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा इशारा

न्यायालयीन खटल्यांनंतरही नोकरी मिळू शकते

किरकोळ कलमांखाली चालू असलेल्या खटल्यांमध्ये किंवा न्यायालयाने उमेदवाराला निर्दोष ठरवल्यास सरकारी नोकरी मिळण्याची संधी कायम असते. आरोप खोटे सिद्ध झाल्यास, साक्षीदार दुर्बल असल्यास किंवा पूर्ण दोष सिद्ध झाला नसल्यास विभाग नोकरी नाकारू शकत नाही. एफआयआर मागे घेतल्यानंतर, खटला रद्द झाल्यानंतर किंवा पोलिसांकडून क्लीन चिट मिळाल्यानंतरही नोकरी मिळण्यास अडथळा येत नाही. मात्र, संशयाच्या आधारे मिळालेल्या निर्दोष मुक्ततेच्या प्रकरणांमध्ये उमेदवारी रद्द होऊ शकते.

पोलिस पडताळणी महत्वाची

नोकरीपूर्वीच्या पोलिस पडताळणीत उमेदवाराचा चारित्र्य अहवाल तपासला जातो. प्रकरणाचे स्वरूप, गुन्हा गंभीर की किरकोळ, खटला प्रलंबित आहे की बंद, न्यायालयाचा निर्णय अशा निकषांवरून उमेदवार “योग्य” की “अयोग्य” ठरतो. सरकारी नोकरीसाठी एफआयआरचा परिणाम प्रकरणाच्या स्वरूपावर अवलंबून असतो. किरकोळ प्रकरणांत संधी कायम राहते; मात्र गंभीर गुन्ह्यांमध्ये अडथळे निर्माण होतात.

 

Web Title: Upsc criminal record rules can you get a government job after an fir important facts for competitive exam aspirants

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 04:34 PM

Topics:  

  • FIR
  • UPSC

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.