Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्राचीन नंदा देवींच्या मंदिरात दडले आहे ‘युरेनियमचे’ रहस्य; याच ठिकाणी भारत आणि अमेरिकेच्या गुप्तचरांनी चीनवर ठेवली होती नजर

चीनने 1964 मध्ये अणुचाचणी केली होती. यानंतर 1965 मध्ये अमेरिकन गुप्तचर संस्था CIA ने हिमालयाच्या शिखरांवरून चीनच्या आण्विक हालचालींवर नजर ठेवण्याची योजना बनवली. यासाठी भारतीय गुप्तचर विभागाची (आयबी) मदत घेऊन नंदादेवी पर्वतावर गुप्तचर उपकरणे बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 11, 2024 | 09:28 AM
Uranium secret lies in ancient almora nanda devi temple

Uranium secret lies in ancient almora nanda devi temple

Follow Us
Close
Follow Us:

धर्मशाला : नंदा देवी पर्वत उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून ७,८०० मीटरपेक्षा जास्त उंचीवर आहे. हे भारतातील दुसरे सर्वोच्च शिखर आहे. हे दोन भागांमध्ये विभागलेले आहे. पूर्वेकडील नंदा देवी आणि पश्चिमेकडील नंदा देवी पर्वत. पौराणिक मान्यतेनुसार, उत्तराखंडची प्रमुख देवता नंदा या पर्वतावर वास करते. आई नंदा ही उत्तराखंडची कुल देवी आहे. दरवर्षी नंदाष्टमीच्या दिवशी उत्तराखंडमधील विविध ठिकाणी भव्य नंदा देवी उत्सवाचे आयोजन केले जाते.

1965 पासून नंदादेवी पर्वताच्या शिखरावर एक रहस्य दडलेले आहे. भारत आणि अमेरिकेने 1965 मध्ये मिशन नंदादेवीच्या रूपात गुप्तचर ऑपरेशन सुरू केले होते. चीनच्या आण्विक क्रियाकलापांना आळा घालण्यासाठी 25 हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या नंदा देवी पर्वतावर किरणोत्सर्गी उपकरणे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Pic credit : social media

चीनवर इथूनच गुप्तचरांनी ठेवली होती नजर

चीनने 1964 मध्ये अणुचाचणी केली होती. यानंतर 1965 मध्ये अमेरिकन गुप्तचर संस्था CIA ने हिमालयाच्या शिखरांवरून चीनच्या आण्विक हालचालींवर नजर ठेवण्याची योजना बनवली. यासाठी भारतीय गुप्तचर विभागाची (आयबी) मदत घेऊन नंदादेवी पर्वतावर गुप्तचर उपकरणे बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. डोंगरावर ५६ किलोची उपकरणे बसवली जाणार होती. या उपकरणांमध्ये 8 ते 10 फूट उंचीचा अँटेना, दोन ट्रान्स रिसीव्हर सेट आणि न्यूक्लियर ऑक्झिलरी पॉवर जनरेटर (SNAP सिस्टीम) यांचा समावेश होता. हे उपकरण हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बच्या निम्मे वजनाचे होते. संघातील शेर्पांनी त्याचे नाव गुरिंगपोचे ठेवले. या गुप्त मोहिमेशी 200 लोकांची टीम निगडीत होती.

हे देखील वाचा :  कोणत्या ऑपरेशनमध्ये ‘Anti Drone Technology’ वापरली जाते? जाणून घ्या त्याची खासियत

इथे सापडले गुप्त रेडिओॲक्टिव्ह उपकरण

खराब हवामान आणि बर्फाचे वादळ यामुळे ही मोहीम यशस्वी होऊ शकली नाही आणि रेडिओ ॲक्टिव्ह उपकरण त्या शिखरावरील बर्फात गाडले गेले. एक वर्षानंतर 1966 मध्ये पुन्हा एकदा मिशन यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मे 1966 मध्ये, जुन्या टीमचे काही सदस्य आणि एक अमेरिकन अणुतज्ज्ञ पुन्हा नंदा देवी पर्वतावर या उपकरणाचा शोध घेण्यासाठी निघाले. उपकरणाच्या शोधात टीम नंदा देवी पर्वताच्या कॅम्प-4 वर पोहोचली. तिथे शोध सुरू केला तेव्हा ना ते उपकरण सापडले ना प्लुटोनियमच्या रॉड्सचा शोध लागला.

हे देखील वाचा : पुद्दुचेरीमधील ‘या’ ठिकाणी आहे गणेशाची अत्यंत दिव्य मूर्ती; दर्शनानंतर सर्वच मनोकामना होतात पूर्ण

आजपर्यंत या गुप्त रेडिओॲक्टिव्ह उपकरणाबद्दल काहीही सापडले नाही. या प्लुटोनियम कॅप्सूल 100 वर्षे सक्रिय राहू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. हे किरणोत्सर्गी यंत्र आजही त्याच भागात कुठेतरी पुरले आहे. म्हणजे त्यात युरेनियम पुरले आहे. त्यानंतर नंदा देवीच्या त्या भागाला नंदा देवी सरकारने बायोस्फीअर रिझर्व्ह घोषित केले आणि काही वर्षांसाठी ट्रॅक्टरलाही तेथे जाण्यास बंदी घालण्यात आली.

 

 

 

Web Title: Uranium secret lies in ancient almora nanda devi temple in this place the intelligence of india and america kept an eye on china nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2024 | 09:28 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.