फोटो सौजन्य - Social Media
‘Hollow Earth Theory’ प्रमाणे ‘Hollow Moon Theory’ ही अस्तित्वात आहे. ‘Hollow Earth Theory’ मध्ये पृथ्वी आतून पोकळ असून त्याच्या आतमध्येही एक विश्व वसले आहे. त्या विश्वाला स्वतःचे सौरमंडळ आहे. त्या विश्वाला स्वतःचे जीवन आहे, असे मांडण्यात आले आहे. ‘Hollow Moon Theory’ देखील याच थेअरीच्या सारखीच आहे. काही वैज्ञानिकांच्या अनुसार, चंद्र आतून भरीन नसून पोकळ आहे. या पोकळतेचे प्रमाण साधून काही जण ‘Hollow Moon Theory’ वर विश्वास ठेवतात. मुळात, हे संपूर्ण ब्रह्माण्ड विचाराच्या पलीकडचे आहे. आपण अद्याप याचा एक अंशदेखील शोधून काढला नाही आहे. हे विज्ञान फार मोठे आहे आणि त्याला समजणे फार कठीण आहे. तरी त्यावर सतत संशोधन सुरू असतात आणि ब्रह्माण्डाविषयी अनेक निष्कर्ष निघत असतात.
चंद्राच्या रचनेविषयीदेखील अनेक वैज्ञानिक आणि काल्पनिक सिद्धांत आहेत. त्यापैकी होलो मून थिअरी म्हणजेच “खोखली चंद्र सिद्धांत” हा एक वादग्रस्त आणि रोचक विचार आहे. 1970 मध्ये रशियन वैज्ञानिक मायकल वसीन आणि अलेक्झांडर श्रेबाकोव यांनी मांडलेल्या या सिद्धांतानुसार, चंद्र हा नैसर्गिक खगोलीय वस्तू नसून एका प्रगत परग्रहवासीयांनी तयार केलेली खोखली संरचना आहे.
या सिद्धांताचा पाया काही निरीक्षणांवर आधारित आहे. काही निरीक्षकांच्या आधारावर हा सिद्धांत मांडण्यात आला आहे. चंद्रावर असलेले खड्डे याबाबत संशोधन केल्यास समोर आले कि काही खड्ड्यांची खोली अपेक्षापेक्षा कमी आहे. यावरून असा अंदाज बांधता येतो कि चंद्राच्या पृष्ठाखाली मजबूत धातूचा स्तर आहे. इतकेच नव्हे तर चंद्राच्या कंपनांचाही अभ्यास करण्यात आला आहे. अपोलो मोहिमेदरम्यान, जेव्हा चंद्रावर उपकरणांनी धक्का दिला, तेव्हा त्याने “घंटा वाजल्यासारखा” आवाज केला. यावरून काही जणांनी चंद्र आतून पोकळ असल्याचा अंदाज बांधला होता.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता, चंद्राच्या खोलीसाठी आणि घनतेसाठी असे कोणतेही ठोस पुरावे नाहीत की तो पूर्णतः पोकळ आहे. ‘Hollow Moon Theory’ हा सिद्धांत खरा कि खोटा? हे सिद्ध करण्यासाठी कोणताही ठोस पुरावा अद्याप आपल्याकडे नाही. चंद्राची घनता आणि गुरुत्वाकर्षण क्षेत्र हे दर्शवतात की त्यामध्ये घन कोर आहे. तसेच, नैसर्गिक उपग्रहांच्या निर्मितीचा सध्या ज्ञात असलेला इतिहास हा या सिद्धांताला विरोध करतो.
हॉलो मून थिअरी ही विज्ञानकथेतील संकल्पनांवरही आधारित आहे. 20व्या शतकातील काही विज्ञानकथा लेखकांनी चंद्राला एक परग्रहवासीयांचा ठिकाण किंवा यान म्हणून दर्शवले आहे. वैज्ञानिक पुराव्याअभावी हा सिद्धांत वैध मानला जात नाही, पण विज्ञान व कल्पनाविष्कार यातील सीमारेषा शोधणाऱ्या उत्सुकांसाठी तो आकर्षणाचा विषय आहे.