
Why is International Equal Pay Day special for women Know its history and importance
International Equal Pay Day 2025 : आपल्या समाजात “काम समान, पण पगार वेगळा” ही विसंगती अजूनही कायम आहे. जगभरातील कोट्यवधी महिला आजही पुरुषांपेक्षा कमी पगार मिळवत आहेत. म्हणूनच १८ सप्टेंबर हा दिवस जागतिक स्तरावर “आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन” म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या आवाजाला ताकद देतो, त्यांच्या हक्कांसाठी लढा देतो आणि लिंगभेद मिटवण्यासाठी एक सामूहिक पाऊल उचलतो.
आजही संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, महिलांना पुरुषांपेक्षा २० टक्के कमी पगार मिळतो. म्हणजेच एकाच कामासाठी स्त्रियांना कमी मोबदला मिळतो. इतकेच नव्हे तर, ही दरी मिटवण्यासाठी जर प्रयत्न केले नाहीत तर ती कमी होण्यासाठी २५७ वर्षे लागू शकतात असेही अंदाज आहेत.
हा दिवस फक्त आकडेवारीवरच प्रकाश टाकत नाही, तर समाजाला प्रश्न विचारतो
“स्त्रीची मेहनत कमी आहे का?”
“तिच्या श्रमाची किंमत कमी का मोजली जाते?”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Shandong sky : चीनच्या आकाशात आता कोणी पाठवला धगधगता आगीचा गोळा? पाहा क्षेपणास्त्र हल्ल्याचा VIRAL VIDEO
यामुळे महिला समानतेच्या लढ्यात एक महत्त्वाचे वळण मिळाले.
भारतीय परंपरेत ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता’ असे म्हटले असले तरी वास्तव मात्र वेगळे आहे. आजही अनेक क्षेत्रांमध्ये महिलांना दुसऱ्या क्रमांकावर ढकलले जाते.
ही काही वास्तव उदाहरणे आहेत. परंतु, तरीही महिला प्रत्येक क्षेत्रात आपली कौशल्य, जिद्द आणि परिश्रमाची छाप सोडत आहेत. मग ते विज्ञान असो, क्रीडा, साहित्य, राजकारण किंवा उद्योजकता.
समान वेतन हा फक्त स्त्री-पुरुषांमधील वाद नाही. हा मुद्दा समाजाच्या समृद्धीशी निगडित आहे.
आज महिला मोठ्या धैर्याने काम करत आहेत. त्यांनी सिद्ध केले आहे की कोणत्याही क्षेत्रात पुरुषांइतकीच क्षमता त्यांच्यात आहे. पण, फक्त कौशल्य असून चालत नाही, त्याला योग्य मोबदला मिळायलाच हवा. भविष्यात समान वेतनाचा लढा हा फक्त महिलांचा राहणार नाही. तो मानवतेचा लढा ठरेल. कारण, स्त्री-पुरुष हे दोघेही समाजाचे समान आधारस्तंभ आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Zapad 2025 : ‘भारताच्या ‘अशा’ निर्णयाने अमेरिका अवाक्…’ पुतिन स्वतः पोहोचले ग्राउंड झिरोवर; संपूर्ण जगभर हलकल्लोळ
सरकारे, संस्था आणि समाज यांनी पुढाकार घेतला पाहिजे.
फक्त कायदे करून समानता मिळणार नाही, तर विचारांमध्ये बदल घडवणे गरजेचे आहे.
“आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन” आपल्याला हे स्मरण करून देतो की समानता ही फक्त घोषणेत नव्हे, तर प्रत्यक्ष आयुष्यात रुजली पाहिजे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात तितक्याच ताकदीने काम करत आहेत. मग त्यांना योग्य मानधन का मिळू नये? हा दिवस प्रत्येकाला विचार करायला भाग पाडतो समान कामासाठी समान वेतन हा मूलभूत हक्क आहे.