Zapad 2025 : भारताच्या ‘धडाकेबाज’ निर्णयाने अमेरिकेत खळबळ; पुतिन पोहोचले रणांगणावर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
रशिया-बेलारूसच्या झापड-२०२५ या महालष्करी सरावात भारतातील ६५ सैनिकांचा सहभाग, ज्यामुळे अमेरिकेत खळबळ.
जवळजवळ १ लाख सैनिक, अण्वस्त्र सज्ज बॉम्बर, युद्धनौका आणि तोफखाना यांच्या उपस्थितीत पुतिन यांनी रणांगणावरून थेट निरीक्षण.
भारतासोबत इराण, बांगलादेशासह इतर देशांचाही सहभाग; अमेरिकेनेही २०२२ नंतर प्रथमच याचे निरीक्षण केले.
International Military Exercises : रशिया आणि बेलारूस यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या झापड-२०२५ (Zapad 2025) या लष्करी सरावाने पुन्हा एकदा जागतिक पटलावर खळबळ माजवली आहे. या सरावाचे वैशिष्ट्य म्हणजे जवळपास १ लाख सैनिकांचा सहभाग, अण्वस्त्रसज्ज बॉम्बर, युद्धनौका, पाणबुड्या आणि तोफखाना यांची ताकद दाखवण्यात आली. पण या सरावातील सर्वात चर्चेचा मुद्दा ठरला तो म्हणजे भारताची धडाकेबाज एन्ट्री. भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, या सरावात ६५ भारतीय सैनिक सहभागी झाले होते. हा पाच दिवसांचा कार्यक्रम (१२ ते १६ सप्टेंबर) केवळ सैनिकी सराव नव्हता, तर तो भारत-रशिया लष्करी सहकार्याचा एक ठोस संदेश होता. विशेष म्हणजे, या हालचालीमुळे अमेरिकेत खळबळ माजली असून, धोरणकर्त्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या आहेत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लष्करी गणवेशात रणांगणावर हजेरी लावून निझनी नोव्हगोरोडमधील मुलिनो प्रशिक्षण भूमीवर सरावाचे थेट निरीक्षण केले. त्यांच्यासमोर बॉम्बर विमानांचे हवाई कवायती, टँकची रणनिती आणि नौदल जहाजांची सज्जता यांचे प्रदर्शन झाले. पुतिन यांनी स्पष्ट केले “या सरावाचा उद्देश रशियाची सुरक्षा बळकट करणे आणि शत्रूराष्ट्रांना ठोस संदेश देणे हा आहे.”
हे देखील वाचा : Happy Birthday PM Modi: ‘मी नरेंद्र दामोदरदास मोदी…’; संघर्षातून शिखरावर पोहोचलेल्या भारताच्या पंतप्रधानांचा प्रेरणादायी प्रवास
क्रेमलिनच्या माहितीनुसार, झापड-२०२५ सराव रशिया व बेलारूसमधील तब्बल ४१ वेगवेगळ्या प्रशिक्षण स्थळांवर झाला. या सरावासाठी ३३३ विमाने, २४७ नौदल जहाजे आणि आधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली वापरली गेली. जवळजवळ १,००,००० सैनिक यात सहभागी झाले, ज्यामुळे हा सराव जगभरातील सर्वात मोठ्या युद्ध कवायतांपैकी एक ठरला आहे.
भारताची उपस्थिती ही या सरावातील सर्वात महत्वाची घटना ठरली. कारण सध्या भारत-अमेरिका व्यापार संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमेरिका आशियामध्ये चीनला तोलण्यासाठी भारताला आपला प्रमुख रणनीतिक भागीदार मानते. अशावेळी भारताने रशियाच्या अशा सरावात सहभागी होणे हे अमेरिकन धोरणकर्त्यांसाठी ‘गेम-चेंजर प्रश्न’ ठरले आहे. रशियन वृत्तसंस्था TASS नुसार, भारताच्या सहभागाचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे “सहकार्य आणि परस्पर विश्वास” मजबूत करणे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारत या पावलाने रशियासोबतचे जुने लष्करी संबंध पुन्हा अधोरेखित करत आहे.
India 🇮🇳 accepted US 🇺🇸 challenge joining the Russian 🇷🇺-Belarusian military exercises. Zapad-2025 exercise are designed to simulate a conflict with adjacent NATO 🇪🇺 coalition.#Zapad2025 #India #Rusdia #Belarus pic.twitter.com/xSXp3Pb6lL
— Muhammed Faisal (@Intl_Mediatior) September 16, 2025
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : modi @75 : Thank You माझ्या मित्रा… ट्रम्प यांनी मोदींना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा; पंतप्रधानांनीही दिले ‘असे’ उत्तर
भारत एकटाच परदेशी सहभागी नव्हता. या सरावात इराण, बांगलादेश, बुर्किना फासो, काँगो व माली या देशांच्याही टास्क फोर्सने सहभाग नोंदवला. यामुळे झापड-२०२५ सराव केवळ रशिया-बेलारूसपुरता मर्यादित न राहता, अनेक राष्ट्रांना एकत्र आणणारा कार्यक्रम ठरला. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सरावाचे अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांनीही निरीक्षण केले. २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अमेरिकेने प्रथमच असे आमंत्रण स्वीकारले होते. यावरून अमेरिकेला परिस्थिती किती संवेदनशील आहे, हे स्पष्ट होते.
अमेरिकेला भारताची ही हालचाल धोक्याची घंटा वाटत आहे. कारण :
भारत रशियासोबत लष्करी मैत्री बळकट करत आहे.
चीनला रोखण्यासाठी अमेरिका भारतावर अवलंबून आहे.
भारताचा हा निर्णय अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक रणनीतीसाठी प्रश्न निर्माण करतो.
यामुळे अमेरिकेच्या राजनैतिक वर्तुळात चर्चा सुरू आहे “भारत खरंच अमेरिकेसोबत दीर्घकालीन भागीदारी करणार की रशियासोबत जुनी मैत्री टिकवणार?”
भारतातील धोरणकर्त्यांच्या मते, हा सराव हे एक संतुलन राखण्याचे धोरण आहे. एकीकडे भारत अमेरिकेसोबत रणनीतिक भागीदारी वाढवत आहे, तर दुसरीकडे रशियासोबतचे दीर्घकालीन लष्करी संबंध टिकवून ठेवत आहे. जागतिक पटलावर भारत स्वतःला ‘स्वतंत्र आणि बहुपदरी’ खेळाडू म्हणून मांडत आहे. झापड-२०२५ हा केवळ एक लष्करी सराव नव्हता, तर जागतिक समीकरणे बदलणारा एक मोठा संदेश होता. रशिया आणि बेलारूसने आपल्या शक्तीचे प्रदर्शन केले, पुतिन यांनी रणांगणावर हजेरी लावून विरोधकांना इशारा दिला. पण या संपूर्ण सरावातील सर्वात चर्चेचा मुद्दा भारत ठरला. भारताच्या सहभागाने अमेरिकेला अस्वस्थ केले आहे, तर रशियाला नव्या विश्वासाचा आधार मिळाला आहे. आगामी काळात भारताने कोणता मार्ग निवडायचा अमेरिकेच्या रणनीतिक वर्तुळात घट्ट सामील होणे की रशियासोबत जुनी मैत्री टिकवणे? हा प्रश्न आता आंतरराष्ट्रीय मंचावर अधिक गडद होणार आहे.