Why is this dry fruit eaten during Iftar in Ramadan 2025 Know its Islamic significance
मुंबई : इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्याची सुरुवात होताच उपवास करणाऱ्यांसाठी सकाळी सेहरी आणि संध्याकाळी इफ्तार याला विशेष महत्त्व प्राप्त होते. इफ्तारच्या वेळी प्रामुख्याने खजूर खाल्ले जातात, यामागे धार्मिक तसेच आरोग्यविषयक कारणे आहेत.
पैगंबर मोहम्मद आणि खजुरांचे महत्त्व
इस्लाम धर्मात खजूर खाण्याची परंपरा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. हजरत पैगंबर मोहम्मद यांना खजूर अतिशय प्रिय होते, आणि त्यांनी स्वतः उपवास सोडताना खजूर खाण्याची प्रथा सुरू केली. त्यामुळे इस्लाम धर्मात खजूर खाणे “सुन्नत” मानले जाते, म्हणजेच पैगंबरांच्या शिकवणीनुसार आचरण करणे. रमजानच्या काळात संपूर्ण जगभरातील मुस्लिम समुदाय खजूर खाण्याला प्राधान्य देतो. बाजारात या काळात खजुरांची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढते आणि त्याची दुकाने तसेच स्टॉल सजलेले दिसतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ऑस्कर ट्रॉफी विकली जाणार कवडीमोल भावात; लाखोंच्या सोन्याच्या ट्रॉफीची विक्री फक्त 87 रुपये
खजुरांची विविध प्रकारांतील वैशिष्ट्ये
खजुरांचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये मेजडोल खजूर हा सर्वात प्रसिद्ध आणि दर्जेदार प्रकार मानला जातो. त्याला ‘खजुरांचा राजा’ असेही म्हणतात. याशिवाय खूनी खजूर, हिलालवी खजूर आणि अंबर खजूर यांचीही मागणी मोठ्या प्रमाणावर असते. खजूर मुख्यतः अरबस्तान आणि आफ्रिकेतील देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. मात्र, भारतातील काही राज्यांमध्येही खजुराची लागवड केली जाते. बाजारात खजुरांचे दर वेगवेगळे असतात – काही खजूर १०० रुपये किलो दराने उपलब्ध असतात, तर काही उच्च प्रतीचे खजूर ५,००० रुपये किलो दराने विकले जातात.
आरोग्याच्या दृष्टीने खजुरांचे फायदे
खजूर खाण्याची प्रथा केवळ धार्मिक कारणांसाठी नाही, तर त्यामागे वैज्ञानिक कारणेही आहेत. खजूरमध्ये ग्लुकोज आणि नैसर्गिक साखरेचे प्रमाण अधिक असल्यामुळे, दिवसभर उपवास ठेवल्यानंतर शरीरातील ऊर्जा त्वरित पुनर्संचयित करण्यास मदत होते. रमजानमध्ये दिवसभर पाणीही पिऊ शकत नाही, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. खजूर खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषणद्रव्ये, ग्लुकोज आणि हायड्रेशन मिळते, त्यामुळे इफ्तारच्या वेळी खजूर खाणे उपयुक्त ठरते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Baba Vanga Prediction: 20 वर्षात ‘या’ देशांमध्ये येणार इस्लामिक राजवट; पहा बाबा वेंगाचे भाकीत
रमजान आणि खजूर यांचे अविभाज्य नाते
रमजान हा संयम, भक्ती आणि आत्मशुद्धीचा महिना मानला जातो. या काळात मुस्लिम बांधव सूर्योदयापूर्वी सेहरी करतात आणि सूर्यास्तानंतर इफ्तार करतात. पैगंबर मोहम्मद यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत, उपवास मोडताना खजूर खाण्याला विशेष महत्त्व दिले जाते. आजही ही परंपरा अविरत सुरू असून, रमजान महिन्यात खजुरांच्या खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळते. धार्मिक श्रद्धेबरोबरच आरोग्याच्या दृष्टीनेही खजूर एक महत्त्वाचे आणि उपयुक्त फळ आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.