Baba Vanga Prediction: 20 वर्षात 'या' देशांमध्ये येणार इस्लामिक राजवट; पहा बाबा वेंगाचे भाकीत ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
बल्गेरिया – जगप्रसिद्ध भविष्यवेत्ती बाबा वेंगा यांनी अनेक आश्चर्यकारक भाकीतं केली असून, त्यापैकी काही खरेही ठरले आहेत. त्यांच्या एका महत्त्वाच्या भविष्यवाणीनुसार, २०४३ पर्यंत युरोपमध्ये मुस्लिम सत्ता प्रस्थापित होईल आणि इस्लामिक राजवट प्रबळ होईल. लोकसंख्याशास्त्रीय आणि सांस्कृतिक बदल पाहता, हा अंदाज चर्चेचा विषय बनला आहे.
बाबा वेंगा: भविष्याचा वेध घेणारी गूढ महिला
बाबा वेंगा यांचे पूर्ण नाव वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा असे होते. त्या बल्गेरियातील सुप्रसिद्ध भविष्यवाणीकार होत्या. ३१ जानेवारी १९११ रोजी ऑट्टोमन साम्राज्याच्या स्ट्रुमिका भागात जन्मलेल्या बाबा वेंगा लहानपणी एका अपघातात अंध झाल्या. मात्र, यानंतर त्यांनी भविष्य पाहण्याची अलौकिक शक्ती प्राप्त केल्याचा दावा केला जातो. त्यांनी अनेक भविष्यवाणी केल्या, ज्यामध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन, ९/११ चा हल्ला आणि ब्रेक्झिटसारख्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांचे भाकीत कितपत खरे ठरते, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : युक्रेनसाठी युरोप एकत्र; अमेरिकेला उत्तर देण्यासाठी करणार महायुती
युरोपमध्ये मुस्लिम सत्ता प्रस्थापित होणार?
बाबा वेंगांच्या २०४३ सालासाठीच्या भाकितानुसार, युरोपमध्ये मुस्लिम समाजाची राजकीय सत्ता वाढेल आणि तेथे इस्लामिक राजवट येईल. त्यांच्या मते, हा बदल लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणामुळे होईल. अनेक युरोपीय देशांमध्ये स्थलांतरित मुस्लिम समाजाचा प्रभाव वाढत आहे, तसेच सांस्कृतिक आणि राजकीय परिस्थितीही बदलत आहे. तज्ज्ञांच्या मते, हे भाकीत युरोपमधील सामाजिक आणि राजकीय घडामोडींकडे निर्देश करते. सध्या अनेक देशांमध्ये धार्मिक आणि राजकीय स्तरावर मोठे परिवर्तन होत आहे. त्यामुळे हे भाकीत प्रत्यक्षात येईल का, याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
कम्युनिस्ट राजवटीचे पुनरागमन – २०७६ चे भाकीत
बाबा वेंगांनी आणखी एक महत्त्वाची भविष्यवाणी केली होती की, २०७६ पर्यंत जग पुन्हा एकदा कम्युनिस्ट विचारसरणीकडे वळेल. त्यांच्या मते, जागतिक स्तरावर सत्ताकेंद्रित शासन अधिक प्रभावी होईल आणि लोकशाही व्यवस्थेऐवजी समाजवाद किंवा साम्यवाद बळकट होईल. आजच्या घडीला जगभरातील अनेक देश लोकशाहीवर आधारित आहेत. मात्र, काही ठिकाणी साम्यवादी विचारसरणीला पुन्हा चालना मिळत आहे. चीन, उत्तर कोरिया आणि काही इतर देशांमध्ये कम्युनिस्ट व्यवस्था अजूनही अस्तित्वात आहे. त्यामुळे भविष्यात या विचारसरणीला अधिक बळ मिळेल का, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.
५०७९ मध्ये जगाचा अंत?
बाबा वेंगांच्या सर्वांत धक्कादायक भाकितांपैकी एक म्हणजे ५०७९ पर्यंत जगाचा अंत होईल. त्यांच्या मते, हा विनाश मानवनिर्मित नसून नैसर्गिक आपत्तींमुळे होईल. आजच्या घडीला हवामान बदल, पर्यावरणीय आपत्ती, महासाथी आणि जागतिक संघर्ष यांसारख्या समस्या वाढत आहेत. त्यामुळे बाबा वेंगांचे हे भाकीत कितपत खरे ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Multiple Marriages: एक नाही, दोन नाही… या व्यक्तीने केली 53 लग्न, जाणून घ्या त्याने का केले असे?
भविष्यवाण्यांविषयी मतमतांतरे
बाबा वेंगांच्या भविष्यवाण्यांना जगभरातील लोकांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले आहे. त्यांच्या समर्थकांचा विश्वास आहे की, त्यांचे अनेक भाकीतं अचूक ठरली आहेत, तर काही लोक त्यांच्या भाकितांकडे केवळ अंदाज म्हणून पाहतात. जरी विज्ञानाच्या दृष्टिकोनातून या भविष्यवाण्यांचे पुरावे नसले, तरी बाबा वेंगांच्या शब्दांनी जगभरातील लोकांच्या मनात गूढ भावना निर्माण केल्या आहेत. त्यांच्या भाकितांवर विश्वास ठेवायचा की नाही, हा प्रश्न प्रत्येकाच्या श्रद्धेवर अवलंबून आहे. मात्र, त्यांच्या भाकितांची चर्चा आजही सुरूच आहे आणि भविष्यात त्यांचा कितपत प्रभाव दिसतो, हे काळच ठरवेल.