Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Basketball Day 2025 : स्वप्न आशियाई स्पर्धेचे! आग्रा बास्केटबॉल असोसिएशनने घडवले भारतीय संघाचे शिलेदार

World Basketball Day 21 डिसेंबर रोजी येतो. गेल्या दशकात, देशातील बास्केटबॉलची स्थिती आणि दिशा पूर्णपणे बदलली आहे. एक काळ असा होता जेव्हा भारत आशियाई स्पर्धांसाठी पात्र होण्यासाठीही संघर्ष करत होता.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 21, 2025 | 08:48 AM
World Basketball Day 2025 Agra is becoming the new fortress of basketball Fortunes changed in a decade

World Basketball Day 2025 Agra is becoming the new fortress of basketball Fortunes changed in a decade

Follow Us
Follow Us:
  •  उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्हा बास्केटबॉलचा ‘कणा’ म्हणून उदयास आला असून, येथील खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत.
  •  गेल्या १० वर्षांत भारतीय बास्केटबॉलची स्थिती बदलली असून, पुरुष आणि महिला दोन्ही संघ आता आशियाई स्पर्धांमध्ये सातत्याने पात्र ठरत आहेत.
  • सेंट कॉनराड्सचा माजी कर्णधार दिवंगत अभय चौहानच्या स्मरणार्थ आयोजित स्पर्धांमुळे स्थानिक पातळीवर तरुणांना नवी दिशा मिळत आहे.

World Basketball Day December 21 2025 celebration : आज, २१ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण जगात ‘जागतिक बास्केटबॉल दिन’ (World Basketball Day) साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या एका दशकात भारतातील या खेळाची दिशा पूर्णपणे बदलली आहे. एकेकाळी आशियाई स्पर्धांसाठी पात्र ठरताना संघर्ष करणाऱ्या भारतीय बास्केटबॉलमध्ये आता आग्र्यासारख्या शहरांनी क्रांती घडवून आणली आहे. आग्रा जिल्हा आज केवळ उत्तर प्रदेशचाच नव्हे, तर देशाचा बास्केटबॉलमधील महत्त्वाचा आधारस्तंभ बनला आहे.

आग्रा: उत्तर प्रदेश बास्केटबॉलचा ‘रियल हिरो’

उत्तर प्रदेशच्या बास्केटबॉल संघांनी अलिकडच्या काळात सब-ज्युनियर, ज्युनियर, युथ आणि सिनियर अशा सर्व श्रेणींमध्ये देशातील अव्वल राज्यांमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. यामध्ये आग्रा जिल्ह्याचा वाटा मोलाचा आहे. आग्र्याचे ज्युनियर संघ नियमितपणे देशातील ‘टॉप ४’ मध्ये स्थान मिळवतात. वरिष्ठ मुलींच्या गटात आग्रा सातत्याने पहिल्या दोनमध्ये तर पुरुषांच्या गटात ‘टॉप ६’ मध्ये आपली रँकिंग राखून आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Violence: ज्याच्यामुळे बांगलादेश पेटला, त्याच्यावरच युनूसने उधळली स्तुतीसुमने; हादीच्या अंत्यसंस्काराला जनसागराचा ओघ

भारतीय संघातील आग्र्याचे चमकते तारे

उत्तर प्रदेशातील अनेक खेळाडूंनी भारतीय जर्सी घालून जगाला आपली ताकद दाखवली आहे. विशेष रघुवंशी यांनी भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवून एक वेगळा इतिहास रचला. सध्या कुशल आणि हर्ष डागर हे खेळाडू भारतीय संघात उत्तर प्रदेशचा झेंडा फडकवत आहेत. महिला विभागात वैष्णवी यादव, पूनम चतुर्वेदी आणि अनुष्का यांनी आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले आहे. आग्र्याचा उदयोन्मुख खेळाडू आशिष चौहान याची नुकतीच वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, वैशाली, वंदना आणि प्रज्ञा सिंग यांसारखे अनेक खेळाडू भारतीय संघाच्या उंबरठ्यावर आहेत.

🏀🌍 World Basketball Day 2025! Basketball fans around the globe came together to celebrate World Basketball Day on Dec. 21, the anniversary of when Dr. James Naismith introduced the sport in 1891. The NBA and basketball communities worldwide united through youth clinics, fan… pic.twitter.com/CABo6JyoDG — Sportblits (@sportblits__) December 20, 2025

credit : social media and Twitter

अभय चौहान: स्मृतींतून मिळणारी प्रेरणा

आग्र्यातील बास्केटबॉलची चर्चा अभय चौहानशिवाय अपूर्ण आहे. सेंट कॉनराड्स इंटर कॉलेजचा माजी कर्णधार असलेल्या अभयचे वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी मेंदूतील रक्तस्रावामुळे निधन झाले. मात्र, त्याचे वडील शरद चौहान यांनी अभयची आठवण जिवंत ठेवण्यासाठी दरवर्षी जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धांचे आयोजन सुरू केले आहे. या स्पर्धांमधून आज आग्र्यातील शेकडो मुले-मुली आपली स्वप्ने पूर्ण करत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Saudi Vision 2030: सौदी अरेबियात भारतीय कामगारांची चांदी; एक महिन्याची सुट्टी अन् व्हिसा जप्तीवर बंदी, पाहा संपूर्ण यादी

करिअरची नवी संधी

जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे संयुक्त सचिव रीनेश मित्तल यांच्या मते, बास्केटबॉल आता केवळ छंद राहिलेला नाही. आग्र्यातील अनेक खेळाडूंनी आपल्या खेळाच्या जोरावर यूपी पोलीस, CISF आणि इतर सरकारी विभागांमध्ये नोकऱ्या मिळवल्या आहेत. सेंट कॉनराड्सचे क्रीडा शिक्षक हरेंद्र प्रताप शर्मा (हॅपी) म्हणतात की, आग्र्यात शालेय पातळीवर पाया इतका मजबूत आहे की, इथून दरवर्षी ५-६ खेळाडू शालेय राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी निवडले जातात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जागतिक बास्केटबॉल दिन २१ डिसेंबरलाच का साजरा केला जातो?

    Ans: २१ डिसेंबर १८९१ रोजी डॉ. जेम्स नैस्मिथ यांनी बास्केटबॉलचा पहिला खेळ शोधून काढला होता, म्हणून हा दिवस निवडला गेला.

  • Que: उत्तर प्रदेशचे कोणते खेळाडू भारतीय बास्केटबॉल संघात खेळत आहेत?

    Ans: विशेष रघुवंशी, कुशल, हर्ष डागर, वैष्णवी यादव आणि पूनम चतुर्वेदी हे प्रमुख खेळाडू आहेत.

  • Que: आग्र्यामध्ये बास्केटबॉलच्या विकासाचे श्रेय कोणाला जाते?

    Ans: जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन, रिनेश मित्तल, हरेंद्र प्रताप शर्मा आणि विविध क्रीडा अकादमींच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे.

Web Title: World basketball day 2025 agra is becoming the new fortress of basketball fortunes changed in a decade

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 08:41 AM

Topics:  

  • day history
  • navarashtra special
  • navarashtra special story

संबंधित बातम्या

World Dream Day 2026: ‘स्वप्ने केवळ पाहण्यासाठी नसतात तर ती जगण्यासाठी असतात’; जागतिक स्वप्न दिनानिमित्त वाचा विशेष वृत्त
1

World Dream Day 2026: ‘स्वप्ने केवळ पाहण्यासाठी नसतात तर ती जगण्यासाठी असतात’; जागतिक स्वप्न दिनानिमित्त वाचा विशेष वृत्त

World Pharmacists Day: 25 सप्टेंबर रोजी का साजरा केला जातो जागतिक औषधशास्त्रज्ञ दिन? जाणून घ्या याचे विशेष महत्त्व
2

World Pharmacists Day: 25 सप्टेंबर रोजी का साजरा केला जातो जागतिक औषधशास्त्रज्ञ दिन? जाणून घ्या याचे विशेष महत्त्व

National Punctuation Day: ‘या’ खास दिनानिमित्त जाणून घ्या भाषेला जिवंत अन् अर्थपूर्ण बनवणाऱ्या विरामचिन्हांचे अनन्यसाधारण महत्त्व
3

National Punctuation Day: ‘या’ खास दिनानिमित्त जाणून घ्या भाषेला जिवंत अन् अर्थपूर्ण बनवणाऱ्या विरामचिन्हांचे अनन्यसाधारण महत्त्व

World Bollywood Day : मूकपटांपासून डिजिटल युगापर्यंत…’असा’ राहिला आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्ण प्रवास आणि भव्यता
4

World Bollywood Day : मूकपटांपासून डिजिटल युगापर्यंत…’असा’ राहिला आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्ण प्रवास आणि भव्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.