Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2026: फ्लॅट संस्कृतीत रांगोळीचा नवा ट्रेंड; वुडन, वुलन आणि मॅट रांगोळीला वाढती मागणी

Diwali 2026: बाजारात विविध आकारांतील स्टिकर रांगोळी, लक्ष्मीच्या पावलांचे स्टिकर्स आणि तोरणांचे स्टिकर्स उपलब्ध आहेत. याशिवाय नक्षीदार छाप रांगोळीसाठी चाळण्याही मिळत आहेत. साधारण १० ते ५० रुपयांपर्यंत या चाळण्यांचे दर आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 06, 2026 | 02:35 AM
वुलन रांगोळीने वेधले लक्ष

वुलन रांगोळीने वेधले लक्ष

Follow Us
Follow Us:
  • दिवाळीत वुडन, वुलन आणि मॅट रांगोळीला महिलांची पसंती
  • फ्लॅट संस्कृतीत स्टिकर व आर्टिफिशियल रांगोळीचे आकर्षण
  • नव्या डिझाईन्सना बाजारात मागणी
Pune/Diwali 2026: दिवाळी म्हटले की घरासमोर आकर्षक रांगोळी आणि त्याभोवती सजवलेल्या पणत्या, हे चित्र हमखास पाहायला मिळते. मात्र, बदलत्या जीवनशैलीबरोबर रांगोळीचे स्वरूपही बदलत आहे. पारंपरिक (Pune) रंगांच्या रांगोळीबरोबरच आता बाजारात वुडन, वुलन, मॅट आणि आर्टिफिशियल रांगोळीचे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. विशेषतः फ्लॅट संस्कृतीत कमी जागा आणि वेळेची मर्यादा लक्षात घेता महिलांकडून या पर्यायांना पसंती दिली जात आहे.

वुडन रांगोळीचा वेगळा अंदाज

लाकडापासून तयार केलेल्या नक्षीदार साच्यांमध्ये रंग भरून बनवलेली वुडन रांगोळी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. ही रांगोळी जमिनीवर काढण्याची किंवा चिकटवण्याची गरज नसते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवता येत असल्याने ती घराच्या प्रवेशद्वारासह विविध ठिकाणी ठेवता येते. गोल, चौकोनी अशा वेगवेगळ्या आकारांत ती उपलब्ध आहे.
Lakshmi Pujan: गरोदरपणात लक्ष्मीपूजन करता येते का? जाणून घ्या धर्मशास्त्र आणि आरोग्यशास्त्रातील नियम

मॅट रांगोळीचा सोपा पर्याय

रांगोळी काढण्याची कला अवगत नसलेल्या महिलांसाठी मॅट रांगोळी उपयुक्त ठरत आहे. सुट्या भागांमध्ये मिळणाऱ्या या रांगोळीची पॅकिंगवरील नमुन्यानुसार मांडणी करता येते. विशेष म्हणजे ती पुन्हा वापरता येते. त्यामुळे सणाच्या काळात स्वच्छता आणि सजावटीची कामे सांभाळताना महिलांचा वेळ वाचतो.

वुलन रांगोळीने वेधले लक्ष

लोकरीच्या आणि रेशमी धाग्यांपासून तयार केलेली वुलन रांगोळीही यंदा विशेष आकर्षण ठरत आहे. विविध फुलांच्या आकारांतील आणि फ्लोरोसंट रंगांतील डिझाईन्समुळे घराला आकर्षक लूक मिळतो. ही रांगोळी धुता येत असल्याने पुन्हा वापरणे शक्य आहे. घराचे कोपरे, पायऱ्या आणि भिंतींच्या कडेला तिची सजावट करता येते.
Vasubaras 2026: दिवाळीची सुरुवात वसुबारसपासून का होते? गाय आणि वासराची पूजा करण्यामागील धार्मिक महत्त्व जाणून घ्या
स्टिकर रांगोळीचीही मागणी
बाजारात विविध आकारांतील स्टिकर रांगोळी, लक्ष्मीच्या पावलांचे स्टिकर्स आणि तोरणांचे स्टिकर्स उपलब्ध आहेत. याशिवाय नक्षीदार छाप रांगोळीसाठी चाळण्याही मिळत आहेत. साधारण १० ते ५० रुपयांपर्यंत या चाळण्यांचे दर आहेत. कमी वेळेत आकर्षक सजावट करण्यासाठी महिलांकडून या पर्यायांचा वापर केला जात आहे.
दिवाळीमध्ये या रांगोळ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी कमी वेळेत घराची आकर्षक सजावट करण्याचा हा उत्तम पर्याय आहे. तसेच, घरी राहणाऱ्या महिलांनाही अशा प्रकारच्या रांगोळ्या तयार करून विक्री करण्याची संधी आहे. यातून त्या घरबसल्या छोटा व्यवसाय सुरू करून आर्थिक उत्पन्न मिळवू शकतात.
– शिवानी पठारे, वुलन रांगोळी तयार करणारी महिला
💡

Frequently Asked Questions

  • Que: दिवाळीनिमित बाजारात कोणत्या गोष्टींना मागणी वाढली आहे?

    Ans: बाजारात विविध आकारांतील स्टिकर रांगोळी, लक्ष्मीच्या पावलांचे स्टिकर्स आणि तोरणांचे स्टिकर्स यांना मागणी वाढली आहे.

  • Que: दिवाळीत कोणत्या रांगोळ्यांना मागणी वाढली आहे?

    Ans: दिवाळीत स्टिकर रांगोळी, वुलन रांगोळीची मागणी वाढली आहे.

Web Title: Pune market people womens demand to new rangoli woolen mat diwali 2026 tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Diwali 2026
  • navarashtra special
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Water News: पुण्याचा पाणीप्रश्न CM फडणवीसांच्या कोर्टात; स्वतंत्रपणे 13 टीएमसी…, काय आहे मागणी?
1

Pune Water News: पुण्याचा पाणीप्रश्न CM फडणवीसांच्या कोर्टात; स्वतंत्रपणे 13 टीएमसी…, काय आहे मागणी?

Tukaram Mundhe: दिवाळीत मिठाई-खवा खरेदी करताय? थांबा! तुकाराम मुंढेंचा नागरिकांना सावधानतेचा इशारा; ६४ कोटींचा अन्नसाठा जप्त
2

Tukaram Mundhe: दिवाळीत मिठाई-खवा खरेदी करताय? थांबा! तुकाराम मुंढेंचा नागरिकांना सावधानतेचा इशारा; ६४ कोटींचा अन्नसाठा जप्त

पुण्याच्या ARAPL ची अमेरिकेत मोठी झेप; जगातील पहिल्या १३ रोबोटिक्स कंपन्यांमध्ये स्थान
3

पुण्याच्या ARAPL ची अमेरिकेत मोठी झेप; जगातील पहिल्या १३ रोबोटिक्स कंपन्यांमध्ये स्थान

आढावा बैठकीला गैरहजर, कामकाजही प्रलंबित; दोन सह दुय्यम निबंधकांना कारणे दाखवा नोटीस
4

आढावा बैठकीला गैरहजर, कामकाजही प्रलंबित; दोन सह दुय्यम निबंधकांना कारणे दाखवा नोटीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.