Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Fish Migration Day 2025 : स्थलांतरित मासे म्हणजे निसर्गातील एक विलक्षण चमत्कार जणू

World Fish Migration Day 2025 : सजीव आणि निसर्गातील महत्त्वपूर्ण नात्याला उजाळा देणारा ‘जागतिक मासे स्थलांतर दिन’ हा दर दोन वर्षांनी साजरा केला जाणारा एक जागतिक स्तरावरील जनजागृतीचा उपक्रम आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 25, 2025 | 09:42 AM
World Fish Migration Day Learn imagine and act to protect migratory fish

World Fish Migration Day Learn imagine and act to protect migratory fish

Follow Us
Close
Follow Us:

World Fish Migration Day 2025 : पाणी ही जीवनरेषा आहे आणि स्थलांतरित मासे या जीवनरेषेचे अत्यंत महत्त्वाचे घटक. याच सजीव आणि निसर्गातील महत्त्वपूर्ण नात्याला उजाळा देणारा ‘जागतिक मासे स्थलांतर दिन’ हा दर दोन वर्षांनी साजरा केला जाणारा एक जागतिक स्तरावरील जनजागृतीचा उपक्रम आहे. या दिवशी जगभरातील संस्था, पर्यावरणप्रेमी, शाळा, संशोधक आणि स्थानिक समुदाय नद्या, मासे आणि लोकांना जोडणारे विविध कार्यक्रम आणि उत्सव आयोजित करतात. ही दिनविशेष संकल्पना २०१४ ते २०२४ पर्यंत ‘वर्ल्ड फिश मायग्रेशन फाउंडेशन’ (WFMF) या संस्थेने पुढे नेली. आता २०२५ पासून हाच उपक्रम नेदरलँड्समधील ‘VENAE’ ही संस्था राबवत असून, हर्मन वॅनिंगेन हे संस्थापक आणि प्रमुख आयोजक म्हणून काम पाहत आहेत.

स्थलांतरित मासे, निसर्गातील एक विलक्षण चमत्कार

स्थलांतरित मासे हे त्यांच्या जीवनचक्रात दीर्घ अंतर पार करून नदी-समुद्रांच्या दरम्यान प्रवास करणारे जलजीव आहेत. हे मासे केवळ अन्नसाखळीचा भाग नाहीत, तर मानव आणि मानवेतर प्रजाती, जमीन आणि पाण्याशी सखोल नातं जोडणारे जैवसाखळीतील महत्त्वाचे घटक आहेत. जागतिक स्तरावर दरवर्षी स्थानिक कार्यक्रमांद्वारे ‘जागतिक मासे स्थलांतर दिन’ साजरा केला जातो. या उपक्रमांचा उद्देश स्थलांतरित माशांबद्दल शिकणे, त्यांची कल्पना करणे आणि त्यांच्यासाठी कृती करणे हा असतो. मुक्त वाहणाऱ्या नद्यांची गरज, मासांमधील जैवविविधता, आणि मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण होणारे धोके याबाबत जागरूकता वाढवणे हे या मोहिमेचे मूळ उद्दिष्ट आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : युद्धाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले, भारताच्या ‘S-400’ ने पाकच्या AWACS चा उडवला धुवा; रचला विश्वविक्रम

गोड्या पाण्यातील माशांचे लुप्त होणारे अस्तित्व, गंभीर चेतावणी

अलीकडे WFMF, ZSL, IUCN, WWF आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनी एक संयुक्त अभ्यास अहवाल प्रसिद्ध केला असून, गोड्या पाण्यातील स्थलांतरित मासांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे त्यातून समोर आले आहे. १९७० ते २०२० या ५० वर्षांच्या कालावधीत जागतिक स्तरावर स्थलांतरित माशांच्या संख्येत तब्बल ८१% घट झाली आहे. लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियनमध्ये ही घट ९१% तर युरोपमध्ये ७५% इतकी आपत्तीजनक नोंदवली गेली आहे. ही आकडेवारी ‘लिव्हिंग प्लॅनेट इंडेक्स’ (LPI) च्या नव्या अहवालात स्पष्ट झाली आहे.

अधिवासांचे नष्ट होणे आणि अडथळे, मुख्य धोके

या घटतेपणामागची प्रमुख कारणं म्हणजे

1. नद्यांवर बांधण्यात आलेली धरणं आणि इतर अडथळे

2. पाणथळ भागांचे शेतीसाठी रूपांतर

3. अति मासेमारी आणि अतिरेकी शोषण

4. प्रदूषणाचे वाढते प्रमाण

5. हवामान बदलाचे भयावह परिणाम

हे सर्व घटक माशांच्या स्थलांतराच्या नैसर्गिक मार्गात अडथळे निर्माण करतात. परिणामी, माशांचे प्रजनन, अन्नसाखळी आणि जैवविविधतेवर विपरित परिणाम होतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : डोनाल्ड ट्रम्पचे ‘Air Force One’ जगात भारी; राजेशाही थाट पाहून तुमचेही डोळे दीपतील

काय करता येईल?  आपणही जबाबदारी स्वीकारूया

या जागतिक दिनाच्या निमित्ताने नागरिकांनी नद्यांची स्वच्छता, धरण बांधकामांवरील पुनर्विचार, जैवविविधतेची जपणूक आणि पर्यावरणसंवेदनशील विकास यांसाठी आवाज उठवावा. पाण्यातील जीवनाकडे फक्त अन्न किंवा व्यापाराच्या दृष्टिकोनातून न पाहता, त्यांचं जीवनही जपण्यासारखं आहे, हे समजून कृती केली पाहिजे. “नद्या वाहू द्या, मासे पोहू द्या आणि जीवन फुलू द्या”  या संदेशासह जागतिक मासे स्थलांतर दिन एक नवीन पर्यावरणीय जागृती घडवतो. आपण त्याचे भाग होऊया शिकूया, कल्पना करूया आणि कृती करूया.

Web Title: World fish migration day learn imagine and act to protect migratory fish

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2025 | 09:19 AM

Topics:  

  • Fish market
  • Fishery
  • navarashtra special story

संबंधित बातम्या

International Medical Transport Day : आजच्या ‘या’ खास दिवशी केला जातो जीव वाचवणाऱ्या अज्ञात नायकांचा सन्मान
1

International Medical Transport Day : आजच्या ‘या’ खास दिवशी केला जातो जीव वाचवणाऱ्या अज्ञात नायकांचा सन्मान

World Mosquito Day : 2025 मध्ये का वाढला आहे डासांचा धोका? जाणून घ्या उपाय आणि प्रतिबंध
2

World Mosquito Day : 2025 मध्ये का वाढला आहे डासांचा धोका? जाणून घ्या उपाय आणि प्रतिबंध

National Black Cat Appreciation Day : इजिप्तपासून भारतापर्यंत… काय आहे ‘Black Cat’s’ चा गूढ इतिहास?
3

National Black Cat Appreciation Day : इजिप्तपासून भारतापर्यंत… काय आहे ‘Black Cat’s’ चा गूढ इतिहास?

World Honey Bee Day 2025 : परागीकरणापासून औषधांपर्यंत…  मधमाश्या खरंच आहेत निसर्गाची जादू!
4

World Honey Bee Day 2025 : परागीकरणापासून औषधांपर्यंत… मधमाश्या खरंच आहेत निसर्गाची जादू!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.