कला, विद्या आणि कौशल्य हे प्रत्येक व्यक्तीमध्ये निसर्गत: असतात. प्रत्येकामध्ये काही ना काही एक सुप्त कौशल्य असतात. या गोष्टींचा विचार करत संयुक्त राष्ट्र महासभेने 2014 मध्ये समिती स्थापन केली. हा दिन साजरा करण्याचा उद्देश म्हणजे तरुणांमध्ये रोजगारक्षम कौशल्यांचा विकास, उद्योजकता वाढवणे आणि त्यांना कार्यक्षम व आत्मनिर्भर बनवणे. जागतिक पातळीवर पाहायला गेलं तर आताच्या युगात मेहनती असून देखील तरुणांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे अनेक तरुण मंडळी आपल्या कौशल्याच्या जोरावर स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी काही ना काही छोटं मोठं काम करत असतात. 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने (United Nations General Assembly) 15जुलै हा दिवस “जागतिक युवा कौशल्य दिन” म्हणून घोषित केला होता. असं म्हणतात की हा निर्णय हा निर्णय श्रीलंका सरकारच्या प्रस्तावावरून घेण्यात आला होता. “जागतिक युवा कौशल्य दिन” जेव्हा 1 वर्ष झालं त्यावेळी यावेळी युनेस्को (UNESCO), यूएनईव्हीओसी (UNEVOC), आणि ILO (International Labour Organization) यांनी तरुणांसाठी वेगवेगळ्या कौशल्य विकास कार्यक्रमांचे आयोजन केले.
जागतिक कौशल्य दिनाचं महत्व काय ?
जगभरातील 45 कोटी तरुण (15-24 वयोगटातील) शिक्षण, प्रशिक्षण किंवा रोजगाराविना आहेत.अनेकांना गुणवत्तापूर्ण कौशल्य प्रशिक्षण मिळत नाही.त्यामुळे तरुण वर्ग कायमच बेरोजगारीचा सामना करत आहेत.हीच बाब लक्षात घेत एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ तयार करण्यात आले, जे युवा कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करते.तरुणांना आधुनिक काळातील गरजांनुसार कौशल्ये शिकवणे.व्यावसायिक शिक्षण (Vocational Training) आणि तांत्रिक शिक्षणाला प्रोत्साहन देणे.रोजगार, स्वयंरोजगार व उद्योजकतेसाठी तरुणांना सज्ज करणं. योग्य शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी हे व्यासपीठ संयुक्त संयुक्त राष्ट्र महासभेने 2014 मध्ये स्थापन केलं.
देशपातळीवर देखील भारत सरकारनेही “कौशल्य भारत अभियान” (Skill India Mission) सुरू करून लाखो तरुणांना प्रशिक्षण, मार्गदर्शन व रोजगार संधी दिल्या आहेत.आजच्या युगात अनेक तरुण शिक्षण घेत असूनही बेरोजगार आहेत. कारण त्यांच्या शिक्षणात व्यावसायिक व कौशल्य प्रशिक्षणाचा अभाव असतो. जगभरातील कोट्यवधी तरुण योग्य कौशल्य नसल्यामुळे नोकरी, व्यवसाय किंवा उद्योजकतेपासून दूर राहतात. हीच गरज ओळखून, जागतिक पातळीवर तरुणांसाठी कौशल्य प्रशिक्षणावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला.ILO (International Labour Organization) च्या मते, 2025पर्यंत जवळपास 60कोटी तरुणांना रोजगारासाठी प्रशिक्षणाची गरज भासणार आहे.सध्या अनेक तरुण “NEET” श्रेणीत येतात – म्हणजे Not in Education, Employment or Training हे प्रमाण कमी करण्यासाठी हा दिवस उपयुक्त ठरतो. त्याचबरोबर कौशल्य भारत अभियान (Skill India Mission) – 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे.