Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयपीएल लिलावासाठी 1214 खेळाडूंची नोंदणी, 896 भारतीय आणि 318 परदेशी खेळाडूंचा समावेश

मेगा लिलावासाठी जाहीर करण्यात आलेल्या 2 कोटींच्या मूळ किमतीच्या यादीत 49 खेळाडू आहेत. या यादीत 17 भारतीय आहेत, तर 32 परदेशी खेळाडू आहेत. भारताकडून रविचंद्रन अश्विनशिवाय श्रेयस अय्यर, शिखर धवन, इशान किशन, सुरेश रैना यांची नावे या यादीत आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 22, 2022 | 01:51 PM
आयपीएल लिलावासाठी 1214 खेळाडूंची नोंदणी, 896 भारतीय आणि 318 परदेशी खेळाडूंचा समावेश
Follow Us
Close
Follow Us:

यंदाच्या आयपीएलचा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला होणार आहे. शनिवारी बीसीसीआयने 1,214 खेळाडूंची यादी जाहीर केली. या खेळाडूंमध्ये 896 भारतीय आणि 318 परदेशी खेळाडू आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या मेगा लिलावात 10 संघ सहभागी होणार आहेत. यासाठी 270 कॅप्ड खेळाडू, 903 अनकॅप्ड खेळाडू आणि 41 सहयोगी देशांतील खेळाडूंची नोंदणी झाली आहे.

यावेळी अनेक मोठे खेळाडू या स्पर्धेत भाग घेणार नाहीत. वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ख्रिस गेलने लिलावात आपले नाव दिलेले नाही. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क, इंग्लंडचा सॅम कुरन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जो रूट, ख्रिस वोक्स यांनीही लिलावात आपली नावे समाविष्ट केलेली नाहीत. प्रत्येक फ्रँचायझीच्या संघात 25 खेळाडू असतील तर लिलावात 217 खेळाडू विकत घेतले जातील. त्यामध्ये ७० विदेशी खेळाडूंची नावे असतील. त्यामुळे सर्व संघ आपला खेळाडूंचा कोटा पूर्ण करतील, असा विश्वास आहे. अशा स्थितीत लिलावात 200 हून अधिक खेळाडूंच्या नावांवर बोली लागण्याची दाट शक्यता आहे.

17 भारतीय खेळाडू आणि 32 विदेशी खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी

मेगा लिलावासाठी जाहीर करण्यात आलेल्या 2 कोटींच्या मूळ किमतीच्या यादीत 49 खेळाडू आहेत. या यादीत 17 भारतीय आहेत, तर 32 परदेशी खेळाडू आहेत. भारताकडून रविचंद्रन अश्विनशिवाय श्रेयस अय्यर, शिखर धवन, इशान किशन, सुरेश रैना यांची नावे या यादीत आहेत.

त्याचबरोबर परदेशी खेळाडूंमध्ये डेव्हिड वॉर्नर, कागिसो रबाडा, ड्वेन ब्राव्हो यांच्याशिवाय पॅट कमिन्स, अॅडम झाम्पा, स्टीव्ह स्मिथ, शाकिब अल हसन, मार्क वुड, ट्रेंट बोल्ट आणि फाफ डू प्लेसिस यांसारखी मोठी नावे आहेत. 12 आणि 13 फेब्रुवारीला बेंगळुरू येथे होणाऱ्या मेगा लिलावात फ्रँचायझींनी निवडलेली नावे बोलीसाठी मांडली जातील.

33 खेळाडूंना ठेवण्यात आलं कायम

आयपीएल 2022 साठी 33 खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे. 8 संघांनी 27 खेळाडूंना कायम ठेवले आहे. त्याच वेळी, 2 नवीन आयपीएल संघांनी त्यांच्या संघात 6 खेळाडूंचा समावेश केला आहे. केएल राहुलला लखनऊने 17 कोटींमध्ये त्याच्या टीमसोबत जोडले आहे.

यासह तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. याआधी आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीला 2018 ते 2021 या हंगामात केवळ 17 कोटी रुपये मिळत होते. लखनऊने केएलला आपल्या संघाचा कर्णधार बनवले आहे.

2018 सालानंतर आयपीएलचा पहिला मोठा लिलाव होणार आहे. IPL 2018 च्या मेगा लिलावात एकूण 8 संघ होते. यावेळी 10 संघ लिलावात सहभागी होणार आहेत. 10 संघांनी मिळून 33 खेळाडूंवर एकूण 338 कोटी रुपये खर्च केले आहेत.

[read_also content=”नवी मुंबई : मुलांना जन्म देऊन त्यांना लाखो रुपयांना विकायचे! तीन मुलांना विकणारी निर्दयी आई पोलिसांच्या ताब्यात बाप फरार https://www.navarashtra.com/thane/kokan/thane/navi-mumbai-giving-birth-to-children-and-selling-them-for-lakhs-of-rupees-father-absconding-in-police-custody-nrvk-226151.html”]

Web Title: 1214 players registered for ipl auction including 896 indian and 318 foreign players

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2022 | 01:43 PM

Topics:  

  • cricket
  • ipl auction

संबंधित बातम्या

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव
1

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?
2

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
3

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
4

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.