फोटो सौजन्य - बीसीसीआय
India vs West Indies Day 3 First Session Report : भारताचे संघाने या कसोटी मालिकेचे पहिल्या सामन्यात कमालीची कामगिरी केली आहे. भारताच्या संघाने 448 धावांवर डाव घोषित केला. वेस्टइंडीज समोर या सामन्यात विजय मिळवण्यासाठी 286 धावांचे लक्ष उभे केले होते. तिसऱ्या दिनाचे पहिल्या सेशनमध्ये भारताच्या संघाने अर्ध्या संघाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. दुसरा इनिंगमध्ये एथेनेज वगळता वेस्टइंडीजच्या संघामधून कोणत्याही फलंदाजाने 20 चा आकडा पार केलेला नाही.
तिसऱ्या दिनी पहिला सेशनमध्ये भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा याने शतक ठोकल्यानंतर आता तिसऱ्या दिवशी त्याने तीन विकेट्स घेतले आहेत. रवींद्र जडेजा याने जॉन कॅम्पबेल, ब्रायोडॉन किंग आणि शाई होप यांना बाहेरचा रस्ता दाखवला. तर कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांच्या देखील हाती एक एक विकेट लागली. पहिल्या सेशनमध्ये वेस्टइंडीज च्या संघाने पाच विकेट्स गमावून २७ ओवर मध्ये 66 धावा केला आहेत. भारताच्या गोलंदाजांची आणखी एकदा कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळाली.
That will be Lunch on Day 3️⃣ 3️⃣ wickets for Ravindra Jadeja 👌
1️⃣ wicket each for Kuldeep Yadav and Mohd. Siraj 👏#TeamIndia are 5️⃣ wickets away from winning the first #INDvWI Test 💪 Scorecard ▶️ https://t.co/MNXdZceTab@IDFCFIRSTBank pic.twitter.com/5zXp1446sP — BCCI (@BCCI) October 4, 2025
त्याचबरोबर ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा या दोघांनीही शतके ठेवली. ध्रुव जुरेल याने भारतीय संघासाठी त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठोकले त्याने संघासाठी 125 धावा केल्या यामध्ये त्यांनी तीन षटकार आणि पंधरा चौकार मारले. भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा याने आणखी एकदा स्वतःला सिद्ध केले. रवींद्र जडेजा याने संघासाठी नाबाद खेळली त्याने संघासाठी 104 धावा केले यामध्ये त्यांनी पाच षटकार आणि सहा चौकार मारले.
सध्या वेस्टइंडीज संघाने पाच विकेट कमावल्यानंतर जस्टिन ग्रिप्स आणि ॲलेक अत्यनाझे हे फलंदाजी करत आहेत. ॲलेक अथनझे याने आतापर्यंत सत्तावीस धावा केल्या आहे यामध्ये त्याने तीन चौकार मारले आहेत. भारताच्या संघाच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर भारताच्या तीन फलंदाजांनी शतके ठोकली आहेत. यामध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल याने कमालीचा खेळ दाखवला त्याने संघासाठी दोन दिवस फलंदाजी करत 100 धावा पुर्ण केल्या यामध्ये त्याने 12 चौकार ठोकले होते.