मुंबई : आयपीएलच्या (IPL) धर्तीवर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वतीने पहिल्या सत्राच्या महिला प्रीमियर लीगचे (Women Premier League) आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या महिला प्रीमियर लीग (WPL) साठी खेळाडूंचा लिलाव सुरू झाला आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरू असलेला लिलाव स्मृती मानधना या नावाने सुरू करण्यात आला.
पहिल्यांदाच मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये महिला आयपीएलसाठी 5 संघांमधील 448 खेळाडूंचा लिलाव होत आहे. 5 संघांमध्ये मुंबई, लखनौ, बंगळुरू, अहमदाबाद आणि दिल्ली या संघांचा समावेश आहे. 4 मार्चपासून सुरू होणार्या, 50 लाखांच्या मूळ किंमतीच्या या स्पर्धेत 24 खेळाडू आणि 40 लाखांच्या स्लॉटमध्ये 30 खेळाडू आहेत.
कोणाला मिळाली किती बोली जाणून घेऊया…
स्मृती मानधनाला 3.40 कोटी
भारतीय संघाची सलामीवीर स्मृती मानधनाला बेंगळुरूने 3.40 कोटींना विकत घेतले.
मुंबईकडून हरमनप्रीत कौर
भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्सने 1.80 कोटी रुपयांची बोली लावली आहे.
डियांड्रा डॉटिन
गुजरातने वेस्ट इंडिजच्या डिआंड्रा डॉटिनला 60 लाखांमध्ये विकत घेतले.
आरसीबीने सोफी डिव्हाईनला
न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाईनला बेंगळुरूने 50 लाखांच्या मूळ किंमतीला विकत घेतले.
पूजा वस्त्राकर
अष्टपैलू पूजा वस्त्राकर महिला IPL 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे.