Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paris Olympic 2024 : स्टेडियम नव्हे तर नदीवर होणार पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा, पदकावर आयफेल टॉवरच्या लोखंडाचा तुकडा

२६ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकचा श्रीगणेशा होणार आहे. जगातील सर्वात जुनी स्पर्धा म्हणून ऑलिम्पिकची ओळख आहे. यंदा ऑलिम्पिकसाठी पॅरिसमध्ये भव्यदिव्य आयोजन करण्यात आले आहे. भारतचे या स्पर्धेसाठी १२० खेळाडू जाणार आहेत. तर जगभरातून १०००० पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभागी झाले आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 12, 2024 | 02:50 PM
फोटो सौजन्य - The Olympic Games X अकाउंट

फोटो सौजन्य - The Olympic Games X अकाउंट

Follow Us
Close
Follow Us:

पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळा खास : 26 जुलैपासून ऑलिम्पिकला सुरुवात होणार आहे. यावेळी भारताचे 120 खेळाडू जाणार आहेत. यामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे भारताच्या खेळाडूंकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 10000 हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेला खास बनवण्यासाठी पॅरिसने गेल्या 10 वर्षांपासून अनेक विशेष तयारी केली आहे. येथे आम्ही तुम्हाला 2024 च्या ऑलिम्पिकची वैशिष्ट्ये सांगणार आहोत. ऑलिम्पिक उद्घाटन सोहळा कुठे होणार आहे, त्याचबरोबर यंदाच्या ऑलिम्पिकच्या मेडलमध्ये काय विशेष आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे खेळ पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये खेळले जाणार

असे अनेक खेळ आहेत जे आगामी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सामील होणार आहेत. यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्केटबोर्डिंग, सर्फिंग आणि स्पोर्ट्स क्लाइंबिंगचाही ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर काही खेळ या ऑलिम्पिकचा भाग नसणार आहेत. यामध्ये कराटे, बेसबॉल आणि सॉफ्टबॉल हे खेळ टोकियो ऑलिम्पिकचा भाग होते, पण यावेळी ते काढून टाकण्यात आले आहेत. ज्या नवीन खेळाडूंचा आज समावेश करण्यात आला आहे त्यासाठी भारताचा एकही खेळाडू पात्र ठरलेला नाही. भारताचे १२० खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा समवेश आहे.

असा होणार ऑलिम्पिकचा भव्यदिव्य उद्घाटन सोहळा

यंदाचे ऑलिम्पिकचे यजमानपद पॅरिसकडे सोपवण्यात आले आहे, त्यामुळे यावेळी ऑलिम्पिकचा हा सोहळादेखील मोठ्या थाटात होणार आहे. पॅरिसमध्ये ऑलिम्पिकची खास तयारी करण्यात आली आहे. पॅरिस 2024 ऑलिम्पिकचा उद्घाटन सेरी नदीवर आयोजित करण्यात आला आहे. यावेळी खेळाडू बोटीने त्यांच्या देशाचे झेंडे घेऊन आयफेल टॉवरच्या दिशेने जाणार आहेत. याआधी झालेले सोहळे हे मोठ्या मैदानावर आयोजित करण्यात आले होते, पहिल्यांदाच हा सोहळा नदीवर होणार आहे.

यंदाचे ऑलिम्पिक पदक खास

पॅरिस ऑलिम्पिकचे यंदाचे जे पदक असणार आहे त्याचे सुद्धा वैशिष्ठ आहे. पदकाची रचना केवळ विलक्षणच नाही तर प्रत्येक पदकावर आयफेल टॉवरही कोरलेला आहे. पदकाच्या रचनेत फ्रान्सचा आत्मा दिसून येईल. प्रत्येक पदकाला आयफेल टॉवरचे मूळ लोखंड जोडलेले आहे.

Web Title: 2024 opening ceremony of paris olympics will be held on river iron piece of eiffel tower on medal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2024 | 02:50 PM

Topics:  

  • Paris Olympics 2024
  • Paris Olympics 2024 Opening ceremony

संबंधित बातम्या

3000 क्रीडा खेळाडू सुखावणार! दरमहा 50000 रुपये, अमित शहा यांची मोठी घोषणा
1

3000 क्रीडा खेळाडू सुखावणार! दरमहा 50000 रुपये, अमित शहा यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.