फोटो सौजन्य - IndianPremierLeague
आयपीएल 2025 पाॅइंट टेबल : रविवारी 19 मे रोजी दोन सामने पार पडले, यामध्ये पहिला सामना पंजाब किंग्स विरूध्द राजस्थान राॅयल्स यांच्यामध्ये पार पडला तर दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये खेळवण्यात आला होता. आज आयपीएल 2025 चा 61 वा सामना खेळवला जाणार आहे. यामध्ये लखनऊ सुपर जायंट्स विरूद्ध सनराइझर्स हैदराबाद यांच्यामध्ये होणार आहे. त्याआधी गुणतालिकेची स्थिती काय आहे यावर एकदा नजर टाका. कालच्या सामन्यात गुजरातच्या संघाने विजय मिळवल्यानंतर तीन संघानी प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे.
आयपीएल 2025 च्या सध्याच्या गुणतालिकेच्या स्थितीवर नजर टाकली तर, पहिल्या स्थानावर गुजरात टायटन्सचा संघ आहे. गुजरातच्या संघाने कालच्या सामन्यात दिल्लीच्या संघाला 10 विकेट्सने पराभूत करून प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे. गुजरातचे सध्या 18 गुण आहेत, त्याचे 12 सामने झाले आहेत यामध्ये त्यांना 9 सामन्यात विजय मिळाला आहे. अजुनही त्याचे 2 सामने शिल्लक आहेत. दुसऱ्या स्थानावर राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आहे. बंगळुरुचे सध्या 17 गुण आहेत. संघाने 12 सामने खेळले आहेत यामध्ये 8 सामन्यात विजय मिळाला आहे तर 3 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
Time is running out! ⏳
3️⃣ spots taken. Just 1️⃣ left.
Which team will grab that last golden ticket? ✍ #TATAIPL pic.twitter.com/gaCjDRtPsQ
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2025
तिसऱ्या स्थानावर या यादीमध्ये पंजाब किंग्सच्या संघाने राजस्थानला त्याच्या घरच्या मैदानावर पराभुत करून प्लेऑफमध्ये जागा पक्की केली आहे. पंजाब किंग्सचे आतापर्यत 12 सामने झाले आहेत, यामध्ये 8 सामन्यात त्यांना विजय मिळाला आहे तर 3 सामन्यात त्याचा पराभव झाला आहे. चेन्नई सुपर किंग्स सनरायझर्स हैदराबाद कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे चार संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत त्यामुळे या संघांच्या प्ले ऑफ च्या अशा या मावळल्या आहेत.
युसूफ पठाणने दिला ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देणाऱ्या शिष्टमंडळाला नकार; नेमकं कारण काय?
सध्या प्लेऑफच्या शर्यतीसाठी लखनऊ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या तीन संघांमध्ये सध्या लढत सुरू आहे. दिल्ली कॅपिटलच्या संघाला कालच्या सामनात गुजरात विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आता त्यांचे फक्त दोन सामने शिल्लक आहेत या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांनी चांगल्या रनरेटने खेळल्यास दोन्ही सामन्यात विजय मिळवल्यास ते प्लेऑफमध्ये चौथ्या स्थानावर कब्जा करू शकतात. लखनऊचा आज बारावा सामना खेळवला जाणार आहे आजचा सामन्यात त्यांना विजय मिळवणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सचे बारा सामने झाले आहेत त्यामुळे त्यांचे आणखी दोन सामन्यात शिल्लक आहेत. मुंबईचे संघाने दोन्ही सामन्यात विजय मिळवल्यास ते प्लेऑफमध्ये स्थान पक्के करू शकतात.