Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

38th National Games 2025 : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र केसरी ठरले पदकाचे मानकरी; हर्षवर्धन, अमृताला कांस्यपदक

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने पदकांचा षटकार मारला आहे. या कामगिरीत महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लानीसुद्धा आपला ठसा उमटवला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 13, 2025 | 05:01 PM
38th National Games 2025 Maharashtra Kesari wins medals Harshvardhan Amruta win bronze Medals

38th National Games 2025 Maharashtra Kesari wins medals Harshvardhan Amruta win bronze Medals

Follow Us
Close
Follow Us:

हरिद्वार : तब्बल दशकानंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आखाड्यात महाराष्ट्राने पदकाचा षटकार झळकविला आहे. या चमकदार कामगिरीत महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लांनीही ठसा उमटविला. भाग्यश्री फंड पाठोपाठ हर्षवर्धन सदगीर, अमृता पुजारी हे महाराष्ट्र केसरी विजेते मल्ल राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकाचे मानकरी ठरले आहेत.

सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राचा डंका

रोशनाबाद येथील योगस्थळ हॉलमधील कुस्ती मैदानात सलग तिसर्‍या दिवशी महाराष्ट्राचा डंका घुमला. महाराष्ट्र केसरीच्याच फ्रीस्टाईल 125 किलो वजनी गटात हर्षवर्धन सदगीरने कांस्यपदकावर नाव कोरले. दिल्लीच्या लक्ष्य विरूध्द झुंजताना नाशिकच्या हर्षवर्धनने तीन गुणांची आघाडी घेतली होती. दुसर्‍या फेरीत लपेट डावावर चितपट कुस्ती करीत त्याने कास्यपदक जिंकले.

हर्षवर्धनचे क्रीडा स्पर्धेतील पहिलेच पदक
पुण्यात 2020 साली महाराष्ट्र केसरीची गदा उंचविणार्‍या हर्षवर्धनचे हे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिलेच पदक होय. याच वर्षी बंगलोरमधील वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने रूपेरी पदक पटकावले होते. महाराष्ट्र केसरी नंतर दुखापतीवर मात करून तो पुन्हा राष्ट्रीय पदक विजेता ठरला आहे. हर्षवर्धन हा पुण्यातील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील काका पवार यांचा पठ्ठा आहे.

महाराष्ट्राला कांस्यपदक
महिलांच्या फ्रीस्टाईल 76 किलो वजन गटात कोल्हापूरच्या अमृता पुजारीने महाराष्ट्राला कांस्यपदक मिळवून दिले.गुजरातच्या सनोफर विरूध्दच्या लढतीत अमृताने सुरुवातीलाच आक्रमण करीत पदकाकडे कूच केली. सनोफरला लपेट डावावर चितपट सलग दुसर्‍यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तीने कास्यपदकाचे यश संपादन केले. गतवर्षी 2024 मध्ये नागपूर येथील महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा तीने जिंकली होती.
कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील या सुवर्णकन्येने बॅकॉक येथे झालेल्या ज्युनियर आशियाई स्पर्धेत कांस्य, तर जॉर्डनमधील ङ्ग23 वर्षाखालील आशियाई स्पर्धेतही रौप्यपदकाचा करिश्मा घडविला आहे. मरुगुडमधील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुल प्रशिक्षक दादा लवटे यांचे मार्गदर्शन अमृताला मिळत आहे.

भाग्यश्री फडने मिळवले रौप्यपदक
हरिद्वारमधील कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महिला गटातील ट्रिपल महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकणार्‍या भाग्यश्री फंडने रौप्यपदक कमावले आहे. फ्रीस्टाईल 62 किलो गटात आहिल्यानगरची भाग्यश्री फडला रौप्य पदकाची मानकरी ठरली. तीन महाराष्ट्र केसरीने एकाच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याचा ही पहिलीच वेळ आहे. या यशा बाबत अर्जुन पुरस्कार प्राप्त काका पवार म्हणाले की, मल्लांनी महाराष्ट्र केसरी पुरताच समाधानी राहू नये. आमचे वस्ताद मामा बिराजदार यांची महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाचा इतिहास घडविला होता. त्याचा वारसा र् राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र केसरींने जोपासला आहे. महाराष्ट्र केसरीपेक्षा अधिक महत्त्व हे राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्याना प्राप्त झाले पाहिजे.

Web Title: 38th national games 2025 maharashtra kesari wins medals harshvardhan amruta win bronze medals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 05:01 PM

Topics:  

  • 38th National Games 2025
  • gold medal
  • Maharashtra Kesari
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

India Rain News:  पुढचा आठवडा ‘या’ दोन राज्यांसाठी कसोटीचा; वरूणराजा असा कोसळणार की…; IMD च्या अलर्टने वाढवली चिंता
1

India Rain News: पुढचा आठवडा ‘या’ दोन राज्यांसाठी कसोटीचा; वरूणराजा असा कोसळणार की…; IMD च्या अलर्टने वाढवली चिंता

उत्तराखंडचे भविष्य धोक्यात? होम स्टेच्या वाढत्या प्रभावामुळे पर्वताची अन् निसर्गाची हानी
2

उत्तराखंडचे भविष्य धोक्यात? होम स्टेच्या वाढत्या प्रभावामुळे पर्वताची अन् निसर्गाची हानी

Uttarakhand Clouburst: उत्तराखंडमध्ये अडकले महाराष्ट्राचे पर्यटक; ‘संकट मोचकां’नी थेट उत्तरकाशी गाठली अन्…
3

Uttarakhand Clouburst: उत्तराखंडमध्ये अडकले महाराष्ट्राचे पर्यटक; ‘संकट मोचकां’नी थेट उत्तरकाशी गाठली अन्…

Uttarakhand Cloudburst: उत्तरकाशीत लष्कराचे ऑपरेशन ‘धराली’; ३५७ नागरिकांचे रेस्क्यू तर ८ सैनिक अन्…
4

Uttarakhand Cloudburst: उत्तरकाशीत लष्कराचे ऑपरेशन ‘धराली’; ३५७ नागरिकांचे रेस्क्यू तर ८ सैनिक अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.