Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

38th National Games 2025 : तिरंदाजीत महाराष्ट्राला विजेतेपद! तर जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राला भरघोस पदकांची आशा!

राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा पार पडली. इंडीयन राऊंड प्रकारात शुक्रवारी महाराष्ट्राच्या संघाने ओडिशाचा पराभव करून कांस्यपदक जिंकले. सहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये शनिवारी प्राथमिक फेरीस प्रारंभ होत आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 08, 2025 | 10:18 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

डेहराडून : सात दिवस चाललेल्या तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ३ सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशा एकूण ५ पदकांची लयलूट करीत ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. इंडीयन राऊंड प्रकारात शुक्रवारी महाराष्ट्राच्या संघाने ओडिशाचा पराभव करून कांस्यपदक जिंकले. त्यानंतर गौरव चांदणे आणि भावना सत्यगिरी या महाराष्ट्राच्या जोडीने इंडीयन राऊंडच्या मिश्र दुहेरीत बाजी मारत सुवर्ण पदकाने तिरंदाजी स्पर्धेचा गोड शेवट केला.

राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा पार पडली. गौरव चांदणे (अमरावती) आणि भावना सत्यगिरी (पुणे) या जोडीने झारखंडच्या जोडीचा ६-२ (३६-३४, ३७-३४, ३३-३५, ३४-३३) असा पराभव करीत महाराष्ट्राला तिसरे सुवर्णपदक जिंकून दिले. महाराष्ट्राने हे सोनेरी यश संपादन केले. १६ वर्षीय भावना सत्याजित ही रणजित चामले यांची शिष्या असून, ती आर्चर्स अकॅडमी, पुणे येथे सराव करते. अमर जाधव, समीर मस्के, कुणाल तावरे व प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या तिरंदाजी संघाने हे सर्वसाधारण विजेतेपद संपादन केले.पथक प्रमुख संजय शेटे, उपपथक प्रमुख स्मिता शिरोळे, सुनील पूर्णपात्रे यांनी अभिनंदन केले आहे.

BCCI ने जिंकले प्रेक्षकांचे मनं! T20 विश्वचषक विजेत्या खेळाडूंना दिली ‘चॅम्पियन रिंग’, सोशल मीडियावर शेअर केला Video

कांस्यपदकाच्या एकतर्फी लढतीत बाजी!

महाराष्ट्राच्या गौरव चांदणे, रोशन सोळंके, अनिकेत गावडे आणि पवन जाधव या संघाने तिरंदाजीच्या इंडीयन राऊंड प्रकारात कांस्यपदकाची कमाई करीत ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याच्या पदकसंख्येत भर घातली. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने कांस्यपदकाच्या लढतीत ओडिशा संघाचा ६-० (४८-४५, ५७-४७, ५५-५१) असा धुव्वा उडविला.

जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राला भरघोस पदकांची आशा!

आंतरराष्ट्रीय खेळाडू संयुक्ता काळे, किमया कार्ले यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक संघासाठी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शनिवारपासून पदकांचा खजिना उघडणारा असून, नेहमीप्रमाणेच यंदाही भरघोस पदके जिंकण्याची संधी आहे. राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर असलेल्या भागीरथी संकुलात जिम्नॅस्टिक्सच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. सहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये शनिवारी प्राथमिक फेरीस प्रारंभ होत आहे. त्यामध्ये रिदमिक, ट्रॅम्पोलिन, एरोबिक्स, आर्टिस्टिक या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.

कराचीच्या नॅशनल स्टेडियममधील या चुकांमुळे ICC नाराज, PCB ला सांगितले चाहत्यांचे पैसे परत करण्यास!

रिदमिक या क्रीडा प्रकारात संयुक्त आणि किमया या अनुभवी खेळाडूंबरोबरच परिणा मदनपोत्रा आणि शुभश्री मोरे या नवोदित खेळाडूंकडूनही महाराष्ट्राला पदकाच्या आशा आहेत. ट्रॅम्पोलिन या क्रीडा प्रकारामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू राही पाखळे हिच्याकडून वैयक्तिक विभागात पदकाची आशा असून, सांघिक विभागातही महाराष्ट्राला पदक मिळेल असा अंदाज आहे. एरोबिक्समध्ये आर्य शहा हा पदकाचा मुख्य दावेदार मानला जात असून, आर्टिस्टिकमध्ये ओंकार शिंदे व सिद्धांत कोंडे यांच्यावर महाराष्ट्राची मदार आहे.

Web Title: 38th national games 2025 maharashtra wins title in archery maharashtra hopes for big medals in gymnastics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 09:47 AM

Topics:  

  • gymnastics
  • Sports

संबंधित बातम्या

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ
1

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष
2

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर
3

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर

AUS vs SA : दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा झटका, एकदिवसीय मालिकेतून कगिसो रबाडा बाहेर!
4

AUS vs SA : दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा झटका, एकदिवसीय मालिकेतून कगिसो रबाडा बाहेर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.