A blow to Team India! 'This' player returned home from England; The reason for not playing has come to light..
Rituraj Gaikwad returns home : टीम इंडिया सद्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दरम्यान भारताचे अनेक खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळताना दिसून येत आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत इंग्लंड संघाने आघाडी घेतली आहे. अशातच एका भारतीय खेळाडूने वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. आपण इंडियन प्रीमियर लीग मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या ऋतुराजबद्दल बोलत आहोत.
ऋतुराज इंग्लंडमध्ये होणाऱ्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळताना दिसणार नाही. ऋतुराज गायकवाडने यॉर्कशायरशी ५ सामन्यांचा करार केला होता आणि २२ जुलै रोजी तो काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण देखील करणार होता. परंतु, त्याआधीच आता त्याने या स्पर्धेतून त्याने माघार घेतली आहे. वैयक्तिक कारण असल्याचे सांगत ऋतुराज गायकवाडने स्पर्धेतून माघार घेतली आहे. या निर्णयामुळे यॉर्कशायरला मोठा झटका बसला आहे.
हेही वाचा : Vaibhav Suryavanshi चा दबदबा! दुसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंडने बदलला कर्णधार ; मायकल वॉनचा मुलगाही बाहेर
यॉर्कशायरचे मुख्य प्रशिक्षक अँथनी मॅकग्रा यांनी सांगितले की, ऋतुराज गायकवाड हा त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे आगामी सामने खेळणार नाही. आम्ही त्याला स्कारबोरो किंवा उर्वरित हंगामासाठी संघात ठेवणार नाही. हे खूप निराशाजनक आहे. मी तुम्हाला याची काही एक कारणे सांगू शकत नाही, पण आम्हाला आशा आहे की सर्व काही नीट होईल.
अँथनी मॅकग्रा पुढे म्हणाले की, चॅम्पियनशिप सुरू होण्यास फक्त तीन दिवस बाकी आहेत, त्यामुळे मला सध्या काय करावे हे याबद्दल काही माहित नाही? आम्ही त्याच्या जागी संभाव्य बदली खेळाडूच्या शोधात आहोत, परंतु आमच्याकडे फार कमी वेळ आहे. मी सध्या यापेक्षा जास्त काही माहिती देऊ शकत नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ऋतुराजची कामगिरी प्रभावित करणारी राहिली आहे. यॉर्कशायरसाठीही त्याच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा होती. तथापि, आता तो या स्पर्धेत मैदानात उतरताना दिसणार नाही.
ऋतुराज गायकवाड मायदेशी परतल्याने यॉर्कशायरसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सध्या टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील ३ सामने खालून झाले आहेत. या मालिकेत ऋतुराजला टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आले नाही. इतकेच नाही तर यापूर्वी इंडियन प्रीमियर लीगमध्येही ऋतुराजने फक्त ५ सामने खेळले होते. त्याला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेरचा रस्ता पकडावा लागला होता.
हेही वाचा : एलए २८ क्रिकेट स्पर्धेसाठी आयसीसीकडून विचारमंथनाला सुरूवात! स्वरूपासह पात्रता होणार अंतिम