फोटो सौजन्य – X
भारत अंडर-१९ आणि इंग्लंड अंडर-१९ संघांमध्ये सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात कोणताही संघ विजयी झाला नाही सामना ड्रॉ झाला. सर्व क्रिकेटच्या क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या आता दुसऱ्या सामन्यावर आहेत त्याचबरोबर विशेषतः वैभव सूर्यवंशी याच्या कामगिरीवर असणार आहेत. वैभव सूर्यवंशी यांनी कसोटी सामन्यात फार काही चांगली कामगिरी केली नाही पण त्यांनी गोलंदाजीने चांगला खेळ दाखवला.
युवा कसोटीचा पहिला सामना अनिर्णित राहिला. या कसोटीत कर्णधार हमजा शेखने सर्वाधिक १९६ धावा केल्या आणि पराभव टाळला. मालिकेतील दुसरी कसोटी २० जुलैपासून सुरू होत आहे. हा कसोटी सामना २३ जुलैपर्यंत चेम्सफोर्ड येथील काउंटी ग्राउंडवर खेळला जाईल. या सामन्यापूर्वी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे.
पाकिस्तानी खेळाडूंची जुनी सवय! आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा केलं अपमानास्पद, अशा प्रकारे झाले धावबाद
पहिल्या कसोटीत शानदार फलंदाजी आणि नेतृत्व करणाऱ्या हमजा यांना या संघात स्थान देण्यात आलेले नाही. एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचे नेतृत्व करणाऱ्या थॉमस रेव्ह यांना दुसऱ्या कसोटीत कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पहिल्या कसोटीत शतक हुकलेल्या अँड्र्यू फ्लिंटॉफचा मुलगा रॉकीला दुसऱ्या कसोटीत स्थान देण्यात आले आहे. मायकल वॉनचा मुलगा आर्ची वॉनला वगळण्यात आले आहे. त्याने पहिल्या डावात ४७ धावा आणि दुसऱ्या डावात ३ धावा केल्या. भारतीय वंशाचे आर्यन सावंत आणि जयसिंग हे देखील दुसऱ्या कसोटीत खेळताना दिसतील.
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघात सरेचे अॅडम थॉमस, राल्फी अल्बर्ट आणि अॅलेक्स फ्रेंच यांची निवड झाली आहे. अॅडम थॉमसला पहिल्यांदाच इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघात स्थान देण्यात आले आहे. थॉमस हा आक्रमक टॉप ऑर्डरचा फलंदाज आहे.
बेकेनहॅम येथे झालेल्या अनिर्णित पहिल्या युवा कसोटी सामन्यात अष्टपैलू राल्फी अल्बर्टने प्रभावी कामगिरी केली. त्याने त्याच्या डावखुऱ्या ऑर्थोडॉक्स फिरकीने तीन विकेट्स घेतल्या आणि पहिल्या डावात ५० धावा केल्या. गोलंदाज अॅलेक्स फ्रेंच मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी संघात परतण्याची आशा बाळगेल.
थॉमस रेव्ह (कर्णधार), राल्फी अल्बर्ट, विल बेनिस, बेन डॉकिन्स, रॉकी फ्लिंटॉफ, अॅलेक्स फ्रेंच, अॅलेक्स ग्रीन, जो हॉकिन्स, जॅक होम, बेन मेयेस, जेम्स मिंटो, आर्यन सावंत, जय सिंग, अॅडम थॉमस.