फोटो सौजन्य - rajasthanroyals
Viral Video : काल १८ मे रोजी पंजाब किंग्सचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध पार पडला. या सामन्यात राजस्थानच्या संघाला पंजाबने १० धावांनी पराभूत केले आणि त्यानंतर प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे. सुरुवातीला यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी या दोघांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली पण त्यानंतर दोघे बाद झाल्यानंतर इतर फलंदाज फेल ठरले. आता या सामन्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणातं व्हायरल होत आहे यासंदर्भात जाणून घ्या.
RCB आणि KKR या संघामध्ये IPL Playoff आधी झाला बदल! रोवमन आणि लुंगीच्या जागेवर कोणाला मिळणार स्थान
सामन्यानंतर पंजाबची मालकीण प्रीती झिंटा आणि यशस्वी जयस्वाल यांचा एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये दोघांमध्ये संभाषण दिसत आहे. या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यशस्वी जैस्वालने पंजाबविरुद्ध शानदार फलंदाजी केली. त्याने शानदार पद्धतीने अर्धशतक झळकावले. तथापि, तो राजस्थानचा विजय निश्चित करू शकला नाही. सामन्यानंतर, जयस्वाल आणि प्रीती झिंटा जयपूर प्रेक्षकांचे कौतुक करत होते.
खरंतर, जयपूरमध्ये प्रचंड उष्णता आहे, सामना दुपारी ३:३० वाजता सुरू होणार होता. असे असूनही, कडक उन्हात सामना पाहण्यासाठी प्रेक्षक मैदानावर पोहोचले. यानंतरही प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली. अशा परिस्थितीत, प्रेक्षकांच्या क्रेझमुळे प्रीती झिंटा देखील आश्चर्यचकित झाली. या मुद्द्यावर यशस्वी जयस्वाल यांनी प्रीती झिंटाला असेही सांगितले की, स्टेडियममध्ये सावली नसतानाही प्रेक्षक उन्हात सामना पाहण्यासाठी आले होते.
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्याच्या सुरुवातीपासूनच यशस्वी जयस्वालने आक्रमक वृत्ती दाखवली. त्याने डावाच्या पहिल्याच षटकात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगवर हल्ला केला आणि २२ धावा केल्या. या षटकात जयस्वालने ४ चौकार आणि १ षटकार मारला आणि या सामन्यात तो मोठी खेळी खेळण्याच्या मनःस्थितीत असल्याचे स्पष्ट केले.
त्याची आक्रमक फलंदाजी इथेच थांबली नाही. जयस्वालने जलद धावा केल्या आणि केवळ २४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, ज्यामध्ये ९ चौकार आणि १ षटकार होता. तथापि, तो लवकरच बाद झाला आणि त्याने २५ चेंडूत ५० धावा केल्या. डावाच्या ८.४ व्या षटकात हरप्रीत ब्रारने त्याला बाद केले आणि पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पंजाबने हा सामना १० धावांनी जिंकला होता.