फोटो सौजन्य - X
IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या या 18 वा सिझनमध्ये अनेक चढउतार आले. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वाढलेल्या तणावाच्या वातावरणामुळे दहा दिवसांसाठी आयपीएल स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी म्हणजेच 17 मे रोजी पुन्हा आयपीएलचा शुभारंभ करण्यात आला आहे. कालच्या डबल हेडर सामन्यानंतर आयपीएलचे तीन प्लेऑफचे संघ फायनल झाले आहेत. आता प्लेऑफच्या शर्यतीत फक्त एक स्थान शिल्लक आहे. आयपीएल दहा दिवसांसाठी स्थगित करण्यात आली होती त्यामुळे अनेक परदेशी खेळाडू हे त्यांच्या मायादेशात परतले काही खेळाडू पुन्हा खेळण्यासाठी आले आहेत, पण काही खेळाडू हे पुन्हा येण्यास त्यांनी नकार दिला आहे.
कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ च्या प्लेऑफपूर्वी त्यांच्या संघात बदल केले आहेत. केकेआरने जखमी रोवमन पॉवेलच्या जागी खेळाडूची घोषणा केली आहे तर आरसीबीने लुंगी एनगिडीच्या जागी खेळाडूची घोषणा केली आहे. गतविजेता केकेआर आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, परंतु हंगामातील उर्वरित सामन्यांसाठी त्यांनी रोवमन पॉवेलच्या जागी शिवम शुक्लाचा संघात समावेश केला आहे.
मध्य प्रदेशकडून स्थानिक क्रिकेट खेळणारा लेग स्पिनर शिवम शुक्लाला केकेआरने ३० लाख रुपयांना संघात सामील केले आहे, तर आरसीबीने लुंगी न्गिडीऐवजी मुझारबानीला संघात स्थान दिले आहे. ही बदली २६ मे पासून लागू होईल. केकेआरने आयपीएल २०२५ मधील उर्वरित सामन्यांसाठी जखमी रोवमन पॉवेलच्या जागी शिवम शुक्लाची संघात निवड केली आहे. वेस्ट इंडिजच्या या अष्टपैलू खेळाडूला टॉन्सिलची शस्त्रक्रिया करावी लागली आहे, ज्यासाठी तो स्पर्धेच्या मध्यातच संघ सोडून घरी परतला आहे. त्याच्या जागी मध्य प्रदेशकडून स्थानिक क्रिकेटमध्ये खेळणारा लेग-स्पिनर शिवम शुक्ला याला करारबद्ध करण्यात आले आहे. तो ३० लाख रुपयांना केकेआरमध्ये सामील होईल.
आरसीबीने लुंगी न्गिडीऐवजी ब्लेसिंग मुझाराबानीचा संघात समावेश केला आहे. एनगिडीने राष्ट्रीय संघात म्हणजेच दक्षिण आफ्रिकेच्या संघात सामील होण्यासाठी फ्रँचायझी सोडली आहे. आता त्याच्या जागीही उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही संघांमध्ये केलेले बदल २६ मे पासून लागू होतील. झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज मुझारबानीने आतापर्यंत ७० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि ७८ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने झिम्बाब्वेसाठी १२ कसोटी आणि ५५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. आरसीबीने त्याला ७५ लाख रुपयांमध्ये संघात समाविष्ट केले आहे.