Abhishek Sharma
IND vs NZ: Arshdeep Singh ची भेदक गोलंदाजी! भुवनेश्वरला टाकलं मागे; T20 मध्ये पटकावला नंबर वनचा ताज
अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यात एका नवा विक्रम आपल्या नावावर केला. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पॉवरप्लेमध्ये १०० षटकार मारणारा अभिषेक पहिला फलंदाज ठरला. न्यूझीलंडविरुद्ध आपला पहिला षटकार मारून त्याने हा टप्पा गाठला. हा पराक्रम करण्यासाठी अभिषेकने एकूण ७७६ चेंडूंचा सामना केला. अभिषेकने आतापर्यंत ६९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्यात त्याने १४७ षटकार मारण्यात यश मिळवले आहे. यापैकी १०० षटकार पहिल्या ६ षटकांमध्येच मारले आहेत.
या यादीत भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने पॉवरप्लेमध्ये एकूण ९८ षटकार मारले आहेत. यासाठी त्याने एकूण १६७२ चेंडूंचा सामना केला. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टिल आहे. त्याने पॉवरप्लेमध्ये फलंदाजी करताना एकूण ९७ षटकार ठोकले आहेत.






