Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AFG vs BAN : राशीद खानविरुद्ध बांग्लादेशचा संघ पूर्णपणे फेल, अफगाण संघाने एकदिवसीय मालिका जिंकून घेतला बदला

दुसरा एकदिवसीय सामना ११ ऑक्टोबर रोजी अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळवण्यात आला. बांगलादेशला लहान लक्ष्याचा पाठलाग करण्यातही अपयश आले आणि त्यांना ८१ धावांनी सामना गमवावा लागला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 12, 2025 | 09:33 AM
फोटो सौजन्य - Afghanistan Cricket Board

फोटो सौजन्य - Afghanistan Cricket Board

Follow Us
Close
Follow Us:

बांगलादेशविरुद्धची टी-२० मालिका ३-० ने गमावल्यानंतर, या दोन्ही देशांमध्ये एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेमध्ये झालेल्या टी20 मालिकेचा अफगाणिस्तानने बदला घेतला आहे. अफगाणिस्तानने पहिला एकदिवसीय सामन्यात दमदार कामगिरी करत पहिला विजय नावावर केला होता. दुसरा एकदिवसीय सामना ११ ऑक्टोबर रोजी अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळवण्यात आला. नाणेफेक जिंकल्यानंतर, अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ४४.५ षटकांत सर्वबाद होण्यापूर्वी १९० धावा केल्या.

बांगलादेशला लहान लक्ष्याचा पाठलाग करण्यातही अपयश आले आणि त्यांना ८१ धावांनी सामना गमवावा लागला. यासह, बांगलादेशने मालिका २-० ने गमावली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झद्रानने १४० चेंडूत ९५ धावा केल्या, ज्यामध्ये फक्त तीन चौकार आणि एक षटकार मारला. झद्रानने एका कठीण विकेटवर एक एंड अप राखला. यष्टीरक्षक-फलंदाज रहमानउल्लाह गुरबाजने फक्त ११ धावा केल्या, तर अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबीने २२ धावा केल्या. 

𝐀𝐅𝐆𝐇𝐀𝐍𝐈𝐒𝐓𝐀𝐍 𝐁𝐄𝐀𝐓 𝐁𝐀𝐍𝐆𝐋𝐀𝐃𝐄𝐒𝐇 𝐁𝐘 𝟖𝟏 𝐑𝐔𝐍𝐒! 🙌#AfghanAtalan have put on a terrific bowling effort to bundle Bangladesh out for 109 runs and secure an 81-run victory to take an unassailable 2-0 lead in the Etisalat Cup ODI Series 2025. 👏👏… pic.twitter.com/FAti4Y8YLs — Afghanistan Cricket Board (@ACBofficials) October 11, 2025

शेवटी, अल्लाह गझनफरनेही २२ धावा केल्या. यामुळे अफगाणिस्तानचा संघ ४४.५ षटकांत बाद होण्यापूर्वी १९० धावांपर्यंत पोहोचला. बांगलादेशकडून कर्णधार मेहदी हसन मिराजने तीन, तर तन्झिम हसन सकीब आणि रिशाद हुसेनने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. लहान लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या सैफ हसनने २२ धावा केल्या. तौहिद हृदोयनेही २४ धावा केल्या. झाकीर अलीने १८ धावा केल्या, तर नुरुल हसनने १५ धावा केल्या. बांगलादेशचे सात खेळाडू दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत, ज्यामुळे संघ २८.३ षटकांत फक्त १०९ धावांतच बाद झाला. 

अफगाणिस्तानकडून रशीद खानने ८.३ षटकांत १७ धावा देत ५ बळी घेतले. अझमतुल्लाह उमरझाईनेही ३ बळी घेतले, ज्यामुळे अफगाणिस्तान संघाला एकदिवसीय मालिका जिंकण्यास मदत झाली. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना १४ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. अफगाणिस्तानचा संघ तो सामनाही जिंकून क्लीन स्वीप पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. अफगाणिस्तान आणि बांग्लादेश यांच्यामध्ये तिसरा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना 14 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. अफगाणिस्तानच्या संघाने मालिका जिंकली आहे पण तीनही सामन्यात अफगाणिस्तानचा संघ विजय मिळवणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल. 

Web Title: Afg vs ban bangladesh team completely failed against rashid khan afghan team took revenge by winning the odi series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 09:14 AM

Topics:  

  • Afghanistan vs Bangladesh
  • cricket
  • Sports

संबंधित बातम्या

NAM vs SA : विश्व क्रिकेटमध्ये उलथापालथ, नामिबियाने केला उलटफेर! T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा केला पराभव
1

NAM vs SA : विश्व क्रिकेटमध्ये उलथापालथ, नामिबियाने केला उलटफेर! T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा केला पराभव

IND W vs AUS W Live Streaming : महिला विश्वचषकात आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना, कधी, कुठे आणि कसे लाईव्ह पाहता येणार
2

IND W vs AUS W Live Streaming : महिला विश्वचषकात आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना, कधी, कुठे आणि कसे लाईव्ह पाहता येणार

ICC Women Cricket World Cup Points Table : इंग्लंडने मारली विजयाच्या हॅट्रिक! गुणतालिकेचे गणित झाले उलटे सुलटे
3

ICC Women Cricket World Cup Points Table : इंग्लंडने मारली विजयाच्या हॅट्रिक! गुणतालिकेचे गणित झाले उलटे सुलटे

Photo : शुभमन गिलचा नवा पराक्रम, रोहित शर्माचा विक्रम मोडत WTC मध्ये सर्वाधिक शतके करणारा बनला भारतीय
4

Photo : शुभमन गिलचा नवा पराक्रम, रोहित शर्माचा विक्रम मोडत WTC मध्ये सर्वाधिक शतके करणारा बनला भारतीय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.