फोटो सौजन्य- X
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ऐतिहासिक रौप्यपदक जिंकणारा भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने जर्मनीमध्ये प्रशिक्षण सुरु केले आहे. नीरज हा भारताकडून ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण आणि रौप्य कामगिरी करणारा पहिला खेळाडू बनला आहे. पॅरिस ऑलिम्पक 2024 च्या भालाफेक अतिंम फेरीत 89.45 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह रौप्यपदकांसह सलग दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकले. नीरज चोप्राचा पाकिस्तानी प्रतिस्पर्धी अर्शद नदीमने दुसऱ्या प्रयत्नात 92.97 मीटरच्या ऑलिम्पिक विक्रमी थ्रोसह ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले.
रौप्य पदक जिंकल्यानंतर त्याने आपल्या दुखापतीबद्दल खुलासा केला होता. त्यासाठीच पॅरिस ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्रा मायदेशी न येता डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी आणि त्याच्या मांडीच्या दुखापतीवर उपचारासाठी जर्मनीला गेला. सध्या गोल्डन बॉय नीरज चोप्राचा व्यायामाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये नीरज जिममध्ये व्यायाम करताना त्याच्या पायात फुगा ठेवून आणि बारला लटकून ॲब्स व्यायाम करताना दिसत आहे.
Neeraj Chopra is back in the training session to prepare for the upcoming events. pic.twitter.com/O94MHRpYvF — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 16, 2024
स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंशी संवाद साधला होता. त्या कार्यक्रमामध्ये नीरज चोप्रा जर्मनीला असल्यामुळे उपस्थित राहू शकला नव्हता. भालाफेक स्टारच्या कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीनुसार नीरज साधारण दीड ते दोन महिन्यांपर्यंत भारतात परतण्याची शक्यता नाही कारण तो परदेशातील ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये भाग घेणार आहेत.भविष्यामध्ये नीरज चोप्रा अॅथलॅटिक्समधील महत्वाची स्पर्धा डायमंड लीगमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा याने रौप्यपदक जिंकले. त्यानंतरच्या प्रत्येक मुलाखत अथवा संवादामध्ये त्याने सुवर्णपदक जिंकायचे होते मात्र दुखापतीच्या विचारामुळे अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही असे सांगितले होते. याच दुखापतीवर लवकर उपचार सर्वोत्तम कामगिरी करु आणि पुढील ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पुन्हा सुवर्णपदक जिंकण्याचे लक्ष्य आहे असा मानस त्याने व्यक्त केला आहे.