
T20 World Cup 2026: Sri Lanka makes a big move ahead of the T20 World Cup 2026! A major responsibility has been entrusted to this Indian player.
Vikram Rathour has been appointed as Sri Lanka’s batting coach : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ येणाऱ्या ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. सर्व संघ या छोट्या स्वरूपाच्या तयारीत व्यस्त दिसत आहेत. या विश्वचषकापूर्वी श्रीलंकेने एक मोठा खेळ केला आहे. श्रीलंकेकडून आपल्या कोचिंग स्टाफमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. श्रीलंकेने माजी भारतीय फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांची त्यांच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. श्रीलंका देखील भारतासोबत या स्पर्धेचे सह-यजमानपद भूषवत आहे.
हेही वाचा : IND U19 vs SA U19: 2026 मध्येही वैभव सूर्यवंशीचा धुमाकूळ कायम! 63 चेंडूत ठोकले शतक
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने विक्रम राठोड यांना २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी फक्त फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. विक्रम राठोड यांनी भारतीय संघासोबत बराच काळ फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी विक्रम राठोड भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहत होते. विक्रम राठोड १५ जानेवारीपर्यंत श्रीलंकेच्या संघात सामील होण्याची शक्यता आहे.
विक्रम राठोड यांनी पाच वर्षे भारतीय पुरुष संघासोबत महत्वाची जबाबदारी पार पडली आहे. २०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतर विक्रम राठोड यांनी संघ सोडला होता. २०२५ मध्ये राठोड यांनी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. ते पंजाब किंग्जच्या प्रशिक्षक संघाचा देखील भाग राहिलेले आहेत. ५६ वर्षीय राठोड यांनी १९९६ ते १९९७ दरम्यान भारतासाठी सहा कसोटी आणि सात एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. तसेच २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी गोलंदाजी मजबूत करण्यासाठी श्रीलंकेने माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची वेगवान गोलंदाजीच्या सल्लागारपदी नियुक्ती केली आहे.
श्रीलंकेच्या प्रशिक्षक स्टाफला बळकटी
श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक माजी कर्णधार आणि त्याच्या काळात सर्वात स्फोटक सलामीवीर फलंदाजांपैकी एक सनथ जयसूर्या आहेत. मलिंगा आणि राठोड यांच्या समावेशामुळे, श्रीलंकेचा प्रशिक्षक स्टाफला चांगलीच बळकटी मिळाली आहे.
हेही वाचा : 2026 च्या टी-२० विश्वचषकासाठी नेपाळ संघाची घोषणा! ‘या’ खेळाडूंची लागली लॉटरी; रोहित पौडेल करणार नेतृत्व
सह-यजमान श्रीलंका टी-२० विश्वचषकात मोठा धक्का देण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. सध्याचा फॉर्म पाहता, श्रीलंकेला उपांत्य फेरीचा दावेदार मानता येत नाही. परंतु, त्यांच्याकडे अंतिम चार किंवा अंतिम फेरीत पोहोचण्याची क्षमता मात्र निश्चितच असल्याचे बोलले जात आहे. लसिथ मलिंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने २०१४ चा टी-२० विश्वचषक आपल्या नावे केला होता. अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताचा ६ विकेट्सने पराभव करून जेतेपद जिंकले होते.