२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी नेपाळ संघाची घोषणा(फोटो-सोशल मीडिया)
Nepal has announced its squad for the 2026 T20 World Cup : २०२६ च्या आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी एक महिना बाकी असताना नेपाळने या मोठ्या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ घोषित केला आहे. रोहित पौडेलकडे नेपाळ संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तर दीपेंद्र सिंग ऐरी उपकर्णधार असणार आहे.
२३ वर्षीय अष्टपैलू रोहित पौडेलने आपल्या कामगिरीने संघाला मदत करत नेपाळच्या क्रिकेट विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या विश्वचषकामध्ये त्याला दीपेंद्र सिंग ऐरीची साथ मिळणार आहे. क्रिकेटच्या सर्वात लहान स्वरूपात नेपाळला योग्य संतुलन प्रदान करण्यासाठी दीपेंद्रची अष्टपैलू क्षमता देखील महत्त्वाची असणार आहे. नेपाळ संघाची २०२४ च्या टी-२० विश्वचषकातील निराशाजनक कामगिरी राहिली होती. आता या स्पर्धेत संघ सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल.
हेही वाचा : IND U19 vs SA U19: 2026 मध्येही वैभव सूर्यवंशीचा धुमाकूळ कायम! 63 चेंडूत ठोकले शतक
जगभरात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेला संदीप लामिछाने फिरकी गोलंदाजीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याला डावखुरा फिरकी गोलंदाज ललित राजबोंगशी साथ मिळेल. त्याला सहकारी फिरकी गोलंदाज दीपेंद्र सिंग ऐरी आणि बसीर अहमद यांचेही सहकार्य लाभेल. अष्टपैलू खेळाडू म्हणून दीपेंद्र, गुलशन झा, आरिफ शेख आणि सोमपाल कामी हे संघात असणा आहेत.
कुशल भुर्तेल संघाला सुरुवातीच्या षटकांमध्ये चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी घेणार आहे. यष्टींमागे आसिफ शेख ताकद आणि स्थिरता प्रदान करण्यात महत्वाची भूमिका बाजावेल. लोकेश मधल्या फळीला स्थिर करण्यास आणि आधार देण्यास मदत करताना दिसणार आहे. संदीप जोरा आणि नंदन यादव फलंदाजीची अधिक खोली प्रदान करतील. सोमपाल कामी आणि करण केसी जलदगती गोलंदाजीचे नेतृत्व करताना दिसणार आहेत.
हेही वाचा : T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघाची घोषणा! ‘या’ खेळाडूच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा
२०२६ च्या पुरुष टी२० विश्वचषकासाठी नेपाळ गट क मध्ये समाविष्ट आहे. नेपाळ ८ फेब्रुवारी रोजी इंग्लंडशी, त्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी इटलीशी सामना करणार आहे. संघ १५ फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडिजशी आणि १७ फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध सामना असणार आहे.
रोहित पौडेल (कर्णधार), दीपेंद्र सिंग ऐरी, संदीप लामिछाने, कुशल भुर्तेल, आसिफ शेख, संदीप जोरा, आरिफ शेख, बसीर अहमद, सोमपाल कामी, करण केसी, नंदन यादव, गुलशन झा, ललित राजवंशी, शेर मल्ला, लोकेश बाम.






