वैभव सूर्यवंशी(फोटो-सोशल मीडिया)
Vaibhav Suryavanshi scored a century against South Africa U-19 : भारत १९ वर्षाखालील संघाचा कर्णधार वैभव सूर्यवंशीने २०२६ देखील आपली जादू कायम ठेवली आहे. बुधवारी (७ जानेवारी) दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या युवा एकदिवसीय सामन्यात वर्षातील पहिले शतक लगावेल आहे. बेनोनी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने फक्त ७४ चेंडूत १२७ धावांची खेळी केली आहे.
हेही वाचा : T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघाची घोषणा! ‘या’ खेळाडूच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा
दक्षिण आफ्रिका U-१९ कर्णधार मोहम्मद बुलबुलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. वैभव सूर्यवंशीने फलंदाजीसाठी अनुकूल परिस्थितीचा चांगलाच फायदा घेतला आणि यजमानांच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार संचार घेतला. तो भारतीय डावाच्या २६ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवरमाघारी परतला. बाद होण्यापूर्वी त्याने आपल्या १२७ धावांच्या खेळीत ९ चौकार आणि १० षटकार मारले. यासह त्याने आरोन जॉर्जसोबत २२७ धावांची मोठी सलामी भागीदारी रचली. बाद झाल्यानंतर आरोन जॉर्जनेही आपले देखील शतक पूर्ण केले.
वैभव सूर्यवंशीने शतक पूर्ण करण्यासाठी फक्त ६३ चेंडूंचा सामना केला. तसेच त्याने यापूर्वी फक्त २४ चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले होते. वैभवने केलेल्या या खेळीकडे त्याच्या उज्ज्वल भविष्याची झलक पहिले जात आहे. तो लवकरच वरिष्ठ भारतीय संघात स्थान मिळवण्यास सज्ज असल्याचे हे चित्र दिसत आहे.
यापूर्वी, वैभव सूर्यवंशीने ५ जानेवारी रोजी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या युवा एकदिवसीय सामन्यात देखील आपल्या बॅटने चमकदार कामगिरी केली. त्याने फक्त २४ चेंडूत १० षटकारांसह ६८ धावा फटकावल्या होत्या. त्याच्या धमाकेदार खेळीमुळे भारताने डीएलएस पद्धतीने आठ विकेट्सने विजय मिळवला होता. तसेच त्याकया या खेळीने भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या युवा एकदिवसीय मालिकेत २-० अशी जिंकली.
हेही वाचा : भारतात खेळणे सुरक्षित…! ICC चा अल्टिमेटमवर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने केला खुलासा
१९ वर्षांखालील विश्वचषक १५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. १९ वर्षांखालील विश्वचषकापूर्वी वैभव सूर्यवंशीने आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्यास मदत करण्यात त्याचे योगदान महत्त्वाचे ठरणार असे म्हटले जात आहे. पाच वेळा विश्वविजेता राहिलेला भारत (२०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२) न्यूझीलंड, अमेरिका आणि बांगलादेशसह गट ब मध्ये आहे. भारत १५ जानेवारी रोजी बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे अमेरिकेविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे.






