Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 :अजिंक्य रहाणेने रचला इतिहास, आयपीएलमध्ये ही कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला क्रिकेटपटू

आता शनिवारी, २२ मार्च रोजी जेव्हा अजिंक्य रहाणे कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करण्यासाठी आला तेव्हा त्याने इतिहास रचला. इंडियन प्रीमियर लीग मध्ये एक-दोन नव्हे तर तीन संघांचे नेतृत्व करणारा तो पहिला भारतीय कर्णधार बनला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 23, 2025 | 09:44 AM
फोटो सौजन्य - KKR सोशल मीडिया

फोटो सौजन्य - KKR सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

Ajinkya Rahane created history in IPL : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा पहिला सामना काल पार पडला. या सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ एकमेकांशी भिडले. यामध्ये कोलकाता नाईट राइडर्सच्या संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ७ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने कमालीची फलंदाजी केली आणि ३१ चेंडूंमध्ये ५६ धावा केल्या. आता शनिवारी, २२ मार्च रोजी जेव्हा अजिंक्य रहाणे कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करण्यासाठी आला तेव्हा त्याने इतिहास रचला. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये एक-दोन नव्हे तर तीन संघांचे नेतृत्व करणारा तो पहिला भारतीय कर्णधार बनला.

IPL 2025 : किंग कोहलीने कोलकाता नाईट राइडर्सच्या गोलंदाजांना धुतलं, सॉल्टचं अर्धशतक! आरसीबीने केला केकेआरचा 7 विकेट्सने पराभव

अजिंक्य रहाणेच्या आधी, आणखी तीन कर्णधारांनी आयपीएलमध्ये किमान तीन संघांचे नेतृत्व केले आहे, जे तिन्ही परदेशी आहेत. लवकरच या यादीत श्रेयस अय्यरचे नावही जोडले जाणार आहे. तो दोन संघांचा कर्णधार राहिला आहे आणि यावेळी तो एका नवीन संघाचे नेतृत्व करणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करण्यापूर्वी अजिंक्य रहाणेने राजस्थान रॉयल्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्सचेही नेतृत्व केले आहे. कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेचा आयपीएलमधील हा २६ वा सामना होता. त्याने २०१८ आणि २०१९ मध्ये २४ सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले, तर २०१७ मध्ये एका सामन्यात रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे नेतृत्व केले.

याशिवाय, आतापर्यंत कोणत्याही अन्य भारतीय कर्णधाराला तीन आयपीएल संघांचे नेतृत्व करता आलेले नाही. या हंगामात पंजाब किंग्ज आपला पहिला सामना खेळेल तेव्हा श्रेयस अय्यर दुसरा भारतीय खेळाडू बनेल. तो दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार राहिला आहे. त्याच वेळी, जर आपण तीन आयपीएल संघांचे नेतृत्व करणाऱ्या इतर तीन कर्णधारांबद्दल बोललो तर त्यात महेला जयवर्धने, कुमार संगकारा आणि स्टीव्ह स्मिथ यांचा समावेश आहे. २०१० च्या हंगामात कुमार संगकाराने १३ सामन्यांमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) चे नेतृत्व केले. यानंतर, त्याने २५ सामन्यांमध्ये डेक्कन चार्जर्सचे नेतृत्व केले.

२०१३ च्या हंगामात तो सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार होता. महेला जयवर्धनेने किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) चे एका सामन्यात, कोची टस्कर्स केरळचे १३ सामन्यात आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सचे (आता दिल्ली कॅपिटल्स) १६ सामन्यात नेतृत्व केले. स्टीव्ह स्मिथने पुणे वॉरियर्स इंडियाचे एका सामन्यात, रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे १५ सामन्यात आणि राजस्थान रॉयल्सचे २७ सामन्यात नेतृत्व केले.

Web Title: Ajinkya rahane creates history becomes the first indian cricketer to captain three teams in ipl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2025 | 09:44 AM

Topics:  

  • IPL 2025
  • KKR vs RCB

संबंधित बातम्या

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
1

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

RCB Post : बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणानंतर RCB ने उचलले मोठे पाऊल, पीडितांच्या कुटुंबियांना देणार एवढे पैसे
2

RCB Post : बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणानंतर RCB ने उचलले मोठे पाऊल, पीडितांच्या कुटुंबियांना देणार एवढे पैसे

Photos : KKR चा IPL 2026 च्या आखाड्यात नवा डाव! KL Rahul ला संघात घेण्यासाठी सुरू केल्या हालचाली..
3

Photos : KKR चा IPL 2026 च्या आखाड्यात नवा डाव! KL Rahul ला संघात घेण्यासाठी सुरू केल्या हालचाली..

‘त्याची कारकीर्द उत्तम पण..’, रविचंद्रन अश्विनच्या आयपीएलमधून निवृत्तीवर आकाश चोप्राचे भाष्य चर्चेत..   
4

‘त्याची कारकीर्द उत्तम पण..’, रविचंद्रन अश्विनच्या आयपीएलमधून निवृत्तीवर आकाश चोप्राचे भाष्य चर्चेत..   

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.