फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru सोशल मीडिया
RCB vs KKR : आयपीएल २०२५ च्या १८ व्या सीजनचा शुभारंभ आज पासून झाला आहे आणि या सीझनच्या सलामी सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकत्ता नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळाली. आजच्या या पहिल्याच सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगरूळच्या संघाने या सिझनची सुरुवात विजयाने केली आहे. पहिल्याच सामन्यात गतविजेत्या संघाला आरसीबीच्या संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयपीएलच्या या पहिल्या सामन्याआधी श्रेया घोषाल, दिशा पाटणी आणि करण औजला यांनी त्यांच्या परफॉर्मन्स मी प्रेक्षकांची मने जिंकली.
KKR Vs RCB : अजिंक्य रहाणेचे तुफानी अर्धशतक; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांची केली धुलाई..
आजच्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी कशाप्रकारे कामगिरी केली यावर एकदा नजर टाका. केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यामध्ये झालेल्या सामन्या बद्दल बोलायचे झाले तर या सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजेस बंगळुरू संघाचा कर्णधार रजत पाटीदार याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाता नाईट रायडर्स चा फलंदाजी बद्दल बोलायचे झाले तर संघाने सलामीवीर फलंदाज क्विंटन डीकॉक याने त्याचा विकेट लवकर गमावला होता त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे फलंदाजी आला होता. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि सुनील नारायण याने संघाला कमालीची सुरुवात करून दिली आणि दोघांनी 107 धावांची भागीदारी केली. यामध्ये अजिंक्य रहाणे ने 31 चेंडूंमध्ये 56 धावांची खेळी खेळली तर सुनील नारायण याने 44 धावांची खेळी खेळली.
पण त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सची फलंदाजी डगमगली आणि एकही फलंदाज सुनील नारायण आणि अजिंक्य रहाणे याचा विकेट गेल्यानंतर 30 चा आकडा पार करू शकले नाही यामध्ये अँग्रीश रघुवंशी याने 22 चॅनेलमध्ये 30 धावा करून बाद झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुच्या संघाच्या गोलंदाजी बद्दल बोलायचे झाले तर संघासाठी सर्वाधिक विकेट्स कृणाल पांड्या याने घेतले. कृणाल पांडे याने चार ओव्हर मध्ये 29 धावा देत तीन विकेट्स नावावर केले तर जोश हेजलवूड याने संघासाठी दोन विकेट्स घेतले. तर यश दयाल रसिक सलाम आणि सुयश शर्मा या तिघांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.
Match 1. Royal Challengers Bengaluru Won by 7 Wicket(s) https://t.co/C9xIFpQDTn #KKRvRCB #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) March 22, 2025
रॉयल चॅलेंज बंगळुरू संघाच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर सलामीवीर फलंदाजांनी कमालीची सुरुवात करून दिली आणि त्याचबरोबर दोन्ही खेळाडूंनी अर्धशतकीय खेळी खेळून संघाला विजयापर्यंत नेले. यामध्ये भारतीय संघाच्या स्टार फलंदाज आणि आरसीबीचा हिरा विराट कोहली याने अर्धशतकीय खेळी खेळली यामध्ये त्याने 36 चेंडूंमध्ये 59 धावांची खेळ खेळली. फिल्ल सॉल्ट याने संघासाठी 31 चेंडूंमध्ये 56 धावांची खेळी खेळली तर देवदत्त पडिक्कल मोठी कामगिरी करू शकला नाही त्यांनी फक्त दहा धावा करून तो बाद झाला. त्यानंतर आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार फलंदाजीसाठी आला होता यामध्ये त्याने 16 चेंडू मध्ये 36 धावा केल्या. शेवटच्या काही ओव्हरमध्ये येऊन लियाम लिव्हिंगस्टोन याने संघासाठी ५ चेंडूंमध्ये १५ धावांची दमदार खेळी खेळली आणि विजयी चौकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला.