
फोटो सौजन्य - JIO Cinema
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ : पॅरिस ऑलम्पिक २०२४ हे वर्ष कुस्तीपटूंसाठी अपशकुनी ठरलं असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भारताचे सहा कुस्तीपटू मैदानात उतरले होते. यामध्ये प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कारणासाठी त्यांना बाहेर जावे लागले. सर्वात पहिला निशा दहिया हिला दुखापतीमुळे जिंकलेला सामना गमवावा लागला. तर भारताचे स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिला गोल्ड मेडल मॅचमधून डिसक्वालिफाय करण्यात आले. अंतिम पंघाल आणि अंशू मलिक यांच्या खराब कामगिरीमुळे त्यांना स्पर्धेमधून बाहेर व्हावे लागले. त्याचबरोबर अंतिम पंघाल हिला तीन वर्षासाठी बॅन करण्यात आले आहे.
यंदा भारतासाठी पुरुष कुस्तीपटूंमध्ये अमन शेरावत हा एकमेव खेळाडू पात्र ठरला होता. त्यामुळे भारतीयांना त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. राउंड ऑफ १६ आणि कॉर्टर फायनलच्या सामन्यांमध्ये एकही पॉईंट न गमावता अमनने सामने सहज जिंकले. परंतु सेमी फायनलमध्ये त्याचा सामना जपानच्या कुस्तीपटूशी झाला आणि त्याला तो सामना गमवावा लागला. त्यानंतर त्याचा सामना ९ ऑगस्ट रोजी कांस्य पदकासाठी झाला आणि या सामन्यांमध्ये त्याने एकतर्फी विजय मिळवून कांस्यपदकावर कब्जा केला आहे आणि भारताला सहावे पदक मिळवून दिले आहे.
भारताची आणखी एक कुस्तीपटू आज लढणार आहे. रितिका हुंडा आज तिचा राउंड ऑफ १६ च्या सामान्यांपासून सुरुवात करणार आहे. त्यानंतर जर तिने राउंड ऑफ १६ मध्ये विजय मिळवल्यास तिचा क्वार्टर फायनल आणि सेमी फायनलचा सामना आजच होणार आहे. त्याचबरोबर भारतासाठी अदिती अशोक आणि दिक्षा डागर या भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत. भारतीयांचे सर्व खेळ आज संपणावर आहेत. त्याचबरोबर आज पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा शेवटचा दिवस असणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकची ११ ऑगस्ट रोजी समारोप समारंभ असणार आहे.