जेक फ्रेझर मॅकगर्क : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये IPL 2024 चा ४३ वा सामना सुरु आहे. सध्या संपूर्ण देशाचे लक्ष दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान फलंदाज जेक फ्रेझर मॅकगर्ककडे लागले आहे. दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान फलंदाज जेक फ्रेझर मॅकगर्कने IPL 2024 मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याच्या स्वतःच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. मॅकगर्कने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. यापूर्वी याच मोसमात सनरायझर्स हैदराबादविरुद्धही त्याने १५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. मुंबईविरुद्धच्या सामन्याच्या चौथ्या षटकात त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले.
मॅकगर्क टी-20 क्रिकेटमध्ये 15 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत दोनदा अर्धशतक ठोकणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी आंद्रे रसेल आणि सुनील नरेन यांनी ही कामगिरी केली आहे. मॅकगर्कनेही आपले अर्धशतक पूर्ण करताना 3 गगनचुंबी षटकार आणि 7 चौकार लगावले. मॅकगर्क इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकावणार आहे, असे वाटत होते. पण त्याचा डाव 27 चेंडूत 84 धावांवर संपला, ज्यात त्याने 11 चौकार आणि 6 षटकारही मारले. फ्रेजर मॅकगर्कने चालू मोसमात आतापर्यंत 104 चेंडू खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 22 चौकार आणि 22 षटकार मारले आहेत.