फोटो सौजन्य - copaamerica इंस्टाग्राम अकाउंट
अर्जेंटिना फुटबॉल संघ : लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना फुटबॉल संघ दिवसेंदिवस मजबूत होत चालला आहे. अर्जेंटिनाचा संघ नवनवे विक्रम रचत आहे. त्याचबरोबर आंतराराष्ट्रीय स्तरावर अर्जेंटिनाचा दबदबा मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. आता अर्जेंटिनाने कोप अमेरिकेचे विजेतेपद पटकावले आहे त्याचबरोबर त्यांनी इतिहास सुद्धा रचला आहे. फायनलच्या सामन्यामध्ये अर्जेंटिनाने कोलंबियाचा पराभव करून कोपा अमेरिका ट्रॉफी नावावर केली आहे. कोपा अमेरिकेतील अर्जेंटिनाचे हे १६ वे विजेतेपद ठरले.
कोपा अमेरिका फायनलमध्ये कोलंबियाने 9 वेळचा चॅम्पियन अर्जेंटिना विरुद्ध चांगला खेळ खेळून दाखवला. पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले आणि उत्तरार्धातही दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओन मेस्सीला दुखापतीमुळे सामना सोडावा लागला. ९० मिनिटांच्या पूर्ण वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले आणि सामना अतिरिक्त वेळेत पोहोचला. लॉटारो मार्टिनेझने अतिरिक्त वेळेत गोल केला आणि अर्जेंटिनाने १६ वेळा हे विजेतेपद पटकावले.
आतापर्यंत कोपा अमेरिकेत एकाच संघाचे वर्चस्व पाहायला मिळाले आणि ते म्हणजे अर्जेंटिना. हे विजेतेपद सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विक्रम त्याने केला आहे. १९१६ मध्ये प्रथमच ही स्पर्धा खेळली गेली, ज्याचे आयोजन अर्जेंटिनाने केले होते. उरुग्वे संघाने अंतिम फेरीत यजमान संघाचा पराभव करून पहिले विजेतेपद पटकावले. अर्जेंटिनाने १९२१ मध्ये पहिल्यांदा हा ट्रॉफी जिंकला होता आणि तेव्हापासून या संघाने एकूण १५ वेळा जिंकला आहे.
अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी दुखापतीमुळे संपूर्ण सामना खेळू शकला नाही. सामन्यामध्ये त्याला ६६व्या मिनिटाला मेस्सीच्या पायाला दुखापत झाली, त्यामुळे त्याला बाहेर जावे लागले. दुखापतीमुळे तो बेंचवर बसूनही रडू लागला. मात्र, संघातील इतर खेळाडूंनी मेस्सीची अनुपस्थिती जाणवू दिली नाही आणि सामना जिंकला.
अंतिम सामना सुरू होण्यापूर्वीच स्टेडियममध्ये गोंधळ उडाला होता. काही चाहते विना तिकीट सामना पाहण्यासाठी जबरदस्तीने स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना आढळले. सुरक्षा कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच प्रवेशद्वार बंद करण्यात आले. यानंतर तिकीट असलेल्यांनाही आत जाता येत नसल्याने मोठा गोंधळ झाला. मोठ्या कष्टाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आणि सामना 82 मिनिटे उशिराने सुरू झाला.