बांगलादेशने मिळवला अफगाणिस्तानवर विजय (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
आशिया कप २०२५ च्या ९व्या सामन्यात बांगलादेशचा सामना अफगाणिस्तानशी झाला. हा सामना अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २० षटकांत ५ गडी गमावून १५४ धावा केल्या. अफगाणिस्तानसमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. हा सामना बांगलादेशसाठी करो वा मरो असा होता. मात्र पहिल्याच ओव्हरपासून अफगाणिस्तानची मॅचवरील पकड सैल होत गेली आणि बांगलादेशने हा सामना जिंकत सुपर ४ मध्ये आपले स्थान पक्के केले आहे.
तत्पूर्वी, आशिया कप २०२५ मध्ये शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५ गडी गमावून १५४ धावा केल्या. बांगलादेशचे सलामीवीर सैफ हसन आणि तन्जीद हसन यांनी दमदार सुरुवात केली आणि पहिल्या विकेटसाठी ६.४ षटकांत ६३ धावा जोडल्या. या धावसंख्येवर सैफ हसन २८ चेंडूत ३० धावा काढून बाद झाला. तन्जीद हसनने आक्रमक फलंदाजी केली आणि ३१ चेंडूत ३ षटकार आणि ४ चौकारांसह ५२ धावा काढून बाद झाला.
तन्जीद हसन व्यतिरिक्त बांगलादेशचा दुसरा कोणताही फलंदाज तन्जीदसारखा मोठा आक्रमक डाव खेळू शकला नाही. हेच कारण होते की चांगली सुरुवात असूनही बांगलादेश अंदाजे धावसंख्येपेक्षा किमान २०-२५ धावा मागे राहिला. कर्णधार लिटन दास ११ चेंडूत ९ धावा, शमीम हुसेन ११ चेंडूत ११ धावा आणि तौहिद हृदयॉय २० चेंडूत २६ धावा काढून बाद झाला. झाकीर अली आणि नुरुल हसन यांनी १२-१२ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून कर्णधार रशीद खानने शानदार गोलंदाजी केली आणि ४ षटकांत २६ धावा देत २ बळी घेतले. नूर अहमदनेही ४ षटकांत २३ धावा देत २ बळी घेतले. उमझरायने १ बळी घेतला.
अफगाणिस्तानची सुरूवात अत्यंत संथ झाली. फलंदाजी करतानाही उमरझाईने खूप चांगली कामगिरी केली. तसंच कॅप्टन राशीद खाननेही शेवटपर्यंत प्रयत्न केला पण केवळ २० धावा बनवत तोदेखील तंबूत परतला. रन्स बनविण्याच्या नादात एकामागोमाग खेळाडू आऊट झाल्यावर अफगाणिस्तानच्या जिंकण्याच्या सर्व आशा मावळल्या. अफगाणिस्तान संघ ही मॅच त्यानंतर वाचवू शकला नाही. मात्र संघातील अन्य खेळाडू अधिक खेळू शकले नाहीत आणि अफगाणिस्तानच्या आशिया कपमील सुपर ४ च्या आशा मावळल्या.
बांगलादेशसाठी हा सामना जिंकणे खूप महत्वाचे होते. बांगलादेशने लीग टप्प्यात दोन सामने खेळले आहेत. बांगलादेशने हाँगकाँगविरुद्ध विजय मिळवला, परंतु श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. जर बांगलादेशने अफगाणिस्तानविरुद्ध हा सामना गमावला असता तर त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले असते आणि दुसरीकडे, अफगाणिस्तानला विजयासह सुपर ४ चे तिकीट मिळाले असते. मुस्तफिजुरने बांगलादेशकडून गोलंदाजीची उत्तम कमान सांभाळली आणि अफगाणिस्तानचा संघ गारद करण्यात मोठा वाटा उचलला.
बांगलादेशचे प्लेइंग इलेव्हन: तनजीद हसन तमीम, सैफ हसन, लिटन दास (कर्णधार/विकेटकीपर), तौहीद हृदोय, महेदी हसन, नुरुल हसन, जेकर अली, शमीम हुसेन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद.
अफगाणिस्तानचे प्लेइंग इलेव्हन: सेदीकुल्ला अटल, रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, अजमतुल्ला उमरझाई, करीम जनात, राशिद खान (कर्णधार), नूर अहमद, एएम गझनफर, फजलहक.