
हेही वाचा : Photo : फक्त 27 चेंडूत भारताने रचला इतिहास! नोंदवला T20I मधील सर्वात मोठा विजय
२०२४ च्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर कुलदीप यादवचा आशिया कप २०२५ मध्ये यूएई विरुद्ध हा पहिलाच टी२० आंतरराष्ट्रीय सामना होता. त्यामुळे यावेळी सर्वांच्या नजरा त्याच्यावर टिकून होत्या आणि त्याने देखील कुणाला निराश केले नाही. त्याने एकाच षटकात त्याने तीन विकेट्स काढल्या. या दरम्यान, त्याने त्याच्या स्पेलमध्ये एकूण फक्त ७ धावा मोजल्या. या शानदार कामगिरीनंतर, कुलदीप आता भारताचा दिग्गज माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला देखील मागे टाकत परदेशात भारतासाठी सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय बळी घेणारा गोलंदाज बनला आहे.
कुलदीप यादवने आतापर्यंत परदेशामध्ये खेळल्या गेलेल्या २५ सामन्यांमध्ये ११.१५ च्या सरासरीने ५२ विकेट्स घेतल्या आहेत, तर आर अश्विनने ४४ सामन्यांमध्ये ५० विकेट्स घेतल्या आहेत. या यादीमध्ये सध्या अर्शदीप सिंग परदेशात ४५ सामन्यांमध्ये ७१ विकेट्स घेऊन अव्वल स्थानी वियाराजमान आहे.
यूएईविरुद्ध सामनावीर पुरस्कार पटकावल्यानंतर कुलदीप यादव म्हणाला की, त्यांच्या या कामगिरीमागे फिटनेस प्रशिक्षक एड्रियनचे मोठे योगदान राहिले आहे. त्या म्हटले की, गेल्या काही महिन्यांमध्ये फिटनेसवर खूप जास्त मेहनत घेण्यात आली आहे आणि आता त्याचे फायदे मैदानावर दिसून येत आहेत. कुलदीप यादव म्हणाला की, “माझे लक्ष फक्त योग्य लांबीवर गोलंदाजी करणे आणि फलंदाजाची पुढची चाल समजून घेऊन त्यानुसार रणनीती बनवणे यावर होते.”