Big blow to India! Shubman Gill out of Duleep Trophy? Doubts about participation in Asia Cup 2025 too! What exactly happened?
Duleep Trophy 2025 : दुलीप ट्रॉफी 2025 सुरू होण्यापूर्वी उत्तर विभागाला मोठा झटका बसला आहे. दुलीप ट्रॉफी २८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल आता दुलीप ट्रॉफीमधून बाहेर पडल्याची बातमी समोर आली आहे. तथापि, या बातमीची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. एका वृत्तानुसार, शुभमन गिलची तब्येत सध्या ठीक नाही. तो आजारी असून सध्या चंदीगड येथील त्याच्या निवासस्थानी विश्रांती घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. आता तो आशिया कपपूर्वी बरा होऊ शकतो की नाही याबाबत देखील शंका आहे. काही दिवसांपूर्वी आशिया कपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. ज्यामध्ये गिलला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्याचे लवकर ठीक होणे संघासाठी फायद्याचे असणार आहे.
शुभमन गिलला दुलीप ट्रॉफीमध्ये उत्तर विभागाचा कर्णधार असून आता स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच गिल दुलीप ट्रॉफी खेळू शकणार नसल्याची बातमी आली आहे. उत्तर विभागाच्या निवड समितीला याबद्दल माहिती होती, परंतु २२ ऑगस्ट (शुक्रवार) पर्यंत त्यांना कोणत्याही उत्तर विभाग संघटनेकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती.
क्रिकबझनुसार, फिजिओथेरपिस्टनी अलीकडेच गिलची तपासणी केली असून सुमारे २४ तासांपूर्वी त्याचा फिटनेस अहवाल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे पाठवला आहे. तो आता दुलीप ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नसला तरी तो आशिया कपपूर्वी बरा होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. आशिया कपसाठी भारतीय संघात सामील झाल्यानंतर गिल दुलीप ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नाही असे बोलले जात नाही. दुलीप ट्रॉफीला २८ ऑगस्टपासून सुरवात होऊन ही स्पर्धा १५ सप्टेंबर रोजी संपणार आहे. तर आशिया कप ९ सप्टेंबरपासून सुरू होऊन 28 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. भारतीय संघ १० सप्टेंबरपासून आपल्या मोहिमेला सुरवात करणार आहे.
गिल खेळू शकणार नाही हे उत्तर विभागाच्या निवड समितीला आधीच माहिती असल्याने त्यांनी शुभम रोहिल्लाची त्याच्या जागी निवड करण्यात आली होती. अंकित कुमारला संघात उपकर्णधार बनवण्यात आले होते, परंतु आता तो गिलच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची धुरा संभाळणार आहे.
शुभमन गिल व्यतिरिक्त, उत्तर विभागाच्या संघात आणखी दोन खेळाडू खेळू शकणार नाहीत. ज्यांची आशिया कपसाठी भारताच्या संघात निवड झाली आहे. यामध्ये अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांचा समावेश आहे. हे दोन्ही खेळाडू कदाचित दुलीप ट्रॉफीचा पहिला सामना खेळतील, त्यानंतर ते आशिया कपसाठी यूएईला रवाना होतील.