लोचण गौडा(फोटो-सोशल मीडिया)
Maharaja T20 Trophy : आयपीएल 2026 या स्पर्धेला अजून बऱ्याच वेळ आबाकी आहे. आयपीएलचे त्याआधी लिलाव पार पडणार आहे. आयपीएल 2026 च्या लिलाव आधीच देशात युवा खेळाडूंनी आपल्या खेळाच्या शैलीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्याचा सपाटा लावला आहे. अशातच कर्नाटक येथे सुरू असणाऱ्या महाराजा टी20 ट्रॉफी स्पर्धेत एका 23 वर्षीय खेळाडूचा जलवा बघायला मिळाला. युवा सलामीवीर ओपनर लोचन गौडाने मंगलोर ड्रॅगन्सकडून खेळताना स्फोटक फलंदाजी केली. या सामन्याबद्दल आपण जाणून घेऊया.
हेही वाचा : Deepti Sharma Birthday : भारतीय महिला संघाचा कणा दीप्ती शर्मा! केले आहेत ‘हे’ मोठे कारनामे
मैसूरमध्ये शुक्रवारी 22 ऑगस्ट रोजी महाराजा ट्रॉफीचा 24 वा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात शिवमोगा लायंस आणि मंगलोर ड्रॅगन्सच्या हे दोन संघ आमने-सामने उभे ठाकले होते. ड्रॅगन्स संघाने प्रथम फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 200 धावा उभारल्या. 23 वर्षाचा युवा ओपनर लोचन ड्रॅगन्सला 200 धावांपर्यंत पोहचवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्याने आपल्या संघासाठी सर्वाधिक 32 चेंडूत 63 धावांची वादळी खेळी खेळली.
सलामीवीर लोचनने आपला आक्रमक अंदाज दाखवला. त्याने 11 व्या ओव्हरमध्ये लायन्सचा गोलंदाज डी अशोक या गोलंदाजाची चांगलीच धुलाई केली. लोचनने या ओव्हरची सुरुवातच षटकार ठोकून केली. त्याने या षटकामध्ये सलग 4 षटकार लगावले. पाचव्या चेंडूवर फक्त 2 धावा काढता आल्या. पण ओव्हरचा शेवट त्याने षटकार लगावूनच केला. लोचनने या षटकात 5 षटकार आणि 2 धावा काढून 32 धावा लुटल्या. लोचनने इनिंगमध्ये एकूण 63 धावा केल्या. या निम्म्या 32 धावा एकाच ओव्हरमध्ये कुटल्या.
6️⃣ 6️⃣ 6️⃣ 6️⃣ 6️⃣
Lochan Gowda ಒಬ್ಬ ಭವಿಷ್ಯದ ಸೂಪರ್ಸ್ಟಾರ್ ಎಂಬುದಕ್ಕೆ ಅವರ ಸಿಡಿಲಬ್ಬರದ ಸಿಕ್ಸರ್ಗಳೇ ಸಾಕ್ಷಿ. 👑
📺 ವೀಕ್ಷಿಸಿ | Maharaja Trophy KSCA T20 | Shivamogga vs Mangalore | LIVE NOW | ನಿಮ್ಮ Star Sports ಕನ್ನಡದಲ್ಲಿ.#MaharajaTrophyOnJioStar #MaharajaTrophy pic.twitter.com/G68u1RZs38
— Star Sports Kannada (@StarSportsKan) August 22, 2025
हेही वाचा : Asia Cup 2025: अशिया कपसाठी बांगलादेश संघाची घोषणा, तीन वर्षांनी ‘या’ खेळाडूचं कमबॅक; शांतो संघाबाहेर
सलामीवीर लोचनच्या या खेळीनंतर विरोधी टीम लायन्सच्या फलंदाजाने अजून एका वादळी खेळींची पर्वणी दिली. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना लायन्सचा सलामीवीर तुषार सिंहने दमदार सुरुवात करत त्याने 48 चेंडूत 89 धावा फटकावल्या. त्याच्या इनिंगमध्ये 7 सिक्स आणि 6 चौकारांचा समावेश होता. त्याशिवाय हार्दिक राजने 14 चेंडूत 32 धावा करुन टीमला विजयाच्याजवळ आणून पोहोचवले होते. शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर लायन्सला विजयासाठी 6 धावांची गरज होती. पण तो चेंडू निर्धाव गेल्याने मंगलोर ड्रॅगन्सचा 5 धावांनी विजय झाला.