फोटो सौजन्य - बीसीसीआय/सोशल मिडिया
आशिया कप 2025 मध्ये सुपर 4 चे दोन सामने खेळवण्यात आले. या सामन्यामध्ये दोन्ही दमदार सामने पाहायला मिळाले आहेत, पहिला सामना बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये पार पडला. या सामन्यात बांग्लादेशच्या संघाने बाजी मारली आणि पहिल्या सुपर 4 मध्ये विजय मिळवून विजयी सुरुवात केली आहे. काल दुसरा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये पार पडला. या सामन्यात भारताच्या संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया ग्रुप स्टेजनंतर सुपर-४ च्या पॉइंट्स टेबलवरही वर्चस्व गाजवत आहे.
ग्रुप स्टेजमध्ये विजयाची हॅटट्रिक नोंदवून भारताने सुपर-४ साठी पात्रता मिळवली होती. ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडिया पहिल्या स्थानावर होती. आता, सुपर-४ मध्ये पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला ६ विकेट्सने हरवून टीम इंडियाने येथेही नंबर-१ चे स्थान मिळवले आहे. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त, बांगलादेश आणि श्रीलंका सुपर-४ साठी पात्र ठरले आहेत. सर्व संघांनी प्रत्येकी एक सामना खेळला आहे. आशिया कप सुपर-४ पॉइंट्स टेबलमध्ये भारत २ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर बांगलादेश त्याच संख्येने गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
बांगलादेशने पहिल्या सुपर ४ सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला. या विजयासह त्यांनी सुपर ४ पॉइंट्स टेबलमध्ये आपले खाते उघडले. तथापि, चांगल्या नेट रन रेटमुळे, भारत बांगलादेशला मागे टाकत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. बांगलादेशने एक चेंडू शिल्लक असताना श्रीलंकेविरुद्ध ४ विकेट्सने विजय मिळवला, ज्यामुळे त्यांचा नेट रन रेट +०.१२१ झाला. भारताने ७ चेंडू आणि ६ विकेट्स शिल्लक असताना पाकिस्तानचा पराभव केला, ज्यामुळे त्यांचा नेट रन रेट +०.६८९ झाला. भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. -०.६८९ च्या नेट रन रेटसह हा संघ चौथ्या स्थानावर आहे, तर श्रीलंका तिसऱ्या स्थानावर आहे.
क्रमांक | संघ | झालेले सामने | विजय | पराभव | गुण | स्ट्राइक रेट |
---|---|---|---|---|---|---|
1 | भारत | 1 | 1 | 0 | 2 | +0.689 |
2 | बांग्लादेश | 1 | 1 | 0 | 2 | +0.121 |
3 | श्रीलंका | 1 | 0 | 1 | 0 | -0.121 |
4 | पाकिस्तान | 1 | 0 | 1 | 0 | -0.689 |
भारतीय संघाचा पुढील सामना हा बांग्लादेशविरुद्ध खेळवला जाणार आहे. पुढील सामना हा श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये होणार आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजय मिळवेल तो संघ फायनलच्या शर्यतीमध्ये टिकून राहिल. बांग्लादेशच्या संघाने एक सामना जिंकला आहे तर दुसरा सामना हा भारताच्या संघाने जिंकला आहे. सुपर 4 चे 5 सामने अजूनही शिल्लक आहेत.