फोटो सौजन्य - AsianCricketCouncil
आशिया कपसाठी भारताच्या संघाने दमदार सुरुवात केली आहे, भारतासह अफगाणिस्तान, पाकिस्तान, बाग्लादेशच्या संघांनी देखील या स्पर्धेची सुरुवात चांगली केली. हाॅंगकाॅंग, ओमान, यूएई या देशांची सुरुवात फार काही चांगली झाली नाही. हाॅंगकाॅंगचा संघ तर आता सुपर 4 मधून देखील बाहेर झाला आहे. आतापर्यत यास्पर्धेचे चार सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये सध्या गुणतालिकेची स्थिती कोणती आहे कोणते संघ पहिल्या क्रमांकावर आहेत तर कोणत्या संघावर बाहेर पडण्याचा धोका आहे यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
BAN VS SL : श्रीलंकेसाठी बांगलादेशचे आव्हान सोपे नसणार, नजर फिरकीपटूंवर असेल! कोण मारणार बाजी?
पाकिस्तान क्रिकेट संघाने आशिया कप-२०२५ ची सुरुवात विजयाने केली आहे. त्यांनी पहिल्या सामन्यात ओमानचा ९३ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. पाकिस्तानच्या या विजयानंतर पॉइंट टेबलमध्ये बदल झाला आहे. तथापि, इतक्या मोठ्या विजयानंतरही पाकिस्तान भारताच्या वर्चस्वाला आव्हान देऊ शकलेला नाही. पॉइंट टेबलमध्ये ते अजूनही भारताच्या मागे आहे.
Pakistan complete formalities with a thumping win! ✌️
Led by Haris & powered by lower order cameos, 🇵🇰 had a score on the board their bowlers had no problems defending. #PAKvOMAN #DPWorldAsiaCup2025 #ACC pic.twitter.com/wYdhkpS2HK
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 12, 2025
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने सात विकेट गमावून १६० धावा केल्या. ओमानचा संघ १६.४ षटकांत ६७ धावांवरच गारद झाला. ओमानचे फलंदाज पाकिस्तानी गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत.
या विजयानंतर पाकिस्तानचे अ गटात एका सामन्यात एका विजयासह दोन गुण आहेत. भारतानेही फक्त एक सामना खेळला आहे आणि तो जिंकला आहे. भारताने पहिल्या सामन्यात यूएईचा पराभव केला. भारत आणि पाकिस्तान दोघांचेही प्रत्येकी दोन गुण आहेत, परंतु नेट रन रेटच्या बाबतीत भारतीय संघ पुढे आहे. त्याचा नेट रन रेट १०.४८३ आहे. पाकिस्तानचा ४.६५० आहे. या बाबतीत, टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर आहे आणि पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. ओमान तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि यजमान चौथ्या क्रमांकावर आहे.
या स्पर्धेतील सर्वात कठीण गट म्हणजे गट ब. या गटात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका सारखे संघ आहेत. अफगाणिस्तान आणि बांगलादेश या दोघांचेही एक-एक सामना जिंकल्यानंतर प्रत्येकी दोन गुण आहेत. अफगाणिस्तानचा धावगती चांगला आहे म्हणून तो पहिल्या क्रमांकावर आहे. बांगलादेश दुसऱ्या क्रमांकावर आहे.
अफगाणिस्तानचा नेट रन रेट ४.७० आहे तर बांगलादेशचा १.० आहे. हाँगकाँग तिसऱ्या स्थानावर आहे आणि त्यांनी दोन्ही सामने गमावले आहेत. श्रीलंकेने या गटात अद्याप एकही सामना खेळलेला नाही. आज त्यांचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे.