
Asian Games 2026 : 400 मीटर हर्डल्समध्ये विथ्या रामराजने रचला इतिसाह, पीटी उषांचा विक्रम मागे सारत कांस्य पदकाची कमाई
भारतीय अॅथलीट संपूर्ण स्पर्धेत पदकाच्या शर्यतीत होती. तिने अखेरच्या क्षणापर्यंत आपली स्थिती कायम राखली, पण ती मरियम करिमया सामना करू शकली नाही. संयुक्त अरब अमिरात (यूएई)च्या मरियम करीमने 54.31 सेकंदाच्या विक्रमासह सुवर्ण, तर कजाकिस्तानच्या एडेलिना जम्सने 54.58 सेकंदात आपल्या वैयक्तिक कामगिरीने रौप्य पदक प्राप्त केले.
विथ्या रामराजने 55.42 सेकंदाने मागील राष्ट्रीय विक्रमात 0.67 ची सुधारणा केली. हा विक्रम उषा यांनी 1984 मध्ये लॉस अँजिल्स ऑलिम्पिकमध्ये साकारला होता, जिथे त्या ऑलिम्पिक फायनलमध्ये चौथ्या स्थानी राहिलेल्या.
उषा यांचा हा विक्रम मागील चार दशके कायम होता. रामराजने 2023 मध्ये या विक्रमाची बरोबरी केली होती, पण एशियन गेम्स 2026 मध्ये सुधारणा करत नवा राष्ट्रीय विक्रम रचला.
इतर एक भारतीय अॅथलेटिक्स अनू राघवनने देखील फायनलमध्ये शानदार कामगिरी केली. लेन आठमध्ये धावताना राघवन 55.88 सेकंदा (वैयक्तिक कामगिरी)सह ती पाचव्या स्थानी राहिली. फायनलमध्ये पोहोचण्याआधी त्याने 56.54 असा सर्वोत्तम वेळ नोंदवला होता.
एशियन गेम्समध्ये आतापर्यंत भारतीय अॅथलेटिक्सने दमदार कामगिरी केली आहे. सध्या भारत 4 सुवर्ण व एकूण 39 पदकांसह पदकतालिकेत 12 व्या स्थानी आहे.