Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: गोल्डसाठी अखेरपर्यंत झुंज, पण स्वप्न भंगलं! Abhay Singh ने रचला इतिहास; स्क्वॉशमध्ये भारताला रौप्यपदक

Abhay singh won silver in squash Asian games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आणखी एक मोठे यश मिळवले आहे. अभय सिंगचे स्क्वॉशमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले मात्र, त्याने शानदार कामगिरी करत रौप्यपदक जिंकले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 27, 2026 | 03:06 PM
Abhay singh won silver in squash

Abhay singh won silver in squash

Follow Us
Follow Us:
  • सुवर्णपदक हुकलं, रौप्यपदक मिळालं
  • अभय सिंगने Asian Games मध्ये रचला इतिहास
  • भारताच्या खात्यात सिल्व्हर
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६  (Asian Games 2026) च्या नवव्या दिवशी, पुरुष एकेरी स्क्वॉश स्पर्धेत भारताला मोठे यश मिळाले आहे. भारताचा स्टार स्क्वॅशपटू, अभय सिंगने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक जिंकले. सुवर्णपदकाच्या सामन्यात अभय सिंगचा सामना मलेशियाच्या अव्वल मानांकित एनजी ईन येओशी झाला. अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या सामन्यात अभय ०-३ (९-११, ५-११, ५-११) ने पराभूत झाला. या पराभवामुळे अभयचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. पंरतु, रौप्यपदक जिंकून त्याने इतिहास रचला.

Asian Games 2026: पंचवर पंच अन् प्रतिस्पर्धी चितपट! Ankush Panghal ची सेमीफायनलमध्ये धडक; बॉक्सिंगमध्ये भारताचं मेडल पक्कं

अभय सिंगने रौप्यपदकावर कोरले नाव

अभय सिंगने पहिल्या सेटमध्ये आपली ताकद दाखवली. त्याने एनजी ईन येओला चांगलाच घाम फोडला. परंतु, अभय पहिला सेट ११-९ ने हरला. दुसऱ्या सेटमध्ये मलेशियन खेळाडूने अभयवर दबाव आणला आणि सेट ११-५ ने सहज जिंकून २-० अशी आघाडी घेतली. तिसऱ्या निर्णायक सेटमध्ये अभयने शानदार कमबॅक करत ४-२ अशी सुरुवातीची आघाडी घेतली. मात्र, एनजी ईन येओने लगेचच पुनरागमन करत ६-५ अशी आघाडी घेतली. अखेरीस मलेशियन खेळाडूने ११-५ ने तिसरा सेट जिंकून सुवर्णपदक पटकावले. विजयानंतर ईन येओ भावूक झाला होता, त्याच्या डोळ्यात अश्रू होते. या विजयामुळे तो आशियाई क्रीडा स्पर्धेत डबल गोल्ड मेडलिस्ट विजेता ठरला असून, त्याने २०२८ च्या ऑलिम्पिकसाठीही पात्रता मिळवली आहे.

Silver for Abhay 🥈 India’s Abhay Singh finishes his #AichiNagoya2026 campaign with a silver medal in squash men’s singles. 👏 pic.twitter.com/PfijjpXDMM — Olympic Khel ™ (@OlympicKhel) September 27, 2026

भारतासाठी ऐतिहासिक यश

अंतिम सामन्यात अभय सिंगला सुवर्णपदक मिळाले नसले तरी, संपूर्ण स्पर्धेतील त्याची कामगिरी प्रेरणादायी होती. उपांत्य फेरीत अभय सिंगने उत्कृष्ट खेळ केला. त्याने पाकिस्तानच्या मुहम्मद इरफानला सरळ सेटमध्ये ३-० ने पराभूत केले. अभयने आक्रमक सुरुवात करत पहिला गेम ११-३ ने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये इरफानने जोरदार झुंज दिली, पण त्याला यश मिळाले नाही. अभयने शानदार खेळ दाखवत दुसरा सेट १२-१० ने जिंकला. त्याने तिसरा गेमही ११-६ ने जिंकून एक मोठा विजय मिळवला. संपूर्ण सामन्यादरम्यान अभयने इरफानवर वर्चस्व गाजवले.

कोण आहे अभय सिंग?

अभय सिंग हा भारताच्या स्टार स्क्वॅश खेळाडूंपैकी एक असून, त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करून राष्ट्रीय संघात आपले स्थान पक्के केले आहे. त्याने पीएसए टूरवर अनेक विजेतेपदे पटकावली आहेत. याशिवाय, त्याने आशियाई क्रीडा, आशियाई सांघिक चॅम्पियनशिप आणि जागतिक सांघिक चॅम्पियनशिप यांसारख्या अनेक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

IND vs WI 1st ODI Live: वेस्टइंडीजविरुद्ध गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला मोठा निर्णय; नमन धीरचा डेब्यू

Web Title: Asian games 2026 abhay singh won silver medal squash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • asian games 2026
  • Silver Medal
  • Squash

संबंधित बातम्या

Asian Games 2026: पंचवर पंच अन् प्रतिस्पर्धी चितपट! Ankush Panghal ची सेमीफायनलमध्ये धडक; बॉक्सिंगमध्ये भारताचं मेडल पक्कं
1

Asian Games 2026: पंचवर पंच अन् प्रतिस्पर्धी चितपट! Ankush Panghal ची सेमीफायनलमध्ये धडक; बॉक्सिंगमध्ये भारताचं मेडल पक्कं

लक्ष्य सेनची झुंज अपुरी! माजी वर्ल्ड चॅम्पियनकडून पराभव, Asian Games 2026 मधील आव्हान संपुष्टात
2

लक्ष्य सेनची झुंज अपुरी! माजी वर्ल्ड चॅम्पियनकडून पराभव, Asian Games 2026 मधील आव्हान संपुष्टात

Asian Games : स्क्वॉशमध्ये अभय सिंहची फायनलमध्ये धडक, पाकिस्तानी खेळाडूला घरचा रस्ता दाखवत केलं पदक निश्चित
3

Asian Games : स्क्वॉशमध्ये अभय सिंहची फायनलमध्ये धडक, पाकिस्तानी खेळाडूला घरचा रस्ता दाखवत केलं पदक निश्चित

‘ये गोल्ड हमारा है!’ भारताशी नडला त्याचा गेम झाला; इराणला नमवत टीम इंडियाने जिंकलं ‘सुवर्ण’
4

‘ये गोल्ड हमारा है!’ भारताशी नडला त्याचा गेम झाला; इराणला नमवत टीम इंडियाने जिंकलं ‘सुवर्ण’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.